BARTI Training Program 2026
सामयिक प्रवेश परीक्षा (CET २०२६) बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प, योजना तसेच विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. बार्टी मार्फत सन २०२६ करिता राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण बाबतची जाहिरात दिनांक ०७/०८/२०२६ रोजी बार्टीच्या संकेतस्थळावर तसेच विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सन २०२६ करीता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CET २०२६) पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सामयिक प्रवेश परीक्षा (CET २०२६) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची अधिकृत लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सर्वांनी https://barticet2026.cbtexam.in या लिंकचा वापर करून आपला अर्ज विहित वेळेत सादर करावयाचा आहे. तसेच त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे सोबत जोडण्यात येत आहेत.
BARTI Training Program 2026
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन – प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत अनुसूचित जातीच्या महिला – पुरुषांसाठी एक व दोन महिना कालावधीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व उद्योजकता परिचय मेळावा मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी २०२६) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र, उद्योग भवन, सातपूर आयटीआयजवळ, त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी यांनी केले आहे. एक महिना कालावधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कॉम्प्युटर डी.टी.पी. वर आधारित, वेब डिझायनिंग व गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगवर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दोन महिने प्रशिक्षणात इंडस्ट्रियल ऑटोमेशन विथ आय.ओ.टी., अप्लाइड डेटा सायन्स अॅण्ड अॅनालिटिक्स, अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग सर्व्हिसेस अॅण्ड सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
BARTI Training Program 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि बोर्डे एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील युवकांना स्पोकन इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास यांचे तीन महिन्यांचे अनिवासी प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू असून उमेदवारांना शनिवार (दि.१०) पर्यंतची संधी असेल. इच्छुक उमेदवारांनी जातीचा दाखला, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि फोटो यांसह ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष केंद्रावर भेट देऊन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण सोमवार (दि. १२) पासून सुरू होणार असून, अर्ज करण्यासाठी शनिवारपर्यंतची, तर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी रविवार (दि. ११) पर्यंतची मुदत असेल.
BARTI Training Program 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत कौशल्यविकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ऑटो कॅड, सॉलिडवर्क्स, मास्टरकॅम, युनिग्राफिक्स, सीएनसी प्रोग्रामिंग, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, इलेक्ट्रो-न्युमॅटिक्स, एम्बेडेड सिस्टिम्स, रोबोटिक्स, संगणक हार्डवेअर व नेटवर्किंग, तसेच सिव्हिल व मेकॅनिकल अभियांत्रिकीशी संबंधित विविध आधुनिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रशिक्षण कालावधी ४८ ते ९६ दिवसांचा असून औरंगाबाद, नागपूर, पुणे, कोल्हापूर व वाळूज (औरंगाबाद) येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये हे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून प्रशिक्षणासोबत राहणे व जेवणाची सुविधाही मोफत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित प्रशिक्षण केंद्रांशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

BARTI Training Program 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४’ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे मुलाखत तयारीसाठी १० हजारांचे एकरकमी आर्थिक साहाय्य देणारी विशेष योजना राबविण्यात येत असल्याची माहिती बार्टीने जाहीर केली आहे. ‘वनसेवा मुख्य परीक्षा-२०२४’ चा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. मुलाखतीची तयारी अधिक सक्षमपणे करता यावी आणि उमेदवारांना भासत असलेला आर्थिक ताण कमी व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे बार्टीकडून सांगण्यात आले.

पात्रतेचे निकष आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अर्थसाहाय्यासाठीची सविस्तर जाहिरात, पात्रतेचे निकष आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी निश्चित कालावधीत अर्ज भरावा, असे संस्थेकडून आवाहन करण्यात आले आहे. बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी राज्यातील सर्व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बार्टीच्या संकेतस्थळाला barti.maharashtra.gov.in भेट द्यावी, असे असे आवाहन केले आहे.
बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आर्टी या संस्थांच्या मार्फत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी CET (सामयिक प्रवेश परीक्षा) अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार 28 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच, 29 आणि 30 ऑगस्ट 2025 या काळात अर्जात काही चुका असल्यास त्या सुधारण्याची आणि अर्जाची प्रिंट काढण्याची संधी मिळेल. बार्टी संस्थेने 29 आणि 30 जुलै 2025 रोजी याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती. इच्छुक उमेदवारांनी बार्टी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज दि. 20/08/2025 पर्यंत सादर करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे जाहिरातीत म्हटले होते. पण आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. आता या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठीचा अर्ज 28 ऑगस्ट 2025 पर्यंत भरता येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक आणि सामाजिक विकास साधायचा आहे, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. अर्ज भरताना काही अडचण आल्यास, 29 आणि 30 ऑगस्टला तुम्ही अर्ज दुरुस्त करू शकता. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे. अर्ज फक्त संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारले जातील. या प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थ्यांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आणि गुणांकन पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता, आरक्षण व सीईटीमधील गुणांच्या आधारे अंतिम निवड ही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संनियंत्रण व अंमलबजावणी समितीमार्फत केली जाणार असल्याचे बार्टीतर्फे कळविण्यात आले आहे.
इस्त्रायलमध्ये ५ हजार पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित करा ऑनलाईन अर्ज!
योजना राबविणाऱ्या संस्था कोणत्या आहेत?
- BARTI (बार्टी) – अनुसूचित जातींसाठी
- TRTI (टीआरटीआय) – अनुसूचित जमातींसाठी
- SARTHI (सार्थी) – मराठा आणि अनसूचित प्रवर्गासाठी
- MahaJyoti (महाज्योती) – ओबीसी/इतर मागासवर्गीयांसाठी
- ARTI (आर्टी) – आर्थिक दुर्बल घटकांसाठी
काय मिळणार प्रशिक्षणात?
- स्पर्धा परीक्षेची सखोल तयारी
- चाचणी परीक्षा (Test Series)
- तज्ञ मार्गदर्शन
- इंटरव्यू तयारी
- विद्यार्थी कल्याणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि स्किल टेक साई फाऊंडेशन – साइटस्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील ३६० युवक-युवतींसाठी मोफत उद्योगआधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ऑटोमोबाईल टेलिकॉलर, ऑटोमोबाईल सेल्स एक्झिक्युटिव्ह, फोर व्हीलर टेक्निशियन, लाईट मोटर वाहनचालक, ऑटोमोबाईल सर्व्हिस अॅडव्हायजर तसेच थ्री व्हीलर ड्रायव्हर अशा विविध कोर्ससाठी प्रवेश दिला जाणार आहे.
संबंधित कोर्सचे कालावधी १३ ते १६ आठवड्यांपर्यंत असून, पात्र उमेदवारांकडून ९वी ते आयटीआय किंवा तत्सम पात्रता आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ऑटोमोबाईल स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल (ASDC) कडून प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच, पात्र उमेदवारांना बार्टीकडून ४,००० ते ६,००० रुपयांपर्यंत मानधन देखील दिले जाईल.
प्रवेशासाठी ६ ते ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत नावनोंदणी करता येणार असून, प्रशिक्षणात कौशल्य व व्यक्तिमत्व विकास, नोकरीची हमी, वाहतूक व निवास सुविधा तसेच तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
BARTI IBPS Training Program 2023
BARTI Training Program 2023: Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), Pune invites applications from candidates for free non-resident training for the preparation of competitive examinations for IBPS, LIC, Railway, Bank Clerk and similar posts to 150 students for Kolhapur district and 150 students for Gondia district for Scheduled Caste youth and girls of Maharashtra State through Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), Pune had come The last date of making the said application was October 26, 2023. Candidates are hereby informed that the last date for submission of online application is being extended till 20th November, 2023.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक- युवतीसाठी कोल्हापुर जिल्ह्याकरीता १५० विद्यार्थ्यांना व गोंदिया जिल्ह्याकरीता १५० विद्याथ्र्यांना आय.बी.पी.एस. एल. आय. सी., रेल्वे, बँक लिपीक व तत्सम पदांच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षणाकरीता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सदरील अर्ज करण्याची अंतिम दि. २६ ऑक्टोंबर, २०२३ होती. उमेदवारांना कळविण्यात येते की, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक २० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
उमेदवारांनी खालील QR Code Scan करून अथवा खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंबंधी काही अडचणी उद्भवल्यास बार्टी संस्थेच्या हेल्पलाईन अथवा ई-मेल द्वारे संपर्क करावा..
अर्ज करण्याची अंतिम दिनांक व ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. ०१ / ११ / २०२३ पासून https://docs.google.com/forms/d/1vf- Tjs1PUqdu_HZwFnWZewlltNXr Freb86qBgm taM / edit या लिंकवर ऑनलाईन अर्जाची नोंदणी करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग- गारोडी, मांग-गारुडी, घटकातील १५० प्रशिक्षणार्थ्यांना आय.बी.पी.एस. (IBPS), एल. आय. सी., रेल्वे, बँक लिपिक व तत्सम पदोच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी निःशुल्क निवासी प्रशिक्षणाकरिता हितोपदेशक बहुउद्देशीय संस्था, अकोला प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून अकोला या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. करिता पात्र उमेदवारांकडून दिनांक २० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्रता :
१) उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग- गारोडी, मांग-गारुडी घटकातील असावा.
२) उमेदवाराचे वय वर्ष १८ ते ३४ पर्यंत असावे. ३) उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.
४) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
५ ) उमेदवार दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा दाखला साक्षांकित प्रत सादर करावी.
उमेदवार निवडीचे निकष :
- एकूण प्राप्त अर्जातील उमेदवारांची चाळणी परीक्षेद्वारे गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात येईल.
- पात्र उमेदवारांची उत्पन्न मर्यादा रु. ८ लाखांपर्यंत असावी.
चाळणी परीक्षेचे स्वरूप :
संबंधित पूर्व प्रशिक्षण आय.बी.पी.एस., एल. आय. सी., रेल्वे, बँक लिपिक व त्या समकक्ष पदाच्या परीक्षेच्या धर्तीवर असेल.
प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती:
आरक्षण ३०% जागा महिलांसाठी राखीव.
४% जागा दिव्यांगांकरिता राखीव.
ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख २०/११/२०२३
प्रशिक्षण कालावधी ०६ महिने (निवासी)
प्रशिक्षण कालावधीदरम्यान उमेदवारांना निवास, चहा, नाश्ता व भोजन व्यवस्था प्रशिक्षण केंद्रामार्फत केली जाईल.
सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा घोरणात्मक पेचप्रसंग इ. निर्माण झाल्यास याबाबतचे सर्व अंतिम अधिकार मा. महासंचालक, बार्टी यांना राहतील.
प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी दरम्यान कोणताही शासकीय / निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. उमेदवारांना बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षा तयारीसाठी रु. ५,०००/- किंमतीचे पुस्तकांच्या खरेदीसाठी लाभ देण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ७५ टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टीमार्फत (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, UPSC नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण आणि बैंक (IBPS) रेल्वे, एल. आय. सी. इ. व तत्सम स्पर्धा परीक्षांचे यापूर्वी प्रशिक्षण घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षण कालावधीदरम्यान निवासी व भोजनाची हितोपदेशक बहुउद्देशीय संस्थेमार्फत निःशुल्क व्यवस्था
करण्यात येईल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक व ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लिंक
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. २०/११/२०२३ पर्यंत https://docs.google.com/forms/d/1TcOTpHb XxSpn1kxMZxxJIH6f4c2Uy QuR98X9GEhAwk/edit या लिंकवर
ऑनलाईन अर्जाची नोंदणी करावी
| 1 | Extension for IBPS Non Residential Kolhapur and Gondia | ![]() Announcements | Download (3.3mb) | 31-10-2023 |
| 2 | Extension for IBPS Residential Akola | ![]() Announcements | Download (3.3mb) | 31-10-2023 |
| 3 | Retender IBPS of Residential Chh. Sambhajinagar | ![]() Announcements | Download (3.3mb) | 31-10-2023 |
| 4 | Cancellation IBPS of Residential Chh. Sambhajinagar | ![]() Announcements | Download (3.3mb) | 31-10-2023 |
| 5 | Announcement for IBPS | ![]() Announcements | Download (3.3mb) | 31-10-2023 |
BARTI Training Program 2023
BARTI Training Program 2023 : Scheduled Caste Category (SC) students preparing for the competitive examination Dr. MPSC Prelims Training will be provided by Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI). For this, 200 students were to be selected earlier in each department of the state. However, the number of these seats has been increased from 200 to 1000 for Pune division. Meanwhile, BARTI Director General Sunil Vare has announced an important decision that this training will be given to 300 students instead of 200 by increasing the number of seats in Nashik division by 100. Know More about BARTI Training Program 2023 at below:
अनुसूचित जाती प्रवर्गातील (एस. सी.) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने एमपीएससी पूर्वपरीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात यापूर्वी २०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार होती. परंतु, पुणे विभागासाठी २०० वरून या जागांची संख्या १ हजार इतकी करण्यात आली आहे. तर, नाशिक विभागातील जागांमध्येही १०० ने वाढ करत २०० ऐवजी ३०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी जाहीर केला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासह त्यांना सरकारी नोकरीतही संधी मिळावी, यासाठी बार्टीच्या वतीने स्पर्धा परीक्षा तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते. यासाठी एकूण जागांची निश्चितीही केली आहे. त्यानुसार विभागनिहाय जागांचीही संख्या आधीच स्पष्ट करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे विभागासाठी ती पूर्वी प्रत्येकी २०० होती. परंतु, पुणे आणि नाशिकमध्ये ही संख्या वाढविली आहे. पुण्यात तब्बल ८०० जागांची वाढ करत त्या १००० केल्या आहेत. तर नाशिकमध्ये १०० जागांची वाढ केल्याने आता ३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात सहभागी होता येईल.
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची चाचणी परीक्षेद्वारे निवड केली जाईल. त्यात गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थी निवड केली जाते. परीक्षा दिलेल्यांना अर्ज करण्याची गरज नाही. १९ सप्टेंबर रोजी बार्टीने एमपीएससी बार्टी सीईटी २०२३ परीक्षा घेतली होती. – त्यात जे विद्यार्थी सहभागी होते, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असेही बार्टीने कळविले आहे.
स्पर्धा परीक्षा तयारीसाठीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित इच्छूक उमेदवारांनी ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत. त्यात आधार कार्ड नंबर आणि जन्मतारीख ही माहिती अचूक भरण्याबाबत बार्टीने स्पष्ट सूचित केले आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
BARTI Training Program 2022
BARTI Training Program 2022 : Free residential training program for pre-preparation for clerical class competitive examination at Scheduled Caste Mang, Mantag, Minimadiga, Dakhni-Mang, Mang-Mhashi, Madari, Garudi, Radhe Mang, Mang-Garodi, Bank for the youth of Mang-Garudi community, Railways, LIC in Maharashtra. Further details are as follows:-
Competitive Coaching Exam – BARTI
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मांग-गारुडी इतर तत्सम संवर्गातील ५० विद्यार्थ्यांना आय.बी.पी.एस., एल.आय.सी., रेल्वे, बँक लिपीक व त्या समकक्ष पदाच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी ४ महिन्यांच्या कालावधीचे (निवास व भोजन व्यवस्थेसह) मोफत प्रशिक्षण कार्यक्रम (कोचिंग क्लासेस) खाजगी संस्थेच्या माध्यमातून ओम व्हिजन ॲकॅडमी पुणे या एका ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मांग, मांतग, मिनिमादिगा, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधे मांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी समाजातील युवक-युवतींसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. मध्ये लिपीक वर्गीय स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम
वरील जातींच्या इच्छुक व पात्र युवक-युवतींना Website:http//:barti.maharashtra.gov.in या वेबसाईट वरुन ‘Notice Board’ च्या सदराखालील Coachings Mang-Matang लिंक वरून अर्ज डाऊनलोड करुन किंवा खालील नमूद संस्थेच्या कार्यालयातून प्राप्त करून, खालील ओम व्हिजन ॲकॅडमी प्रशिक्षण ओम व्हिजन अॅकॅडमी, स्वाध्याय महाविद्यालय, तळ मजला, लक्ष्मी रोड, सदाशीव पेठ, पुणे-४११०३०. संपर्क क्र. ९०६७४३६०८४ माध्यमातून राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी पुणे महसूल विभागातील केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज दि. १५/०७/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावे. सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास त्यामध्ये बदल करण्याचे |अथवा सदर जाहिरात रद्द करण्याचे सर्व अधिकार महासंचालक, बार्टीस तसेच शासनास राहतील.
BARTI Exam Training 2022

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















