द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर
DTE Maharashtra Direct Second Year Diploma Admission Schedule
DTE Maharashtra Direct Second Year Diploma Admission Schedule : डिप्लोमानंतर इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. यासाठी १० टक्के जागा राखीव असतात. यात डिप्लोमानंतर इंजिनीअरिंग पदवी घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. ही प्रवेश प्रक्रिया ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
यंदा इंजिनीअरिंगचे द्वितीय वर्षाचे वर्गही सुरू झाले, विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले तरीही या प्रवेशाबाबत कोणतीही सूचना जाहीर करण्यात आलेली नव्हती. याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर युवा सेनेनेही याची दखल घेऊन विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्याबाबत मागणी केली होती. यानंतर गुरुवारी रात्री उशीरा हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- जागा जाहीर करणे – ११ डिसेंबर
- विद्यार्थ्यांचा पसंती क्रम भरण व निश्चित करणे – १२ ते १४ डिसेंबर
- पहिल्या फेरीच्या तात्पुरत्या जागा वाटप – १६ डिसेंबर
- कॅपद्वारे वाटप जागेचा स्वीकार करणे – १७ व १८ डिसेंबर
- कागदपत्र सादर करून प्रवेश घेणे – १७ ते १९ डिसेंबर
- दुसरी प्रवेश फेरीसाठी जागा जाहीर करणे – २० डिसेंबर
- विद्यार्थ्यांचा पसंती क्रम भरण व निश्चित करणे – २१ ते २२ डिसेंबर
- दुसऱ्या फेरीच्या तात्पुरत्या जागा वाटप – २४ डिसेंबर
- कॅपद्वारे वाटप जागेचा स्वीकार करणे – २५ व २८ डिसेंबर
- कागदपत्र सादर करून प्रवेश घेणे – २५ ते २९ डिसेंबर
सोर्स : म. टा.