MAHA TAIT Exam Date 2023, TAIT Paper, TAIT Selection List – ‘टेट’ ची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून होणार

MAHA TAIT Exam Date 2022-23, TAIT Paper, TAIT Selection List

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

MAHA TAIT Exam Date 2022, TAIT Paper, TAIT Selection List – TCS, IBPS and MKCL is One of the Organization which is going to Conduct Exam for Aptitude and intelligence test required for teacher recruitment. Tentative MAHA TAIT Exam Date has been Announced. For this MAHA TAIT Exam Calendar Will be published very soon. As sson as Maha TAIT Time Table 2023 is Out we will Update here. More details about MAHA TAIT Exam Date 2023, TAIT Paper, TAIT Selection List are as given below

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ आहे.. “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे. अधिक माहिती व या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा 

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2023

Maharashtra Shikshak TAIT  Exam Date 2023

“शिक्षकांची अभियोग्यता चाचणी परीक्षा २२ फेब्रुवारीपासून होणार – The Maharashtra State Examination Council has announced the dates for teacher aptitude and intelligence test required for teacher recruitment which has been stalled for five years. The exams will be held online from 22nd February to 3rd March 2023. The deadline to apply for this is February 8. Therefore, D.Ed., who has been waiting for a job for the past five years

Maha TAIT Time Table 2023

Maharashtra TAIT Exam 2023 will be conducted from 22nd February 2023 To 3rd March 2023

MAHA TAIT Exam Date 2023, TAIT Paper, TAIT Selection List

‘टेट’ ची फेब्रुवारीत ऑनलाइन परीक्षा | Maha TAIT Exam in February 2023

शिक्षक होण्यासाठी आता टीईटीऐवजी आता ‘टेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर ‘टेट’ परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरुण-तरुणी परीक्षा देतील, असा अंदाज आहे.

एप्रिल-मे महिन्यात ३५ हजार शिक्षकांची भरती |एप्रिल-मे महिन्यात ३५ हजार शिक्षकांची भरती

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यासाठी ‘टेट’ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. दोनशे गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित एकच पेपर या परीक्षेसाठी असेल. दोनशे प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होत असल्याने त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणतः दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरू आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

जि.प.च्या ३० हजार शिक्षकांची भरती होणार – फेब्रुवारीत ही परीक्षा

Proceedings have been initiated to include Zilla Parishad schools with low enrollment (less than 20) in nearby schools. On the other hand, the posts of 29 thousand 600 teachers are vacant in Zilla Parishad schools. For that, ‘Tait’ will be held in February and after the declaration of results in March, the relevant teachers will be directly appointed through the holy portal according to their merit before June. There are nearly 97 thousand schools from 1st to 8th grade including Zilla Parishad in which 1.72 crore students are studying. The number of matriculation of nearly 14 thousand schools of Zilla Parishad is less than 20.

आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टीईटी तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील. साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे. परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

खासगी’त मुलाखतीद्वारे भरती

टीईटी व टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी देखील ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आहे. भरती करण्यासाठी एका पदासाठी दहा उमेदवारांना बोलावणे आवश्यक आहे. त्यांची मुलाखत घेऊन खासगी संस्थांवर शिक्षक भरती करावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. गुणवत्तेनुसार थेट भरती देखील करण्याचा अधिकार खासगी संस्थांना देण्यात आला आहे. त्याचे रेकॉर्ड संस्थांना जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी जूनपूर्वी मोठी शिक्षक भरती होईल, असेही सांगण्यात आले.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

६०,९१२ – एकूण शाळा

४३,५५,०७० – एकूण विद्यार्थी

२,१४,६६० – शाळांवरील शिक्षक

२९,६०० – रिक्तपदे

MAHA TAIT Exam Date 2022, TAIT Paper, TAIT Selection List

Maharashtra Teacher TAIT Exam Compulsory !!!!

याआधी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा संधी उपलब्द होती. यासोबतच आता यामध्ये नवीन नियम जोडण्यात आले आहे. याबाबत राज्य सरकराने एक परिपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आता झालेले महत्वाचे बदल

  • उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील.
  • उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
  • शिक्षक भरती पदासाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल.
  • तसेच सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आले आहे
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करिता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पद भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील.
  • त्यात त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.

Maharashtra TAIT Bharti Exam Date – शिक्षक भरतीची ‘टेट’ फेब्रुवारीपूर्वी

पुढील वर्षी १७ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टिचर्स अॅप्टिट्यूट अॅण्ड इन्टेलिजन्स टेस्ट- टीएआयटी) म्हणजेच टेट ही परीक्षा घ्या व त्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला दिला. यासंदर्भात जितेंद्र सोनकुसरे यांच्यासह चार उमेदवारांनी याचिका दाखल केल्या होत्या, त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व एम. डब्ल्यू, चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी १ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षक पात्रता चाचणी (टिचर एलिजिबिलिटी टेस्ट- टीईटी) परीक्षा उत्तीर्ण केली परंतु, कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास पात्रतेसाठी टेट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मागील टेट चार वर्षांपूर्वी २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर ही परीक्षाच घेण्यात आली नाही, असे म्हटले होते.

यामुळे राज्यातील राज्यातील हजारो डीएड, बीएड उमेदवारांना दिलासा मिळाला. टेट परीक्षा लांबली तर अनेक उमेदवारांनी वयाची पात्रता गमावली असती. स्वतःची चूक नसताना केवळ सरकारच्या उदासीनतेचा फटका सहन करावा लागला असता, असे याचिकाकत्यांचे वकील अॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

MAHA TAIT Exam Date 2023

शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाईनच घेण्यात येणार आहे. त्यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे. निवड झालेल्या संस्थेकडून 16 डिसेंबरला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर, प्रत्यक्ष परीक्षा 17 ते 28 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल 5 मार्च 2023 ला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अभियोग्यता चाचणीचा मुहूर्त ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षेच्या निकषांमध्ये काही आवश्यक सुधारणा करून शासन निर्णय जाहीर करण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल हे परीक्षा कसे घेणार, याचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे. परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला 17 ऑक्टोबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. निवडलेल्या संस्थेला परीक्षेची तयारीकरिता 4 महिने वेळ लागेल. त्यामुळे 17 फेब—ुवारी 2023 पासून परीक्षेला सुरुवात होईल.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही. संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परिषदेकडे नाही. परंतु, शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन, तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या. त्याचपध्दतीने फेब—ुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पार पडणार आहे.

 


1 thought on “MAHA TAIT Exam Date 2023, TAIT Paper, TAIT Selection List – ‘टेट’ ची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून होणार”

Leave a Comment

Available for Amazon Prime