Aggreko India Pune Job Openings – पुण्यात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री सोमवारी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अग्रेको इंडिया कंपनीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुण्यात पुढील दहा वर्षात सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य कराराप्रसंगी राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी तसेच अग्रेको इंडियाचे अधिकारी उपस्थित होते. पुणे आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. पुणे येथील प्रकल्पासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी, मंजुरी, सवलती आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये विद्यमान धोरणांनुसार सहकार्य करण्यात येणार आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती देण्यात येणार आहे. या मुळे, पुण्यात नोकरीच्या मोठ्याप्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे.

अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजनेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सोमवारी झालेल्या करारानुसार कंपनी पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी व उत्पादन केंद्र उभारणार आहे. यावर्षी त्याचे काम सुरु होणार आहे. हे केंद्र स्कॉटलंडबाहेरील अॅग्रेकोचे सर्वात महत्त्वाचे जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र असेल. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असून, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे; तसेच अत्याधुनिक उत्पादन, ऊर्जा उपकरण निर्मिती आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत करण्यास हातभार लाभणार आहे. अॅग्रेको कंपनीचा कार्यक्षम ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विकसित करण्यावर भर असणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















