Aadhaar मध्ये नोकरी करण्याची जबरदस्त संधी; UIDAI ने काढली १,१२,४०० रुपये पगाराची भरती!
Aadhaar UIDAI Jobs 2025
Aadhaar Jobs 2025 – मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी वाचा. आधार कार्ड बनवणारी सरकारी कंपनी म्हणजेच UIDAI मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणामध्ये नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणमध्ये (UIDAI Aadhar Recruitment) असिस्टंट सेक्शन ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला uidai.gov.in या वेबसाइटवर मिळेल. तुम्ही अधिसूचना वाचून अर्ज करावेत.
UIDAI मधील ही भरती राज्य कार्यालय भोपाळसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ मे २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अजून तुमच्याकडे दीड महिन्याचा कालावधी आहे. आधारमधील (Aadhaar Recruitment) ही भरती परराष्ट्र सेवा नियमांनुसार प्रतिनियुक्ती आधारावर केली जाणार आहे. केंद्र सरकारी अधिकारी जे सध्या त्याच पदावर काम करत आहेत. किंवा लेव्हल ३, ४ आणि लेव्हल ५ पदांवर किमान ७, ५ किंवा ३ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. याशिवाय राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, सरकारी उपक्रम, स्वायत्त संस्थेचे अधिकारी जे त्यात पदासाठी काम करत आहे. असे उमेदवारही अर्ज करु शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सहाय्यक विभाग अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा कमी असावे. या उमेदवारांना लेव्हल ६ नुसार दर महिन्याला ३५,४०० ते १,१२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज संचालक (एचआर), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, तळमजला, सर्वोच्च न्यायलय मेट्रो स्टेशन, प्रगती मैदान, नवी दिल्ली ११०००१ येथे पाठवायचा आहे.