Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बँकेत नोकऱ्या वाढल्या- बँकेत १.२३ लाख उमेदवारांना नोकऱ्या! । Bank Jobs 2024

Bank Jobs 2024

Bank Jobs 2024

राष्‍ट्रीयकृत बँकांमधील कर्मचा-यांची रिक्‍त पदे तात्‍काळ भरती करावी अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनो लोकसभेत केली. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी ‘जनधन योजना’ जाहीर केल्‍यानंतर ५१ कोटी ग्राहकांनी बँकांमध्‍ये खाली उघडून रू. २ लाख कोटींच्‍या ठेवी बँकांमध्‍ये जमा झाल्‍या आहेत. यापैकी बहुतांशी ठेवीदार आर्थिक दुर्बल घटक आहेत, परिणामी बँकांशी व्‍यवहार करणे त्‍यांना गैरसोयीचे होते. क्‍लार्क व शिपाई ही रिक्‍त पदे तात्‍काळ भरती करण्‍यात यावी, अशी आग्रही मागणी नियम ३७७ केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

देशात राष्‍ट्रीयकृत बँकांमध्‍ये सन २०१२ साली २२ हजार क्‍लार्क पदांवर भरती करण्‍यात आली. परंतू सन २०२३ साली फक्‍त ६ हजार क्‍लार्क पदांवर भरती करण्‍यात आली. सन २०१३ साली ३ लाख ९८ हजार क्‍लार्क कार्यरत होते. आजमितीस फक्‍त २ लाख ५७ हजार क्‍लार्क कार्यरत आहेत, म्‍हणजेच १ लाख क्‍लार्क पदे रिक्‍त आहेत. बहुतांश कामे आऊटसोर्सींगने केली जातात, त्यामुळे बँकांमध्‍ये काम करू इच्छिणा-या युवकांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. कर्मचा-यांची संख्‍या कमी असल्‍यामुळे पैसे भरणा करण्‍यासाठी व पैसे काढण्‍यासाठी एकच खिडकी सुरू असते, परिणामी मोठ्या प्रमाणात ग्राहक रांगेत उभे असतात. ऑनलाईन पेमेंट, डेबीट व क्रेडीट कार्ड, ई-कॉमर्स यासारख्‍या सुविधा असल्‍या तरी ज्‍येष्‍ठ व अशिक्षित नागरीक या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. एटीएम सुविधांवर देखील चार्जेस लावले जातात अशी सविस्तर माहिती त्यांनी दिली.

 


भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार २०२३ या आर्थिक वर्षात सरकारी तसेच खासगी बँकांनी तब्बल १,२३,००० नोकऱ्या दिल्या. २०२२ च्या तुलनेत बँक कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल ६१ टक्क्यांनी वाढली आहे. वार्षिक आकडेवारीचा विचार करता एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ७.४ टक्क्यांनी वाढून १७.६ लाखांवर पोहोचली आहे.  स्टाफिंग एजन्सी एक्सफेनोच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार सर्वांत मोठ्या १५ बँकांनी २०२३मध्ये प्रत्येक दिवशी सरासरी ३५० कर्मचाऱ्यांची भरती केली. यात एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, इंडसइंड, आयडीएफसी फर्स्ट, बंधन व एयू बँक आदींचा समावेश आहे. 

 

जाणकारांच्या मते किरकोळ कर्जाची वाढती मागणी, गृहकर्जाच्या मागणीत वाढ आणि अर्थव्यवस्थेला मिळालेली गती यामुळे बँकांमध्ये अधिक मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. चांगल्या विकासदरामुळे ग्रामीण भागातही आशादायक चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक उद्योजक संधीचा लाभ उठवण्याच्या तयारीत आहे. बँका मोठ्या प्रमाणावर निमशहरी तसेच ग्रामीण भागात शाखा सुरू करीत आहेत. आपला विस्तार वाढवत आहेत. त्यामुळे त्यांना वाढीव मनुष्यबळाची गरज भासत आहे.

 

आर्थिक वर्ष २०११मध्ये बँकिंग क्षेत्रात १,२५,००० नोकऱ्या दिल्या, तर २०१२ या आर्थिक वर्षात १,२४,००० जणांना भरती करण्यात आले. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि बंधन बँकेने चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत तब्बल ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

 


Bank Jobs 2023: The month of November has brought good news for the candidates who are preparing for the bank exam! Because bumper recruitment will be held in many banks in the month of November. These include SBI, Central Bank, IDBI Bank and Cent Bank Home Finance Ltd. Online application will be invited from eligible candidates according to the post in this bank. However, all the eligible candidates should visit the official website of these banks to check more information

बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोव्हेंबर महिना घेऊन आला आहे खुशखबर! कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक बँकांमध्ये होणार आहे बंपर भरती. यामध्ये SBI, सेंट्रल बँक, IDBI  बँक आणि Cent Bank Home Finance Ltd यांचा समावेश आहे. या बँकेमध्ये पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहे. तरी सर्व पात्रधारक उमेदवारांनी या बँकांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती तपासावी.

कोणत्या बँकेत किती पदे रिक्त?

  • स्टेट बँक ऑफ इंडिया – 14220
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 03+
  • महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक – 12
  • सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड  -60
  • IDBI बँक – 2100

Bank Jobs 2022: The latest update for Bank Jobs!! As per the latest news, It has been decided to fill more than 41 thousand vacant posts in government banks. There are a total of 8,09,586 posts sanctioned in government banks and 5 percent i.e. 41,177 posts are vacant. Bank Recruitment 2022 will be soon. Further details are as follows:-

सरकारी बँकांतील रिक्त पदे भरण्याची जय्यत तयारी केंद्रीय वित्त मंत्रालयाने चालविली असून नुकतीच यासंबंधीची एक बैठक पार पडल्याचे समजते. रिक्त पदांमुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारी बँकांमध्ये रिक्त असलेली ४१ हजार पेक्षा अधिक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
  • मागील १० वर्षांत देशात बँक शाखांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे.
  • कर्मचाऱ्यांची संख्या मात्र वाढण्याऐवजी १ टक्क्याने घटली आहे.
  • बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या १० वर्षांत २६ टक्क्यांनी वाढली आहे.
  • मात्र, लिपिक आणि अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या १९ टक्क्यांनी कमी झाली आहे.
  • सरकारी बँकांत २०१०-११ मध्ये ७.७६ लाख कर्मचारी होते. २०२०-२१ मध्ये ही संख्या घटून ७.७१ लाखांवर आली.
  • लिपिकांची संख्या १३ टक्क्यांनी, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या २७ टक्क्यांनी घटली.

७.७१ लाख कर्मचारी सरकारी बँकांत

  • २६% टक्के वाढली अधिकाऱ्यांची संख्या.
  • लिपिक व कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या १९ टक्क्यापेक्षा अधिक घटली.
  • १००० ग्राहकांमागे एक कर्मचारी सरकारी बँकांत.
  • खासगी बँकांत १०० ते ६०० ग्राहकांमध्ये आहे १ कर्मचारी.
  • कर्मचाऱ्यांची टंचाई आकडेवारीनुसार, सरकारी बँकांत १ हजार ग्राहकांमागे एक कर्मचारी आहे.
  • खासगी बँकांत १०० ते ६०० ग्राहकांमागे एक कर्मचारी आहे.
  • यावरून सरकारी बँकांतील कर्मचारी टंचाईची कल्पना यावी.

Bank Vacant Posts 2022

इतकी पदे आहेत रिक्त

डिसेंबर २०२१ पर्यंत सरकारी बँकांत एकूण स्वीकृत ८,०५,९८६ पदांपैकी ५ टक्के म्हणजेच ४१,१७७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी वित्तीय सेवा सचिव संजय मल्होत्रा बँकांशी भेटून कृती कार्यक्रम मागणार आहेत.


Bank Jobs 2022 Details | Bank Bharti Vacant Posts

Bank Jobs 2022 : A total of 8,05,986 posts are sanctioned in all state-owned banks in India. As of December 1, 2021, 41,177 posts are still vacant. Union Finance Minister Nirmala Sitharaman gave this information in the Lok Sabha. Further details are as follows:-

भारतातील सर्व सरकारी बँकांमध्ये एकूण ८,०५,९८६ पदे मंजूर आहेत. १ डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त आकडेवारीनुसार, ४१,१७७ पदे अद्यापही रिक्त आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत ही माहिती दिली. देशातील लाखो युवक बँकेची नोकरी (Bank Job) शोधत असतात. दुसरीकडे देशातल्या १२ सरकारी बँकांमध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये बँक अधिकारी (Bank Officer), लिपीक (Clerk) आणि सह कर्मचाऱ्यांच्या (Sub Staff) हजारो पदांचा समावेश आहे.

सरकारी व खासगी बँक भरती जाहिरातींकरिता येथे क्लिक करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अधिकृत आकडेवारीनुसार, भारतातील सर्व सरकारी बँकांमध्ये एकूण ८,०५,९८६ पदे मंजूर आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की यापैकी सुमारे ९५ टक्के भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त आकडेवारीनुसार, ४१,१७७ पदे अद्यापही रिक्त आहेत. यापैकी सर्वाधिक रिक्त पदे ही स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India, SBI) मध्ये आहेत.

Government Bank Recruitment Vacanct Posts

  • एसबीआई (SBI) मध्ये तूर्त ८,५४४ पदे रिक्त आहेत.
  • एसबीआयमध्ये एकूण रिक्त पदांपैकी ३,४२३ पदे अधिकारी पदाची आणि ५,१२१ पदे लिपीक स्तरावरची आहेत.
  • पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीत (PNB) ६,७४३ पदे भरायची आहेत.
  • तिसऱ्या स्थानी आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India).
  • या बँकेत ६,२९५ पदे रिक्त आहेत. इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank) चौथ्या स्थानी असून या बँकेत ५,११२ पदे रिक्त आहेत.
  • बँक ऑफ इंडियात (BOI)रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या ४,८४८ आहे.

Banbk Jobs Vacancy Details 

कोणत्या प्रकारची किती पदे रिक्त?

  • Bank Officer Vacancy – 17,380
  • Bank Clerk Vacancy – 13,340
  • All staff – 10,457

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ajinkya Sanjay Bhonde says

    मी सहकारी बँक मध्ये शिपाई ह्या पदा वरती काम करत आहे मला अनुभव पण आहे तरी मला सरकारी बँक मध्ये जॉब मिळेल का ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड