मुंबई महापालिकेच्या शिक्षक भरतीला वेग; संगीत, चित्रकला विषयांतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर! मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील पवित्र पोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. संगीत आणि चित्रकला विषयांतील पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली असून, त्यांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी निर्धारित वेळापत्रकानुसार आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षक भरतीला वेग; प्राथमिक विभागातील १६१ अनुदानित पदांसाठी १२१ उमेदवार कागदपत्र पडताळणीस पात्र! शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५च्या आधारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत प्राथमिक विभागातील पदांचे रूपांतर करण्यात आले आहे. या प्रक्रियेत एकूण १६१ पदे उपलब्ध करण्यात आली असून, ही सर्व पदे अनुदानित स्वरूपाची आहेत.विविध प्रवर्गांचा विचार करून एकूण १२१ उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांच्या पुढील नियुक्ती प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या शिक्षक भरतीला निर्णायक टप्पा; विविध विषयांतील रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची संख्या निश्चित! इयत्ता पहिली ते पाचवीच्या इंग्रजी माध्यमातील ९७ पदांसाठी ८५ उमेदवार, तर मराठी माध्यमातील २७ पदांसाठी २७ उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय सहावी ते आठवीच्या मराठी माध्यमातील भाषा विषयाच्या २२ पदांसाठी २२, तर गणित-विज्ञानाच्या इंग्रजी माध्यमातील १५ पदांसाठी १५ उमेदवार पात्र आहेत.तसेच, संगीत विषयाची ३ आणि चित्रकला विषयाची २४ पदे उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी निर्धारित वेळेत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेमुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विविध विषयांच्या शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा होणार असून, शिक्षक उपलब्धतेमुळे शैक्षणिक कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

BMC Shikshak Bharti Application Form – मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण सेवकांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल ९३५ पदे भरण्यात येणार असून यासाठी मासिक १६ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी ६ ते ११ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमासह इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. विशेष म्हणजे चित्रकला व संगीत संवर्गामध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे शक्य होत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने मराठी माध्यमासाठी सर्वाधिक ५२५ शिक्षण सेवक ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय इंग्रजी माध्यमासाठी ३५२, चित्रकला संवर्गासाठी १० व संगीत संवर्गासाठी ४८ शिक्षण सेवक भरण्यात येणार आहेत. सरळ सेवेतून भरण्यात येणाऱ्या या पदांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती आदी बाबतच्या सविस्तर माहितीसाठी व अन्य मुंबई महत्त्वाच्या सूचनांसाठी महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षण सेवक (गट-क) या संवर्गातील विविध रिक्त पदांच्या थेट भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून याद्वारे बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण खात्याच्या आस्थापनेवरील एकूण ९३५ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे (Pavitra Portal) सरळसेवेने राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात क्रमांक ईओआर/ओडी/११३ दिनांक ९ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आली असून, यास माननीय महानगरपालिका आयुक्तांची २३ जून २०२६ व १७ जून २०२६ रोजीची पूर्वमंजुरी प्राप्त झालेली आहे. या एकूण ९३५ रिक्त पदांचे माध्यमनिहाय व विषयनिहाय विभाजन करण्यात आले असून यामध्ये मराठी माध्यमासाठी ५२५ पदे, इंग्रजी माध्यमासाठी ३५२ पदे, तर विशेष शिक्षक म्हणून चित्रकला संवर्गासाठी १० पदे आणि संगीत संवर्गासाठी ४८ पदांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण सेवक पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा १६,००० रुपये इतके निश्चित मानधन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध जाहिरातीचे सखोल अवलोकन करून आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची पूर्तता स्वतः तपासून घेणे अनिवार्य आहे.

मराठी माध्यमाच्या शिक्षण सेवक भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी २०१ पदे व इंग्रजी माध्यमासाठी १२९ पदे आहेत. तर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या अन्य आरक्षणांमध्ये काही पदे आहेत. यात अनुसूचित जाती ७२, अनुसूचित जमाती ४९, ओबीसी १६१ पदांचा समावेश आहे तर अन्य पदे अन्य जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. या भरतीमध्ये महिलांसाठी ३० टक्के आरक्षण असून माजी सैनिक १५ टक्के, प्रकल्पग्रस्त ५ टक्के, खेळाडू ५ टक्के, पदवीधर सुशिक्षित बेरोजगार १० टक्के, अनाथ मुलांसाठी १ टक्का व भूकंपग्रस्तांसाठी २ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.
पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलद्वारेच ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा असून संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान सक्रिय व वैध असणारा ई-मेल आयडी अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे, कारण भरतीविषयक सर्व महत्त्वाच्या सूचना व अपडेट्स वेळोवेळी याच ई-मेलवर व ऑनलाईन पद्धतीने पाठवल्या जातील. या भरती प्रक्रियेत सामाजिक व समांतर आरक्षणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले असून विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मराठी माध्यमाच्या ५२५ पदांमध्ये अनुसूचित जातीसाठी ३७, अनुसूचित जमातीसाठी १५, विमुक्त जाती (अ) साठी २२, भटक्या जमाती (ब) साठी ६, भटक्या जमाती (क) साठी १२, विशेष मागास प्रवर्गासाठी १७, इतर मागासवर्गीयांसाठी १०९, सामाजिक व शैक्षणिक मागासप्रवर्गासाठी ५३, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ५३ आणि खुल्या प्रवर्गासाठी २०१ पदे राखीव ठेवली आहेत. इंग्रजी माध्यमाच्या ३५२ पदांमध्ये अनुसूचित जातीसाठी ३५, अनुसूचित जमातीसाठी ३४, विमुक्त जाती (अ) साठी १६, भटक्या जमाती (ब) साठी ३, भटक्या जमाती (क) साठी ९, विशेष मागासप्रवर्गासाठी ४, इतर मागासवर्गीयांसाठी ५२, ईडब्ल्यूएससाठी ३५, एसईबीसीसाठी ३५ आणि खुल्या प्रवर्गासाठी १२९ पदे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय चित्रकला संवर्गातील १० पदांपैकी अनुसूचित जमातीसाठी ४, ईडब्ल्यूएससाठी १, एसईबीसीसाठी १ आणि खुल्या प्रवर्गासाठी ४ पदे उपलब्ध आहेत, तर संगीत संवर्गातील ४८ पदांमध्ये अनुसूचित जमातीसाठी ६, विमुक्त जाती (अ) साठी २, भटक्या जमाती (ब) साठी २, भटक्या जमाती (क) साठी १, भटक्या जमाती (ड) साठी १, इतर मागासवर्गीयांसाठी १, ईडब्ल्यूएससाठी ५, एसईबीसीसाठी ५ आणि खुल्या प्रवर्गासाठी २५ पदे ठेवण्यात आली आहेत. समांतर आरक्षणांतर्गत ३० टक्के महिला आरक्षणासह माजी सैनिक (१५%), प्रकल्पग्रस्त (५%), भूकंपग्रस्त (२%), खेळाडू (५%) आणि सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन पदवीधरांसाठी (१०%) पदे राखीव आहेत. तसेच शासन निर्णयानुसार अनाथ मुलांसाठी १ टक्के आरक्षण ठेवण्यात आले असून मराठी माध्यमात ५ तर इंग्रजी माध्यमात ४ पदे अनाथ घटकासाठी आरक्षित आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग उमेदवारांसाठी ४ टक्के आरक्षणाची तरतूद असून मराठी माध्यमात १८, इंग्रजी माध्यमात ११, चित्रकला संवर्गात १ आणि संगीत संवर्गात २ पदे दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत. भरती प्रक्रियेसंदर्भातील अटी, नियम आणि अर्जाच्या पद्धतीबाबत प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.
प्रत्येक उमेदवारास केवळ एकच ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली असून, जर एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेळेस अर्ज नोंदवला तर त्याची फक्त शेवटचीच नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्याची सवलत देण्यात आली आहे; मात्र त्यासाठी अराखीव गटासाठी विहित केलेली वयोमर्यादा व इतर पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक राहील. अर्जामध्ये मूळ जात प्रवर्गाची अचूक माहिती नमूद करणे सर्व आरक्षित उमेदवारांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांना वित्तीय वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ करिता महाराष्ट्र शासनाने विहित केलेली कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावी लागतील. दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्व असणे अनिवार्य असून ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असणारे उमेदवार या आरक्षणासाठी अपात्र ठरतील. प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलप्रकल्पांसाठी जमीन संपादित झालेल्या कुटुंबातील तसेच ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पातील बाधित व्यक्तींची गणना या आरक्षणात केली जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट करण्याचा, सामाजिक व समांतर आरक्षणात बदल करण्याचा अथवा ही संपूर्ण भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर अंशतः किंवा पूर्णतः रद्द करण्याचा अंतिम अधिकार माननीय आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आला असून या निर्णयावर कोणत्याही प्रकारचा वाद उपस्थित करता येणार नाही. अधिक माहिती खालील लिंक वर पूर्ण जाहिरात दिली आहे ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















