बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात 43,613 जागांवर पदभरती होणार – Baramati Namo Rojgar Melava

Baramati Namo Rojgar Melava

Baramati Namo Rojgar Melava Registration

Baramati Namo Rojgar Melava: As many as 311 entrepreneurs will participate in the Namo Rozgar Melavy and 43 thousand 613 posts will be filled, Baramati sub-divisional officer Vaibhav Navadkar and Tehsildar Ganesh Shinde informed. He gave this information in a press conference organized in the background of Namorojgar Mela in Baramati. He said that in the upcoming Namo Rojgar Mela in Baramati, 43,613 posts will be filled, there are various halls of various companies and various companies are trying to give appointment letters on the spot after conducting interviews. To get all the further updates regarding this recruitment on time, download the official mobile app of Mahabharti in your mobile by clicking here.

Baramati Namo Rojgar Melava will be conducted for More number of vacancies on 2nd and 3rd March 2024. This rojgar Melava will be conducted in Offline Mode. Details are given below:

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Baramati Namo Rojgar Melava – येथे होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये तब्बल 311 उद्योजक सहभागी होणार असून 43 हजार 613 जागांवर पदभरती केली जाणार आहे, अशी माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. बारामतीत नमोरोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. येत्या बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यात 43,613 जागांवर पदभरती होणार होणा-या या मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांची विविध दालने असून मुलाखती घेऊन जागेवरच नियुक्तीपत्र देण्याचा विविध कंपन्यांचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन दोन मार्च रोजी सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठान संकुलातील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, सांगली परिसरातून युवक येणार आहेत. दोन दिवस हा रोजगार मेळावा सुरू राहणार आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चहापान, भोजन व नाश्त्याची सोय राज्य शासनामार्फत मोफत केली जाणार असल्याचेही वैभव नावडकर यांनी सांगितले. दरम्यान या मेळाव्यासाठी येणाऱ्या युवकांना कोणतीही गैरसोय सहन करावी लागू नये, या उद्देशाने आज बारामतीत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, वैभव नावडकर, गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बारामतीतील हा मेळावा उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आजपर्यंत या मेळाव्यासाठी 14000 हून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन नोंदणी न करणा-या युवकांना जागेवर आल्यानंतर देखील या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.

विविध विभागांमधील पदवीधर विद्यार्थी या मेळाव्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या मेळाव्या दरम्यान करियर मार्गदर्शनाचे चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पदवीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत.

या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नियोक्तांसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Baramati  Namo Rojgar Melava Application

Baramati  Namo Rojgar Melava Application

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Baramati Job Fair 2024

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/R1ISt0Z
✅ नोंदणी करा https://t.co/dDeecrFkHI


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड