महत्त्वाचे – लिपिक पदासाठी इंग्रजी टायपिंगही अनिवार्य, नाहीतर वेतनवाढ नाही
Clerical Cadre Recruitment Process Through MPSC
MPSC Clerk Typist Bharti 2023
Clerical Cadre Recruitment Process Through MPSC – Candidates for the post of Lipik Tankalekhak (Typist Clerk) must have a Marathi or English typing certificate. However, along with this original qualification, a new rule has now been included, making it mandatory for Marathi Typing candidates to submit an English Typing Certificate within four years of appointment.
लिपिक टंकलेखक (टायपिस्ट क्लर्क) पदासाठी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. मात्र, या मूळ पात्रतेसह आता नव्या नियमाचा समावेश करण्यात आला असून, मराठी टंकलेखन करणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती झाल्यानंतर चार वर्षांत इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधीचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
७ हजार पेक्षा जास्त लिपिक पदांसाठी करा अर्ज, पगार रुपये 19900 – 63200 !! MPSC Lipik Bharti 2023
शासकीय कार्यालयातील लिपिक टंकलेखक या पदाचे सेवाप्रवेश नियमात लिपिक-टंकलेखक पदासाठी मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे प्रमाणपत्र धारण करणे ही तांत्रिक पात्रता आहे. त्यानुसार, पदभरती प्रक्रियेत चार वर्षांत प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे अधिसूचनेनुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्याने नियुक्तीनंतर चार वर्षांत मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनीट वेगमादिचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे.
तसेच केवळ मराठी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नियुक्तीनंतर चार वर्षांत इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे विहीत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील. अन्यथा वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुणवत्तेनुसार मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवाराची लिपिक-टंकलेखक पदावर निवड होते. राज्य शासनाचे कामकाज प्रामुख्याने मराठी भाषेतून होत असल्याने लिपिक-टंकलेखक या पदावर इंग्रजी टंकलेखन करणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती झाल्यास, त्याला मराठी टंकलेखन सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, न्यायालय व न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांची कार्यालये अशा काही कार्यालयांमध्ये बहुतांशी कामकाज इंग्रजी भाषेतून पार पाडावे लागते.
अशा कार्यालयांत लिपिक- टंकलेखक पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवाराकडे केवळ मराठी टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास इंग्रजी टंकलेखनाच्या कामकाजावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत निर्णय घेतला.
Clerical Cadre Recruitment Process Through MPSC – A new Government decision has been published recently. As Per this GR For Clerk Typist Exam students must have passed the Marathi or English Typing Certificate. In case of single certificate, second certificate must be obtained within 4 years of appointment. More information regarding Lipik Certificate is given below :
लिपिक-टंकलेखक या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार सदर पदावर नियुक्तीसाठी मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येत असले तरी, प्रस्तावनेत नमूद पार्श्वभूमीवर लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्तीनंतर प्रत्यक्ष शासकीय कामकाज पार पाडण्याच्या दृष्टीने, या शासन निर्णयाद्वारे पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
MPSC Clerk Typist Bharti 2023
लिपिक पदासाठी typing बाबतीत शासनाचा नवीन GR…
मराठी किंवा इंग्रजी उत्तीर्ण असणे आवश्यक.
एकच प्रमाणपत्र असेल तर नियुक्ती नंतर 4 वर्षात दुसरे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक.
म्हणजे तुमच्या कडे कोणतेही एक प्रमाणपत्र असेल तरी तुम्ही लिपिक परीक्षेला पात्र होऊ शकता. उदा. मराठी 30 किंवा इंग्रजी 40.
शासन निर्णय :-
१) महाराष्ट्र शासनात सर्व कामकाज मराठी भाषेतून करण्यात येते. यास्तव, संदर्भाधिन क्रमांक २ च्या अधिसूचनेनुसार केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणा-या उमेदवाराची लिपिक- टंकलेखक पदावर नियुक्ती झाल्यानंतर, त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षांत मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहीत प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. अन्यथा, त्याची वार्षिक वेतनवाढ रोखण्याची तरतूद सदर अधिसूचनेत केली आहे.
शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही २०२३/प्र.क्र.१/कार्यासन १२
२) शासकीय कामकाज मराठी भाषेतून होत असले तरीही काही विशिष्ट कार्यालयांमधील बहुतांश कामकाज इंग्रजी भाषेतून पार पाडावे लागते. (उदा. न्यायालय व न्यायाधिकरणातील सरकारी वकिलांची कार्यालये) यास्तव, केवळ मराठी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणा-या उमेदवाराची अशा शासकीय कार्यालयात लिपिक-टंकलेखक या पदावर निवड झाल्यास, त्या उमेदवाराने नियुक्तीच्या दिनांकापासून ४ वर्षांत इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहीत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहील. अन्यथा, त्याची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात येईल. नियुक्ती प्राधिकारी यांनी लिपिक-टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवाराकडे मराठी /इंग्रजी यापैकी कोणते टंकलेखन प्रमाणपत्र आहे ही बाब तपासून, नियुक्ती आदेशात वरील १ किंवा २ यापैकी आवश्यकतेनुसार योग्य ती तरतूद नमूद करण्याची दक्षता घ्यावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०११२१११४०१९४०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
MPSC Clerical Cadre Recruitment 2023
Clerical Cadre Recruitment Process Through MPSC राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Clerical Cadre Recruitment Process Through MPSC : महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, श्रीमती गीता कुलकर्णी, श्रीमती सु. मो. महाडिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. भरणे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधील पदांची भरतीप्रक्रिया स्थानिक पातळीवर होते. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागल्याने खर्च वाढतो.
श्री. भरणे पुढे म्हणाले की, एमपीएससीच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने एकाच वेळी या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणी उमेदवारांकडून येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सर्वच गट ब आणि गट क संवर्गातील पदांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून राबविता येईल काय याबाबत चाचपणी करण्यात येईल. तथापि, प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला लिपिक संवर्गासाठी एमपीएससीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही तसेच त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास वाचू शकेल, असेही ते म्हणाले.
आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांच्या अनुषंगाने बैठकीच्या आयोजनाबाबत मागणी केली होती. या बैठकीमध्ये एमपीएससी मुख्यालयाच्या बेलापूर येथील प्रस्तावित इमारत उभारणीबाबतही चर्चा करण्यात आली. लवकरच या इमारतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी आणि नियुक्तीप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया गतीने पार पाडण्यासाठी सदस्यांची सर्व पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे, असे श्री. भरणे म्हणाले. मंत्रालयीन संवर्गातील प्रलंबित पदोन्नत्यांच्या अनुषंगानेही त्वरीत कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.
Table of Contents
Official notification bhetel kay
Graduation freshers ke liye pune ME koi fair job hai