राज्य सरकारने मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चार नवीन लोहमार्ग पोलिस ठाणे स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पोलिस ठाण्यांचा समावेश असून, यासाठी एकूण २७९ नवीन नियमित पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक निधीसाठीही शासनाने मान्यता दिली आहे.

मध्य रेल्वेच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत भाईंदर येथे ही नवीन पोलिस ठाणे स्थापन केली जाणार आहेत. यासाठी २५ कोटी ३३ हजार रुपये वार्षिक खर्च आणि १ कोटी २१ लाख रुपयांच्या एकरकमी खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. ही नवीन पोलिस ठाणे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.
सध्या कल्याणनंतर थेट कसाऱ्यात लोहमार्ग पोलिस ठाणे आहे. त्यामुळे लांबच्या अंतरामुळे अनेक प्रवासी तक्रार नोंदवण्यासाठी धजावत नसतात. याचप्रमाणे पुणे मार्गावर कल्याणनंतर थेट कर्जत येथे लोहमार्ग पोलिस ठाणे आहे. त्यामुळे आसनगाव आणि अंबरनाथ येथे नवीन पोलिस ठाणे स्थापन झाल्यास, प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















