अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड अहर्ताधारकांनी केले अर्ज! BE, BEd Applied For Anganwadi Sevika Bharti
BE, BEd Applied For Anganwadi Sevika Bharti
अलीकडे कुठल्याही विभागाची भरती असो त्यात शिक्षित बेरोजगारीचे दर्शन घडत आहे. अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड, एम. ए. शैक्षणिक अर्हताधारकांनी तर मदतनीस पदासाठी पदवीधारक उमेदवारांनी अर्ज केले असल्याची बाब पुढे आली आहे. यावरून उच्च शिक्षित उमेदवारांची नोकरीच्या शोधात कशी धडपड सुरू याची वास्तविकता पुढे आली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रात ५२ अंगणवाडी सेविका व ३६ मदतनीस पदाची भरती प्रक्रिया महिला व बालविकास विभागाद्वारे सुरू आहे. या एकूण ८८ पदासाठी जिल्ह्यातून १२३९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक कागदपत्रांनुसार गुणांकन करण्यात येणार आहे. बारावीचे टक्केवारीनुसार कमाल गुण ६०, पदवीधर असल्यास १० गुण, पदव्युत्तर असल्यास ४ गुण, डी. एड. २ गुण, बी.एड २ गुण, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असल्यास २ गुण देण्यात येतील. विधवा व अनाथ उमेदवारांना अतिरिक्त १० गुण देण्यात येणार.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उमेदवारांना ५ गुण, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग उमेदवारास ३ गुण आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास ५ गुण दिले जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत संपली. आता अर्जाच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात अर्ज केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता पाहून अधिकारी व कर्मचारीसुद्धा आश्चर्यचकित झाले. अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड, डीएड, विधी पदवी, एम.ए, बी. एस्सी शैक्षणिक अर्हताधारकांनी अर्ज केले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांशी संपर्क करून त्यांची निवड करून देण्याचे आमिष, भूलथापा देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहे त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडून आपली फसवणूक करून घेऊ नये. उमेदवारांनी याची खबरदारी घ्यावी.
दहा दिवसांत प्रसिद्ध होणार पहिली निवड यादी
याद्या संबंधित महसुली गावात प्रसिद्ध करून हरकती मागविल्या जातील. त्या हरकती १० दिवसांच्या कालावधीत प्रकल्प कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
प्राप्त हरकतींचे निराकरण झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिले जाणार
तोंडी परीक्षा नाही थेट होणार निवड
सदर प्रक्रियेमध्ये शैक्षणिक कागदपत्रानुसारच गुणदान करण्यात येणार आहेत. गुणानुक्रमानुसार उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची तोंडी परीक्षा घेतली जाणार नाही.
अर्जाची पडताळणी करण्यासाठी समिती
अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदासाठी प्राप्त झालेल्या एकूण १२३९ अर्जाची पडताळणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची गुणवत्ता पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे.