Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वैद्यकीय क्षेत्रात 5000 पदांसाठी बंपर भरती – UP NHM ANM Recruitment 2021 – upnrhm.gov.in

UP NHM ANM Recruitment 2021 – उत्तर प्रदेशातील वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झालीय. उत्तर प्रदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाने सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाइफ (Auxiliary Nursing and Midwife) अर्थात, एएनएम पदांच्या भरतीसाठी बंपर जागा (ANM Recruitment 2021) जाहीर केल्या आहेत. या रिक्त जागेतून राज्यात एकूण 5000 पदांची भरती केली जाईल. उमेदवार upnrhm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांचा संपूर्ण तपशील तपासू शकतात.

उत्तर प्रदेशातील ANM पदांच्या भरतीसाठी जारी केलेल्या या रिक्त जागेतून (UP NHM ANM Recruitment 2021) वैद्यकीय क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हा मोठा दिलासा मिळालाय. नॅशनल हेल्थ मिशन उत्तर प्रदेशने जारी केलेल्या सूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वेळ दिला जाईल आणि तीच फी जमा करण्याची शेवटची तारीख असेल. मात्र, राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अद्याप परीक्षा आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना (UP NHM ANM Recruitment 2021) अर्ज फी म्हणून कोणतेही शुल्क जमा करावे लागणार नाही. याबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला upnrhm.gov.in भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

उत्तर प्रदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जारी केलेल्या नोटिसीनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ANM ची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी केलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय निश्चित केलेले नाही. तथापि, उमेदवारांचे कमाल वय 40 वर्षे ठेवण्यात आलेय. तर दुसरीकडे आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेमध्ये विशेष सवलत दिली गेलीय. दरम्यान, उमेदवारांचे वय 15 सप्टेंबर 2021 च्या आधारावर मोजले जाईल.

CHO च्या पदांसाठी भरती

कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) पदासाठी उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाने (UP NHM Bharti 2021) नुकतीच अधिसूचना जारी केलीय. या परीक्षेद्वारे (UP CHO Exam 2021) एकूण 2800 पदांची भरती केली जाणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड