देशातील तब्बल ८३% इंजिनिअरिंग पदवीधर आणि ४६% बिझनेस स्कूलचे विद्यार्थी बेरोजगार असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ‘अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट २०२५’च्या निरीक्षणानुसार, या विद्यार्थ्यांना ना नोकरी, ना इंटर्नशिप मिळत आहे. विशेष म्हणजे, कंपन्यांच्या मानवी संसाधन (HR) विभागातील ७०० अधिकाऱ्यांनी आणि ३०,००० हून अधिक GenZ पदवीधरांनी या सर्वेक्षणात भाग घेतला.

GenZ चं करिअर कुठे चाललंय?
सुरक्षित नोकरीपेक्षा उत्पन्नाचे विविध स्रोत तयार करण्यावर ५१% GenZ पदवीधर भर देत आहेत. यामध्ये फ्रीलान्सिंग आणि पार्ट-टाइम जॉब्स यासारख्या संधींचा विचार केला जात आहे. बी-स्कूलच्या पदवीधरांमध्ये ही प्रवृत्ती अधिक दिसून येते.
कामाचे परीक्षण हवेच!
७७% GenZ पदवीधर त्यांच्या कामाचे नियमित परीक्षण होणे आवश्यक मानतात. मासिक किंवा प्रोजेक्टनुसार आढावा घेतल्याने कामाची गुणवत्ता सुधारते, असे त्यांचे मत आहे.
नोकरीसाठी काय महत्त्वाचे?
७३% भरती अधिकारी उमेदवाराच्या महाविद्यालय किंवा संस्थेच्या ब्रँडला फारसे महत्त्व देत नाहीत. मात्र, ७१% अधिकारी अजूनही पारंपरिक पद्धतीने वार्षिक, सहामाही किंवा तिमाही स्वरूपात कामाचे मूल्यमापन करतात.
इंजिनिअर्ससाठी रोजगाराचा मोठा प्रश्न!
इंजिनिअरिंग करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे नोकरी किंवा इंटर्नशिप मिळवण्यासाठी केवळ पदवी नाही, तर कौशल्य आणि योग्य अनुभव असणे गरजेचे आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















