JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘एमपीएससी’च्या अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडथळे, OTP मिळत नाही! – MPSC OTP Problem

‘एमपीएससी’च्या अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडथळे – MPSC OTP Problem – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC ) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठी वाढ झाल्याने उमेदवारांना नव्याने अर्ज आणि पर्याय सादर करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज नोंदणीदरम्यान जीमेलवर एकदाच वापरता येणारा संकेतांक (ओटीपी) प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे कठीण झाले असून, वाढीव संधी मिळूनही उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी यापूर्वी ५ हजार ७०७ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्य शासनाच्या निर्णयानंतर आयोगाने आणखी ११ हजार १० पदांचा समावेश केला. त्यामुळे आता एकूण १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. वाढीव पदांच्या अनुषंगाने उमेदवारांना १३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नव्याने अर्ज आणि पर्याय सादर करण्याची मुदत -देण्यात आली आहे. पदसंख्येतील वाढीमुळे मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

MPSC OTP Problem

एमपीएससीच्या अर्ज प्रक्रियेचा संपूर्ण तांत्रिक तपास करण्यात आला. यात कुठल्याही प्रकारचा दोष आढळून आलेला नाही. तरीही विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचण येत असल्यास त्यांनी आमच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणी तत्काळ सोडवल्या जातील. अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज दररोज भरले जात आहेत. असे निवेदन MPSC द्वारे करण्यात आले आहे. तरी उमेदवारांना काही अडचण आल्यास त्यांनी मदत केंद्राला संप्रर्क करावा.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड