JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

एलएलबी प्रवेशात मोठी अपडेट! ‘बेटरमेंट’साठी पसंतीक्रम भरताना असा करा विचार!! | CET LLB Admission 2026

CET LLB Admission 2026

CET LLB Admission 2026:The CET Cell has announced revised rules for students opting for the ‘betterment’ option in the second admission round of the 3-year law course. Candidates who were allotted a seat in the first round will lose that seat if they reorder their college preferences in the second round and are allotted a new college; however, if they retain their preference order and do not secure a new college, their original seat will remain secure. The seat allotment for the second round is scheduled to be announced on Saturday, August 29.

विधी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळूनही ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुधारित नियमांनुसार, दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार अधिक चांगले महाविद्यालय मिळण्याची संधी कायम राहणार आहे. मात्र, पहिल्या फेरीतील पसंतीक्रमात बदल केला आहे की तो कायम ठेवून दुसऱ्या फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरला आहे, यावर विद्यार्थ्याला कोणते महाविद्यालय मिळणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे बेटरमेंटचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेत ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता पसंतीक्रम भरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत अधिक पसंतीचे महाविद्यालय मिळवण्याची संधी असली, तरी पसंतीक्रमात केलेला बदल विद्यार्थ्याच्या आधीच्या जागावाटपावर थेट परिणाम करू शकतो. सुधारित पसंतीक्रमानुसार नवीन महाविद्यालय मिळाल्यास पहिल्या फेरीतील महाविद्यालयावरील हक्क रद्द होणार आहे; मात्र पहिल्या फेरीतील पसंतीक्रम कायम ठेवून केवळ ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडल्यास नवीन महाविद्यालय न मिळाल्यास आधीचे जागावाटप अबाधित राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीपूर्वी पसंतीक्रमात बदल करायचा की तोच कायम ठेवायचा, याचा निर्णय विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक घ्यावा लागणार आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला आता वेग आला असून, पहिल्या फेरीच्या जागावाटपात हजारो विद्यार्थ्यांना विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. सीईटी सेलमार्फत १९ ऑगस्ट रोजी झालेल्या पहिल्या फेरीच्या जागावाटपासाठी तब्बल ४० हजार ४०३ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवला होता. त्यापैकी १४ हजार ९४८ विद्यार्थ्यांना विविध विधी महाविद्यालयांमध्ये जागा मिळाली, तर २० ते २२ ऑगस्टदरम्यान झालेल्या प्रवेश प्रक्रियेत ५ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.


CET LLB Admission 2026: The 3-year LLB centralized admission process (CAP) in Maharashtra has officially commenced, allowing eligible candidates to fill out their college option forms from August 5 to August 7. According to the State CET Cell, the first seat allotment list will be declared on August 11, after which students must visit their allotted colleges between August 12 and August 17 for physical document verification and admission confirmation. This year, a total of 48,420 students have registered for the course, bringing much-needed relief to candidates after anxious delays that prompted student groups to demand an expedited schedule.

CET LLB Admission 2026

महारष्ट्र राज्यातील ३ वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (CAP) अखेर सुरुवात झाली असून, पात्र विद्यार्थ्यांना ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पसंतीक्रम (ऑप्शन फॉर्म) भरता येणार आहे. राज्य सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पहिल्या फेरीची जागावाटप यादी ११ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १७ ऑगस्ट या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चित करावा लागेल. यंदा या अभ्यासक्रमासाठी एकूण ४८,४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, प्रवेश प्रक्रियेतील विलंबाबाबत विद्यार्थी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर ही प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड