JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

कंडक्टर परीक्षेचा पेपर ‘स्पर्धा परीक्षा’ पॅटर्नवर; उमेदवारांच्या तक्रारी !! – BEST Mumbai Bharti 2026

BEST Mumbai Bharti 2026

BEST Mumbai Bharti 2026 :बेस्ट कंडक्टर भरतीच्या ऑनलाइन परीक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नपत्रिकेवर बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले. कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उच्चशिक्षितांच्या स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवरील प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्नांचा बेस्टच्या दैनंदिन कामकाजाशी थेट संबंध नसल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत सदस्यांकडे तक्रारी केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बेस्ट कंडक्टर भरतीच्या परीक्षेवरून बेस्ट समितीच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली! टीसीएसकडून घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नांवर उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर, टीसीएसकडे सोपविलेली परीक्षा प्रक्रिया रद्द करून बेस्टने स्वतःच परीक्षा घ्यावी, अशी मागणी समिती सदस्यांनी केली. बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत बस कंडक्टर भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका तसेच सामान्य प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी अहर्ता शिथिल करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी टीसीएसने घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेत बेस्टच्या कामकाजाशी संबंध नसलेले प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे अनेक उमेदवारांनी तक्रारी केल्याची माहिती बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली. या मुद्द्यावर बैठकीत जोरदार चर्चा होऊन परीक्षा पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

कंडक्टर भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी मान्य करत टीसीएसने उमेदवारांना अतिरिक्त ७ गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, १०० पैकी ३५ गुणांऐवजी उत्तीर्ण होण्यासाठी ५० गुणांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, परीक्षा प्रक्रियेत करण्यात आलेले हे बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी याबाबत भूमिका मांडली.

BEST Mumbai Bharti 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

BEST Mumbai Bharti 2026 : Bombay Electric Supply & Transport (BEST) Mumbai, has invited applications for the posts of “Bus conductor”. There are 364 vacancies available to fill posts. Eligible and interested candidates can apply through the link before the last date. The last date for submission of applications is 29th of July 2026. For more details BEST Mumbai Bharti 2026, BEST Mumbai Notification 2026, BEST Mumbai Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.

Join Free BEST Mumbai Online Test Series

बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई अंतर्गत “बस वाहक” पदांच्या 364 रिक्त जागा भरण्यासाठी व प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२६ आहे. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि निवडप्रक्रिये बद्दलची पूर्ण माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट मुंबई भरती २०२६

  • पदाचे नाव – बस वाहक
  • पदसंख्या – 364 जागा
  • शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण     (ii) बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge)
          • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • शारीरिक पात्रता: उंची किमान 154 सेमी व कमाल 178  सेमी, वजन किमान 45 kg
  • वयाची अट: 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ०८ जुलै २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जुलै २०२६
  • अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bestundertaking.com/

BEST Mumbai Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
बस वाहक364

How To Apply For BEST Mumbai Application 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२६ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bestundertaking.com Arj 2026

⇒ Online Mock TestStart
🎯SyllabusDownload
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/BQ3XH
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33178/100842//Index.html
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.bestundertaking.com/

Table of Contents

1 thought on “कंडक्टर परीक्षेचा पेपर ‘स्पर्धा परीक्षा’ पॅटर्नवर; उमेदवारांच्या तक्रारी !! – BEST Mumbai Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड