पोलिसांना लवकरच मिळणार हक्काची घरं! उभारली जाणार महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी ! Apply For MPMC Home Pune

Apply For MPMC Home Pune

Apply For MPMC Home Pune: पुण्यात पोलिसांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील रखडलेल्या ५५०० घरांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांचा निधी परदेशी गुंतवणुकीतून उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीमुळे वर्षानुवर्षे रखडलेली घरे पूर्ण करण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाले असून, पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरक्षित निवासस्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

१२ वर्षांपासून रखडलेला लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशनचा (एमपीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच पूर्ण होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकी या प्रकल्पासाठी मिळाली आहे. त्यामुळे तब्बल ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या बाबतची माहिती ही रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख व विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली.

पुण्यातील महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी कॉर्पोरेशन अंतर्गत पोलिसांसाठी तब्बल ५५०० घरे बांधून देण्याची योजना अखेर मार्गी लागली आहे. तब्बल १२ वर्षांपासून निधीअभावी रखडलेला हा प्रकल्प आता परदेशी गुंतवणुकीच्या साहाय्याने पूर्ण होणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तब्बल ६०० कोटी ते ८०० कोटी रुपयांचा निधी परदेशी संस्थांकडून उभारला जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रकल्पाचे मुख्य मुद्दे

  • घरे आणि व्यावसायिक गाळे: महाराष्ट्र पोलिसांसाठी ५२४८ घरे आणि १६० दुकाने बांधली जाणार आहेत. हा प्रकल्प ११७ एकरांवर पसरलेला असून, यामुळे पोलिसांना त्यांच्या कुटुंबांसह योग्य निवासस्थान उपलब्ध होणार आहे.
  • निधी संकलन आणि गुंतवणूक: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाचे एफडीआय प्रमुख व जॉईंट सेक्रेटरी कौस्तुभ धावसे यांच्या प्रयत्नांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्ध झाला. नेदरलँड आणि जर्मनीतील “इन्वेस्ट इंटरनॅशनल” तसेच इतर बँकांच्या माध्यमातून ही गुंतवणूक होणार आहे.
  • गुंतवणुकीचा करार: ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील शासकीय निवासस्थानी नेदरलँडस्थित ‘एक्झिम फायनान्स’ या संस्थेसोबत २०० मिलियन युरोंचा करार झाला.

पुढील टप्पे

तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून येत्या सहा ते सात महिन्यांत निधी उपलब्ध होईल, ज्यामुळे प्रलंबित घरे आणि व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम पुन्हा सुरु करता येईल. या योजनेमुळे महाराष्ट्र पोलिसांना चांगल्या सुविधायुक्त घरांसह सुरक्षित निवासस्थान मिळण्याची आशा आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांचा कामात अधिक सेवाभाव निर्माण होईल.

प्रकल्प रखडल्याने पोलिसांना मनस्ताप

एमपीएमसी प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांत जवळपास ५२४८ सदनिका आणि १६० दुकानांचे हस्तांतरण करणे या प्रकल्पाचे विकसक बिलोमोरिया यांना बंधनकारक होते. काही कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. या हक्काच्या घरासाठी पोलिसांनी पैसे भरले होते. काहींना कर्ज काढले होते. करोना संसर्ग काळात काहीजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे लोहगावमधील पोलिसांच्या रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी परदेशातील संस्थेकडून निधी उपलब्ध झाला. सर्व फ्लॅटधारकांना मूळ किमतीत फ्लॅट कसा देता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
– भरतकुमार राणे, अध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटी, लोहगाव, पुणे


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड