खुशखबर – सैन्यात टेक्निकल कोअरमध्ये महिलांची भरती!! 8 मार्चपासून करता येणार अर्ज

Army SSC (Tech) Bharti 2022

Army SSC (Tech) Bharti 2022 : The application process for the 59th and 30th courses for recruitment of men and women in the Technical Corps by the Indian Army will start from March 8, 2022. Further details are as follows:-

भारतीय सैन्याद्वारे टेक्निकल कोअर मध्ये पुरुषांसह महिलांच्या भरतीसाठी क्रमश: ५९ आणि ३० व्या अभ्यासक्रमासाठी अर्ज प्रक्रिया ८ मार्च २०२२ पासून सुरू केली जाणार आहे. हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणूनही साजरा केला जातो.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारतीय सैन्यात ‘या’ उमेदवारांना काम करण्याची सुवर्णसंधी!!  

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अल्पसेवा कमिशन (टेक्निकल) मध्ये ५९ व्या अभ्यासक्रमासाठी पुरुषांची आणि ३० व्या अभ्यासक्रमासाठी महिलांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आर्मी एसएससी (टेक) भरती २०२२ अंतर्गत पुरुष आणि महिलांसाठी ही भरती २०२२ मध्ये सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी होणार आहे. भारतीय सैन्यात टेक्निकल कोअरमध्ये अल्पसेवा कमीशन (एसएससी) अंतर्गत महिला उमेदवारांची भरती पूर्वीपासूनच होत आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA)परीक्षेत महिला उमेदवारांना देखील संधी मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर या टेक्निकल कोअरच्या, आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू होणाऱ्या अर्जांना अधिक चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Where and How to Apply?

  • भारतीय सैन्याच्या टेक्निकल कोअर मध्ये महिला आणि पुरूष भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर सुरू होईल.
  • इच्छुक उमेदवार प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या पोर्टलवर‘ऑफिसर्स एंट्री अप्लाय’ सेक्शन मध्ये जाऊन अर्ज करू शकतील.
  • उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत ईमेल आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग-इन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतील.
  • सैन्याद्वारे एसएससी (टेक) साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल २०२२ आहे.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड