खुशखबर! यंदा कॅम्पस भरती जोरात होणार, नवं पदवीधारकांना भरपूर नोकरीच्या संधी! – Zomato, Flipkart, आणि OLA तयार!
IT Recruitment 2024 : More details are given below.
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, Infosys, TCS, IBM, Wipro आणि LTIMindtree यासारख्या मोठ्या आयटी कंपन्यांनी प्लेसमेंटच्या सुरूवातीच्या टप्प्यासाठी कॅम्पसला भेटी देण्यास सुरूवात केली आहे. पण यावेळी निवड प्रक्रिया खूपच वेगळी असणार आहे. ज्या कंपन्या आतापर्यंत भरपूर नोकऱ्या देत होत्या त्या आता निवडक उमेदवारांनाच निवडतील. त्यांना क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान असलेल्या लोकांची गरज आहे. अशा या पदांसाठी वेतन पॅकेजही ६ ते ९ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.