महत्त्वाचे – राज्यातील दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंड तसेच शिष्यवृत्ती योजना!! Divyang Scholarship 2024

Divyang Scholarship 2024

Divyang Scholarship 2024

 

दिव्यांग विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (एनएसपी) सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. या प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. प्रत्येक अनुदानित शाळांनी त्यांच्याकडील शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थी स्वतंत्रपणे देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेता यावे, आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

दिव्यांग (अपंग) उमेदवारांसाठी उपलब्ध जॉब्स

 

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष…

  • – अनुदानित शाळांतील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
  • – शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहणार आहे.
  • – विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्याहून जास्त असावे.
  • – सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र कायद्यानुसार असावे.
  • – पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • – पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना नऊ हजार ते १४ हजार ६०० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.

अर्ज करण्याच्या महत्वपूर्ण तारखा…

  • १) ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : ३० नोव्हेंबर
  • २) शाळास्तरावरील अर्ज पडताळणी : १५ डिसेंबर
  • ३) जिल्हास्तरावर अर्ज पडताळणी : ३० डिसेंबर

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट…

  • १) www.scholarships.gov.in
  • २) www.depwd.gov.in

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Divyang Scholarship 2023: Good news for Handicapped Candidates!! The Scholarship Scheme is going to conduct for Physically Disable candidates under the Directorate of Social Welfare. Check here for more details about Scholarships for Students with Disabilities 2023, Divyang Scholarship Scheme 2023, Disability Scholarship Online Apply, Disability Scholarship Form, Scholarship for PWD Students, Scholarship for Physically Handicapped Students 2023, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

 

समाजकल्याण संचालनालयहतर्फे राज्यातील दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंड तसेच शिष्यवृत्ती देण्याची योजना राबवण्यात येत आहे. इयत्ता पहिली ते आठवीतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ११ महिन्यांसाठी दरमहा २०० रुपये मानधन आहे.नववी ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती किंवा समतुल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांनुसार ११ महिन्यांसाठी ५०० रुपये प्रति महिना अशी शिष्यवृत्ती असेल.

 

Scholarship for Physically Handicapped Students 2022-23

बीए, बीकॉम आणि बीएससी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ११ महिन्यांसाठी ६५० रुपये प्रति महिना, वसतिगृहांसाठी ११ महिन्यांसाठी २७० रुपये आणि ११ महिन्यांसाठी दृष्टिहीनांसाठी प्रति महिना ११५ रुपये वाचक भत्ता असेल.

बीई, आर्च, एमबीबीएस, एलएलबी, बीएड, डिप्लोमा व्यावसायिक आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम इत्यादींचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ११ महिने प्रति महिना ९०० रु असेल.

Scholarship for PWD Students

विद्यार्थ्यांकडे वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केलेले किमान ४० टक्के आणि त्याहून अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मागील वार्षिक परीक्षेत किमान ४५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून रु. दीड लाखापेक्षा जास्त नसावे आणि विद्यार्थ्याकडे समाज कल्याण संचालनालयाने जारी केलेले ओळख/यूडीआयडी कार्ड असणे आवश्यक आहे.

Divyang Scholarship Scheme 2022

Handicapped Scholarship 2022

Other Related Links:

दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना 2022-23

दिव्यांग उमेदवारांसाठी आनंदाची बातमी; दिव्यांग कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी!!

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड