स्पर्धा परीक्षांसाठी ‘बार्टी’तर्फे प्रशिक्षण!! -BARTI Training for Competitive Exam Success!

BARTI Training for Competitive Exam 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), ‘आयबीपीएस’; तसेच अन्य तत्सम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची यादी १५ डिसेंबरला बार्टीकडून जाहीर करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित प्रशिक्षण केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक असून, यासाठी मंगळवार (दि. १७) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, निवड झालेले तसेच ऑनलाइन पोर्टलद्वारे प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या प्रशिक्षण संस्थेबाबत ई-मेल आणि ‘कन्फर्मेशन स्लिप’ गुरुवारी पाठविण्यात आली आहे. त्यानुसार ‘आयबीपीएस’, पोलिस व निमलष्करी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी संस्था निवडलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेकडे कागदपत्रांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ठरवून दिलेल्या मुदतीत कागदपत्र पडताळणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येणार असून, प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती सादर करणे आवश्यक आहे. दहावी, बारावी तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाची माहिती, संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाचे नाव, बोर्ड अथवा विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, अभ्यासक्रमातील विषय, श्रेणी तसेच गुणांची टक्केवारी अर्जात नमूद करावी लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे:
मूळ अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, दहावी, बारावी, पदवी किंवा पदव्युत्तर पदवीची प्रमाणपत्रे, अनुसूचित जातीचा दाखला, डोमिसाइल प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक किंवा धनादेशाची प्रत, दिव्यांग असल्यास त्याचा दाखला, अनाथ असल्यास दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच स्वयंघोषणापत्र.

 


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) यांच्या वतीने पोलिस, प्रशिक्षणसाठी उमेदवारांकडून सैन्यातील पदभरती ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेऊन गुणांकन पद्धतीने प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मागासर्गीय, मातंग समाजातील उमेदवारांसाठी पोलिस, सैन्यदल स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण अनिवासी योजनेसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्गीय व सामाजिकदृष्ट्या वंचित उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) व आर्टीआयएफ (आरटीआय फाउंडेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आणि सैन्य भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही संधी विशेषतः एससी व मावळी समाजातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी खुली असून, प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस/सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) योजनेकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देणेकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत.

BARTI Army Police Free Training 2025

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

हे प्रशिक्षण उमेदवारांना स्पर्धा परीक्षांसाठी शारीरिक आणि बौद्धिक तयारी करून देणार असून, त्यामध्ये पोलीस भरती, सैन्य भरती, आयटीबीपी, एसएसबी, सीआरपीएफ अशा विविध सेवा व सुरक्षादलांमधील भरतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन दिले जाणार आहे. राज्यातील नामांकित संस्थांमार्फत हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत दिले जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत उमेदवारांना स्पर्धा परीक्षा, लेखी परीक्षा, शारीरिक चाचण्या, शासकीय निर्णय व नियमानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान निनवड प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात येणार असून, पात्र उमेदवारांची निवड सामाजिक, शैक्षणिक व शारीरिक निकषांवर आधारित असेल.

बार्टीने यासाठी स्वतंत्र संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली असून, पात्र उमेदवारांनी ही संधी मिळवण्यासाठी लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासंदर्भातील सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार असून, यात अभ्यास साहित्य, शिबीर सुविधा, पोषण आहार आणि मार्गदर्शन यांचा समावेश असेल.


 

राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे, यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी) विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात २०,२७५ विद्यार्थी विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये मार्गदर्शन घेत आहेत.

BARTI Training for Competitive Exam Success!

बार्टीच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी, जेईई, नीट, अधिछात्रवृत्ती, आयबीपीएस आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. नुकत्याच पार पडलेल्या यूपीएससी परीक्षेत बार्टीच्या १६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. तसेच, एमपीएससी परीक्षेसाठी राज्यभरातील २,६४८ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

याशिवाय, कौशल्य विकास व प्रशिक्षणासाठी ११,१७५, अधिछात्रवृत्तीसाठी ३,१०३ आणि आयबीपीएस परीक्षेसाठी १,२०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. एकूण २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत दर्जेदार मार्गदर्शन मिळत आहे.

बार्टीच्या प्रयत्नांमुळे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे. यंदा प्रशिक्षणार्थींची संख्या दुप्पट करण्यात आली असून, भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ देता येईल, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड