Vasai Tahsil Office Vacancies सध्या वसई तहसील ऑफिसमध्ये सरकारी कर्मचारीच नाहीत म्हणावं इतकी बिकट अवस्था झालीय! सध्या १४४ पदांपैकी फक्त ६९ लोकच नोकरीवर आहेत, उरलेली ७५ पदं रिकामी आहेत. एवढ्या मोठ्या रिक्त जागांमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामं वेळेवर होत नाहीत आणि त्यामुळेच दलालांचं फावतंय. या मुळे नागरिकांची अनेक काम खोळंबली आहे. या रिक्त पदांमुळे अनेकाना त्रास होत आहे. तेव्हा नवीन पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यता यावी अशी मागणी जोर धरत आहे.

तहसीलदारांनी रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली पण अजूनही काहीच हालचाल नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या कामासाठी ऑफिसात आले की त्यांना चकरा माराव्या लागतात आणि कामं लांबट चालतात. सध्या ऑफिसात जवळपास ६०-७० खाजगी लोक काम करतायत. पण त्यांना पगार कोण देतं? हेच कुणाला माहिती नाही – म्हणजे बिनधास्त प्रकरण!नायब तहसीलदाराच्या ४ पदांपैकी २ अजून भरायची आहेत. महसूल सहाय्यकाच्या १९ जागांपैकी ९ अजून रिकाम्या. तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, वाहनचालक, वरिष्ठ कारकून – या सगळ्या पदांची वर्षानुवर्षे भरतीच नाही!
यामुळे सगळा ताण सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येतोय. कामं वेळेत होत नाहीत, कागदपत्रं हरवतात, टपाल महिन्यन्महिने पडून असतो, केसचं ऐकणं होत नाही – आणि सगळ्याची चिडचिड नागरिकांना सहन करावी लागते. आता अधिकारी म्हणतात, “दोन कर्मचारी असले तरी सेवा देऊ!” पण प्रश्न असा की दर्जा कसा राहणार? आणि वेळेत कामं होणार का?
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















