आरोग्य विभाग फेरपरीक्षेची तारीख जाहीर, येथे बघा चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांची यादी
Arogya Vibhag Bharti Exam Candidates List
Arogya Vibhag Bharti Re-Exam Dates
Arogya Vibhag Bharti Exam Candidates List : आरोग्य विभागाच्या गट ‘क’ च्या चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमदेवारांची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये ५८९ उमेदवारांची नावे कळविली आहेत. सदर उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी पुणे, नाशिक, लातूर व अकोला या जिल्ह्यांत घेण्यात येणार आहे.
आरोग्य विभाग गट क भरती फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाउनलोड
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – गट ‘क’ संवर्ग
- परीक्षेची तारीख – २८ नोव्हेंबर २०२१
- परीक्षा केंद्रे – पुणे, नाशिक, लातूर व अकोला
Arogya Vibhag Bharti Exam Candidates List
Arogya Vibhag Bharti Exam Candidates List : The list of 572 candidates who received wrong question papers for the health department recruitment test has been announced. Further details are as follows:-
आरोग्य भरती परीक्षेतला गोंधळ निस्तारायचे नाव घेत नाही आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या गट ‘क’ च्या 11 संवर्गातील चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमदेवारांची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या बाबतीत आणखी कोणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरोग्य भरती परीक्षेतील तक्रारींचे निराकरण झाल्यानंतरच नियुक्त्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
आरोग्य विभागाच्या गट क व गट ड भरती परीक्षांचा निकाल लांबणीवर, जाणून घ्या
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Arogya Vibhag Bharti 2021 Exam
दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाची भरती परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी झाली. न्यास कम्युनिकेशन या खासगी संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. त्या ‘क’ वर्गाच्या 2739 जागांसाठी, तर ‘ड’ वर्गांच्या 3462 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. मात्र, परीक्षेपूर्वीच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी उमेदवारांना हॉलतिकीट मिळाले नाहीत.
अनेकांना केंद्र दुसरेच मिळाले, अशा तक्रारी होत्या. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या शंकांचे एक पत्रकार परिषदे घेऊन नाशिकमध्ये निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐन परीक्षेदिवशीही प्रचंड गडबडी झाल्या.
चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या
आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशी राज्यभरातील अनेक केंद्रांवर गोंधळ उडालेला दिसला. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत आरोप केले. विरोधी पक्षानेही सरकारला धारेवर धरले. एकट्या नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतक्या उमेदवारांनी अर्ज केले होते. न्यासाने परीक्षेसाठी समन्वय नियुक्त केले. त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. मात्र, ऐन पेपरच्या दिवशी या समन्वयकांचे फोनच लागले नाहीत. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी काही सुटल्याच नाहीत. काही ठिकाणी पेपर फुटल्याचे आरोप झाले, तर कुठे तब्बल दोन-दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली. त्यात गट ‘क’ च्या 11 संवर्गातील 572 उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली. आता या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेण्यात येत आहे.
उमेदवारांची यादी – https://bit.ly/3cyLz1B
Table of Contents
Roll no of sihgarh collage not shown in result list also not shown in re examination list