कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर!!
Art Directorate Admission
Art Directorate Admission : कला संचालनालयामार्फत प्रथम वर्ष प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Art Directorate Admission 2020: कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका आणि प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. प्रवेशाचे निकष www.doa.org.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करणे, कॉलेज व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या छायांप्रती (स्कॅन) अपलोड करणे यासाठी ९ ते १९ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड याद्या २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास २३ सप्टेंबर रोजी सादर करता येतील. २४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. संबंधित कॉलेजांकडून २५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार असल्याचे कला संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
कला संचालनालय अधिकृत वेबसाईट – www.doa.org.in
ऑनलाइन अर्ज – https://cetcell.net/doa/
पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी डेमो पाहण्यासाठी – https://cetcell.net/doa/pdf/doaOnlineApplicationSumitNote.pdf
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांचे वेळापत्रक – https://cetcell.net/doa/pdf/Diploma%20Admission%202020-21.pdf