Maharashtra Police Bharti 2026 – 2027 मित्रांनो, एक म्हत्वाचा अपडेट घेऊन आम्ही समोर आलो आहे, राज्यातील जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस अंमलदारांची माहिती गृह मंत्रालयाने मागविली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ११७ तर राज्यभरातील सुमारे आठ हजार १०० पदे आहेत. नववर्षात पोलिस भरतीस प्रारंभहोईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी पोलिस भरती झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून दरवर्षी पोलिस भरती होत आहे. गतवर्षी १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती झाली. राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा भरतीचे नियोजन केले आहे. त्यानुसार जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या अंदाजे आठ हजार पदांची भरती नववर्षात होणार आहे. सध्या मागच्यावेळी भरती झालेल्यांचे जूनपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये या नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण संपणार आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून नवीन पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भरतीचे संभाव्य नियोजन
- एकूण रिक्त पदे ८,१००
- भरतीसाठी अर्जाची मुदत – १ ते ३१ डिसेंबर २०२६
- भरतीला सुरवात – १ जाने. ते ३१ मार्च २०२७
महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुण-तरुणींसाठी २०२६ मधील आगामी पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मागील भरती टप्प्यांमधील मैदानी व लेखी परीक्षांच्या प्रक्रिया आणि उमेदवारांच्या नियुक्तीची अंतिम कामे पूर्ण झाल्यानंतर, आता सर्व उमेदवारांचे लक्ष नवीन पोलीस भरती जाहिरातीकडे लागले आहे. हि नवीन जाहिरात केव्हा येणार या कडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. या सर्व उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गृह विभागातील संभाव्य नियोजन आणि पदभरती प्रक्रियेच्या टप्प्यांनुसार, महाराष्ट्र पोलीस भरतीची नवीन जाहिरात वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान प्रसिद्ध होण्याची प्रबळ शक्यता आहे. आपल्याला माहीतच असेल सध्या, आधीच्या भरती प्रक्रियेतील निवड याद्या आणि कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसेच प्राप्त माहिती नुसार, राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये आणि SRPF गटांमधील रिक्त पदांचा सुधारित अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते. रिक्त पदांनुसार वर्गवारी (Reservation) आणि बिंदूनामावली (Bindunamavali) तपासून गृह व वित्त विभागाची मंजुरी मिळण्यास ३ ते ४ महिन्यांचा अवधी लागतो. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना साधारणपणे ३० ते ४० दिवसांचा कालावधी मिळतो. परंतु, शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे जाहिरातीची वाट न पाहता सध्यापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू ठेवणे फायदेशीर ठरेल. चला तर या भरती बद्दल पूर्ण सविस्तर माहिती बघूया.
राज्यात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीसदल तोकडे पडत आहे. सद्यस्थितीत पोलीस शिपाई ते पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल २८ हजार ७३४ पदे रिक्त आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडासह राज्यातील इतर ग्रामीण भागात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी आणि पोलिसांवर असलेला ताण कमी करण्यासाठी ही रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असल्याची माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. राज्यात मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, मीरा भाईंदर-वसई विरार आणि लातूर, नांदेड ही बारा पोलीस आयुक्तालये असून ३६ पोलीस अधीक्षक कार्यालयांचा समावेश आहे. चार रेल्वे पोलीस आयुक्तालये असून आठ परिक्षेत्र (विशेष पोलीस महासंचालक) कार्यालयांचा समावेश आहे. यापैकी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर आयुक्तालय विभागात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्तालयातील महत्वाची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस आयुक्त दर्जाची २९ पदे रिक्त आहेत. दहा वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आता थेट पदोन्नती दिली जात आहे. पोलीस शिपाई ते नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त अशा पध्दतीने पदोन्नती दिली जाते. मात्र अनेक पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक आयुक्त पदांची पदोन्नती नाकारली आहे. तर काहींना सेवाज्येष्ठतेचा फटका बसल्याने पदोन्नती मिळण्याआधीच सेवानिवृत्तीचा निरोप घ्यावा लागला आहे.

तसेच सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या पोलीस यंत्रणेची प्रत्यक्ष स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी राज्याच्या गृह विभागाकडून मागविलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे की, राज्यात तब्बल १६,५०० हून अधिक पोलीस पदे सध्या रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे पोलीस दलावर, विशेषतः पोलीस ठाण्यांच्या दैनंदिन कामकाजावर अभूतपूर्व ताण आला आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) हे कोणत्याही गुन्ह्याच्या तपासातील मुख्य दुवा असतात; परंतु राज्यात सुमारे २,८७८ पीएसआय पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांवर तपासाचा अतिरिक्त बोझा पडत आहे. परिणामी, गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळेत पुराव्यांचे संकलन न होणे, न्यायालयात वेळेवर आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यास विलंब होणे आणि त्यामुळे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या आलेखासोबतच व्हीआयपी बंदोबस्त, राजकीय सभा, सण-उत्सव आणि आंदोलनांच्या वेळी मोठा पोलीस ताफा वळवावा लागत असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत ‘गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर नियंत्रण कसे येणार?’ असा संतप्त सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. खास करून इतक्यात नागपूर शहरात गुन्हेगारी विश्व् आपली हातपाय पसरत आहे कारण शहराचा मोठ्या प्रमाणात विकास सुरु आहे शहरात श्रीमंतांचे प्रमाण वाढत आहे सोबतच गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे, त्या मुळे मुख्यमंत्रांना त्यांच्याच शहरात या वाढत्या गुन्हेगारीवरअंकुश कसा लावला जातो हे बघावे लागेल आणि साठी पोलीस दलाची मोठ्या प्रमाणात आवश्यक लागणार आहे.
सततच्या मनुष्यबळ तुटवड्याचा थेट आणि विपरीत परिणाम कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. पुरेशी संख्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन १२ ते १६ तास, तर अनेकदा साप्ताहिक सुट्ट्या न घेता किंवा सलग duty वर राहावे लागत आहे. या अनियंत्रित कामाच्या वेळांमुळे पोलिसांमध्ये ताणतणाव, नैराश्य, विविध आजारपण आणि कौटुंबिक समस्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. रस्त्यावरील पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती हा गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा मुख्य मार्ग असतो; मात्र मनुष्यबळ कमी असल्याने रात्रीच्या वेळी गस्त घालणे, संवेदनशील भागात पुरेसा बंदोबस्त ठेवणे किंवा गुन्ह्यांना प्रतिबंध करणे कठीण जात आहे. पोलीस दलाची ही बिघडलेली घडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी नवीन १६,५०० कर्मचाऱ्यांची भरती अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर, वर्षाच्या अखेरीस प्रस्तावित असलेल्या या Mega पोलीस भरतीची तयारी उमेदवारांनी आत्तापासूनच सुरू करणे फायदेशीर ठरेल. पोलीस भरतीची प्रक्रिया सामान्यतः खालील टप्प्यांमध्ये पार पडते:
- मैदानी चाचणी (Physical Test): यामध्ये ५० गुणांसाठी शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते, ज्यामध्ये धावणे, गोळाफेक यांसारख्या मैदानी प्रकारांचा समावेश असतो.
- लेखी परीक्षा (Written Exam): मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी १०० गुणांची बहुपर्यायी (MCQ) लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर प्रश्न विचारले जातात.
- वैद्यकीय तपासणी व कागदपत्र पडताळणी: अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे आणि आरोग्य तपासणी करून अंतिम निवड केली जाते.
गृह विभागाकडून लवकरच या भरतीचे अधिकृत वेळापत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस सेवेत भरती होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी मैदानी सराव आणि लेखी परीक्षेचा अभ्यास एकाच वेळी सुरू ठेवून या आगामी संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















