TAIT Exam Certificate 2023 Documents
Maha TAIT गुणपत्रक आल आहे… डाऊनलोड करून घ्या…!
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे आयोजन दिनांक. 21/11/2021 रोजी करण्यात आलेले होते. या परीक्षेतील पेपर क्र.01 (इ. 1 ली ते 5 वी) व पेपर क्र.02 (इ. 6 वी ते 5 वी ) चा अंतिम निकाल दिनांक. 23/12/2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या परिक्षार्थीचे प्रमाणपत्रे वितरणासाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद अहमदनगर या कार्यालयामध्ये दिनांक 29/03/2023 ते दिनांक. 06/04/2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यत (शासकिय सुट्टींचे दिवस वगळता) उपलब्ध असून सदर प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी उमेदवारांनी आपले शैक्षणिक, व्यावसायिक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र इ. मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह समक्ष उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्साम ची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:
Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2023 – नवीन अभ्यासक्रम जाहीर
Download MAHA TAIT Full Exam Time Table
☛Join MAHA TAIT Online Test Series Free
Maha TAIT Previous Year Papers -TAIT परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका !!
TAIT चे score card हे site वर फक्त 20 एप्रिलपर्यंतच राहणार आहे. नंतर ते उपलब्ध होणार नाहीत याची नोंद घ्यावी. Tait score card/ certificate Download करा व pdf save करा व 2-3 xerox copy पण काढून ठेवा.
List Of Documents required for MAHA TAIT Certificate
उमेदवारांनी खालील कागदपत्रे/ प्रमाणपत्रे यांच्या मुळ व छायांकित प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे प्रमाणपत्र घेण्यासाठी समक्ष उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
1. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत.
2. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत.
3. डी.टी.एड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक.
4. आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र. (असल्यास)
15. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र. (असल्यास)
6. माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा.
7. ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्राइविंग लाईसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.)