केंद्र सरकार नोकरीसाठी द्यावी लागणार CET! – Central Government New Job Openings
Central Government New Job Openings
Central Government New Job Openings – Till now, the Common Eligibility Test (CET) was conducted for various competitive exams. Now, if you want a central government job, you have to take the CET exam. The posts of Group ‘B’ and Group ‘C’ will be filled through this examination. The CET exam will be conducted by the National Recruitment Institute. The exam is likely to begin from May-June 2024. The exam will be held twice a year. The marks obtained will be valid for three years. The exam will be conducted at more than 1,000 centres in 117 districts.
आतापर्यंत विविध स्पर्धा परीक्षांसाठी सामायिक पात्रता परीक्षा (सीईटी) घेण्यात येत होती. आता केंद्र सरकारची नोकरी हवी असल्यास ‘सीईटी’ परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेद्वारे गट ‘ब’ व गट ‘क’ची पदे भरली जाणार आहेत. ही सीईटी परीक्षा राष्ट्रीय भरती संस्थेमार्फत होणार आहे. मे-जून २०२४ पासून ही परीक्षा सुरू होऊ शकते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे. यात मिळालेले गुण तीन वर्षांसाठी वैध राहतील. ही परीक्षा ११७ जिल्ह्यांत १ हजारहून अधिक केंद्रांवर घेतली जाईल. या बद्दल पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या सीईटीच्या गुणांवर केंद्र सरकारबरोबरच सार्वजनिक उद्योग, राज्य सरकार व खासगी क्षेत्रातील भरती होऊ शकते. सध्या केंद्रीय सरकारच्या विविध विभागांमध्ये विभागवार भरती होत असते. रेल्वे भरती रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, बँकेतील भरतीसाठी आयबीपीएस परीक्षा घेते. याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, या भरती प्रक्रियेमुळे कमीत कमी अवधीत पार पडेल. एक भरती व दुसऱ्या भरतीत कालावधी कमी असेल. केंद्र सरकारतर्फे २०२० मध्ये राष्ट्रीय भरती संस्थेची स्थापना केली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
परीक्षेचा अभ्यासक्रम, फीसाठी समिती
सीईटी परीक्षा अभ्यासक्रम व परीक्षेची फी ठरवण्यासाठी राष्ट्रीय भरती संस्थेने एक कमिटी स्थापन केली आहे. परीक्षेसंदर्भात विविध मुद्यांवर समितीचा अहवाल तयार झालेला आहे. या परीक्षेसाठी जाहीर केला जाऊ शकते. समितीने ही परीक्षा पदवी स्तरावरील सीईटीपासून सुरू करण्याची शिफारस केली आहे.
Central Government New Job Openings &Vacancies – The information about the vacancies is expected from the government and the notification for the recruitment is also going to be issued. It has been said by the government that the number of vacancies in various departments of the government is more than 9.79 lakh. Most posts are vacant in Indian Railways. Total 2.93 lakh posts are vacant in Indian Railways. Union Minister Jitendra Singh has informed that all these posts are vacant till March 1, 2021.
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा (NCS) पोर्टलवर २८ ऑगस्ट २०२३ रोजी नोकरीसाठी दहा लाखांहून अधिक उपलब्ध रिक्त पदांची नोंद करण्यात आली आहे. या रिक्त जागा एनसीएस पोर्टलवर सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी क्षेत्रातील विविध नियोक्त्यांद्वारे नोंदवण्यात आल्या असून, अद्याप भरतीसाठी या जागा खुल्या आहेत. एनसीएस पोर्टलवरील रिक्त जागा नियोक्त्यांद्वारे पोर्टलवर थेट संपर्कांद्वारे आणि विविध खासगी नोकरी -पोर्टलसह एपीआय एकत्रीकरणाद्वारे एकत्रित केल्या जातात.
दहा लाखांहून अधिक उपलब्ध रिक्त पदांपैकी सुमारे एक तृतीयांश रिक्त पदे नव्या उमेदवारांच्या निवडीसाठी अधिसूचित आहेत, यामुळे अनेक तरुण उमेदवारांना त्यांच्या शिक्षणानंतर रोजगाराची संधी मिळू शकेल. एनसीएसवर नोंदणीकृत रिक्त पदांची लक्षणीय संख्या तांत्रिक सहाय्य अधिकारी, विक्री अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लॉजिस्टिक अधिकारी , सॉफ्टवेअर अभियंता, देखभाल अभियंता इत्यादींच्या नोकरीच्या पदांशी संबंधित आहे.
एनसीएस पोर्टलवर नोंदणीकृत रिक्त पदे विविध क्षेत्रांमधील असून, देशभरातील रोजगाराच्या संधींना चालना देणारी आहेत. नोकरीसाठी उपलब्ध रिक्त पदांपैकी ५१ टक्के वित्त आणि विमा तसेच १३ टक्के वाहतूक आणि साठवण क्षेत्रात नोंदवण्यात आली आहेत. एकूण रिक्त पदांमध्ये परिचालन आणि सहाय्य, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण, उत्पादन इत्यादी इतर क्षेत्रांचे योगदान सुमारे १२ टक्के आहे आणि या क्षेत्रांनी जून-ऑगस्ट २०२३ दरम्यान रिक्त पदांमध्ये वाढ नोंदवली आहे. सणासुदीच्या काळात अपेक्षित मागणीसह एनसीएस पोर्टलमधील नोकरीसाठी उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येत वाढ होऊन ती नवीन उच्चांकावर जाऊ शकते.
नोकरीसाठी उपलब्ध एकूण रिक्त पदांपैकी ३८ टक्के रिक्त पदे अखिल भारतीय आधारावर उमेदवारांच्या निवडीसाठी तर १८ टक्के रिक्त पदे अनेक राज्यांमध्ये आवश्यकतेनुसार नियुक्त करण्यासाठी आहेत. उर्वरित रिक्त पदे राज्य विशिष्ट गरजांसाठी आहेत.एनसीएस पोर्टलने १.५ दशलक्षाहून अधिक नियोक्ते नोंदणी करण्याचा आणखी एक टप्पा गाठला आहे. बहुसंख्य (६८%) नियोक्ते सेवा उपक्रमातील आहेत, त्याखालोखाल उत्पादन क्षेत्रातील (२६%) आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना आणि नियोक्त्यांना आवश्यक कौशल्य संचासह योग्य उमेदवार शोधण्यासाठी सेवा देण्याच्या अनुषंगाने नोकरीचा शोध आणि अनुरूप नोकरी, करिअर समुपदेशन, व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती इत्यादी विविध करिअरशी संबंधित सेवा प्रदान करण्याचा एनसीएसचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नुकतेच पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून विविध विभागांतील रिक्त पदांच्या आकडेवारीबाबत माहिती देण्यात आली. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात ९.६४ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. या पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 40 लाखांहून अधिक मंजूर पदे आहेत, ज्यामध्ये 30 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आजही ९.६४ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. 2023 च्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत ही माहिती समोर आली.
देशातील नागरी सेवेत, भारतीय प्रशासकीय सेवेत IAS मध्ये 1,365 पदे आणि भारतीय पोलिस सेवा IPS मध्ये 703 पदे रिक्त आहेत. याशिवाय केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारतीय वन सेवेत (IFS) 1,042 पदे आणि भारतीय महसूल सेवेत (IRS) 301 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी भरती यूपीएससी सीएसई परीक्षेद्वारे केली जाते.
केंद्रीय पोलिसांत १ लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत – केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या पोलिस दलातही लाखो पदे रिक्त आहेत. CRPF, BSF आणि दिल्ली पोलिसांसह विविध संघटनांमध्ये 1,14,245 पदे रिक्त असल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली. या रिक्त पदांसाठी विविध गटांद्वारे भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. गट ‘अ’ मध्ये 3,075, गट ‘ब’ मध्ये 15,861 आणि गट ‘क’ मध्ये 95,309 जागा रिक्त आहेत.
पे रिसर्च युनिट अर्थात PRU ने जारी केलेल्या अहवालानुसार, 1 मार्च 2022 पर्यंत देशातील विविध विभागांमध्ये एकूण 9,64,359 पदे रिक्त होती. तर, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2023 पर्यंत, UPSC, SSC आणि RRB ने केंद्र सरकारच्या नियुक्तीसाठी 4,63,205 उमेदवारांची नियुक्ती केली आहे.
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत नोकरीसाठी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना या पदांवर नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या लाखोंच्या घरात आहे. तुम्हाला देशातील प्रत्येक शहरात अशी अनेक कोचिंग सेंटर्स सापडतील, जिथे तुम्हाला तरुण नोकरीसाठी तयारी करताना दिसतील. आता रिक्त पदांची माहिती सरकारकडून अपेक्षित असून, त्यावरील भरतीसाठी अधिसूचनाही जारी केली जाणार आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या ९.७९ लाखांहून अधिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतीय रेल्वेत सर्वाधिक पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेमध्ये एकूण २.९३ लाख पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे १ मार्च २०२१ पर्यंत रिक्त असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
ही रिक्त पदे भरण्याचे काम सुरू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्था आवश्यक कर्मचाऱ्यांच्या संख्येसाठी नियुक्त्या करत आहेत. जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले की, सरकारने सर्व मंत्रालये/विभागांना रिक्त पदे भरण्यासाठी आधीच सूचना दिल्या आहेत. भारत सरकारकडूनही रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.
कोणत्या विभागात किती रिक्त पदे आहेत?
भारतीय रेल्वेव्यतिरिक्त रिक्त पदांच्या बाबतीत दुसरा क्रमांक संरक्षण (सिव्हिल) विभागाचा आहे. संरक्षण (सिव्हिल) मध्ये रिक्त पदांची संख्या २.६४ लाख आहे. यानंतर गृह विभागांतर्गत १.४३ लाख पदे रिक्त आहेत. यानंतर, महसूल विभागात ८०,२४३ पदे आणि इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स विभागात २५,९३४ पदे रिक्त आहेत. तर एटोमिक एनर्जी विभागात रिक्त पदांची संख्या ९,४६० आहे.
कधी होणार या पदांवर नियुक्त्या?
या पदांवरील नियुक्तीसाठी सातत्याने भरती मोहीम राबविण्यात येत असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी सातत्याने भरती सुरू आहे. वर्षभरात १० लाख रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्टही सरकारने ठेवले आहे. अशा परिस्थितीत येत्या वर्षभरात सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये भरतीसाठी सातत्याने अधिसूचना जारी होतील, अशी अपेक्षा आहे.
सीबीआयमध्ये एक हजाराहून अधिक पदे रिक्त
नवी दिल्ली : सीबीआयला मंजूर करण्यात आलेल्या एकूण ५५३२ पदांपैकी ४५०३ पदे भरण्यात आली. अद्यापही १०२९ पदे रिक्त असल्याची माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी सीबीआयने पावले उचलली आहेत, कार्यकारी श्रेणीतील बहुसंख्य पदे रिक्त आहेत, कार्यकारी श्रेणीसाठी पाच हजार पदे मंजूर करण्यात आली त्यापैकी ४,१४० पदे भरण्यात आली आहेत.
Source:Loksatta