खुशखबर! नोंदणी व मुद्रांक विभागात दुय्यम निबंधक, वरिष्ठ लिपिक पदांच्या भरतीला मंजुरी! – Nondani mudrank vibhag recruitment 2026

Nondani mudrank vibhag recruitment 2026: राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांची नावे आता सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच महसूल विभागातील कामकाज अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी 60 नवीन पदांच्या निर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात हे धोरणात्मक बदल करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे. महसूल विभागाच्या अधिकृत माहितीनुसार, यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांशी संबंधित नोंदी तसेच विभागातील प्रशासकीय कामकाज सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.

पात्र शेतकऱ्यांची नावे आता सातबाऱ्यावर

राज्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे अद्याप सातबारा उताऱ्यावर नोंद झालेली नसल्याने त्यांना विविध शासकीय योजना, जमीनविषयक प्रक्रिया आणि इतर कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता पात्र शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पात्र असूनही सातबारा उताऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या हक्काशी संबंधित नोंदी अधिक स्पष्ट आणि अद्ययावत होण्यासही यामुळे मदत होणार आहे.

Nondani mudrank vibhag recruitment 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी आणि नागरिकांसाठी महसूल व मुद्रांक विभागाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 60 नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये:

  • दुय्यम निबंधक (वर्ग-2) – 30 पदे
  • वरिष्ठ लिपिक – 30 पदे
  • एकूण – 60 पदे

या पदांच्या निर्मितीमुळे महसूल आणि मुद्रांक विभागातील मनुष्यबळ वाढणार असून, नागरिकांना विविध सेवा मिळवताना होणारा विलंब कमी करण्यास मदत होऊ शकते.

प्रशासकीय प्रक्रिया होणार अधिक सोपी

महसूल विभागाने अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रशासकीय प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या उद्देशाने अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या 15 वरून 10 करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे. यामुळे नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित सेवा घेताना अनावश्यक प्रक्रिया कमी होऊन कामकाज अधिक सुलभ आणि जलद होण्यास मदत होईल. सेवा वितरणात पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकृत सूचना आणि स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीची माहिती नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे.

एकूणच, पात्र शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर नोंदविणे, महसूल विभागात 60 नवीन पदांची निर्मिती आणि अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण या निर्णयांमुळे राज्यातील जमीनविषयक नोंदी आणि महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.


Department of Stamp Duty Bharti 2026 Details |  Nondani Mudrank Vibhag Bharti 2026 

  नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने त्या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे. सुधारित आकृतिबंधानुसार सद्यःस्थितीत मंजूर पदांची संख्या ३,९५२ झालेली आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे.नोंदणी मुद्रांक विभागाला अतिरिक्त ९६५ पदे मंजूर करण्यात आली असल्याने या विभागाला आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बूस्टर मिळणार आहे. त्यामुळे नोंदणी मुद्रांक विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सेवांना चांगली गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, तसेच भरती प्रक्रियेसाठी विभागाने हालचाली सुरू केल्या असून येत्या महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा विभागाचा मानस आहे.  सुधारित आकृतिबंधानुसार सद्यःस्थितीत मंजूर पदांची संख्या ३,९५२ झालेली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि अपर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी) यांच्या प्रयत्नाने सध्या मंजूर ३०८४ पदांपैकी १०७ पदे निरसित करण्यात आली आहेत. तसेच, त्यामध्ये ९६५ पदे नव्याने निर्माण करुन ३,९५२ पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला होता. त्याला महसूल आणि वन विभागाने मान्यता दिली असून, त्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. नवीन आकृतीबंधाची मागणी २०१६ पासून प्रलंबित होती. नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांच्या निर्मिती, दस्त संख्येत वाढ, तसेच इतर कामकाजामध्ये झालेली व्यापक वाढ लक्षात घेता, या निर्णयामुळे विभाग अधिक सक्षम आणि बळकट होईल, असा दावा बिनवडे यांनी केला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

nondani mudrank vibhag bharti 2026

राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाला अतिरिक्त ९६५ पदे उपलब्ध होणार आहेत. यामुळे एकूण पदांची संख्या ही तीन हजार ९५२ इतकी झाली आहे. अतिरिक्त पदांमध्ये अतिरिक्त तीन नोंदणी उपमहानिरीक्षक, दुय्यम निबंधकांची ८० पदे आहेत. सहाशेहून अधिक वरिष्ठ, कनिष्ठ लिपिक उपलब्ध होणार आहेत.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देणारा शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केला आहे. यामुळे विभागात नवीन ९६५ पदांच्या निर्मितीने मंजूर पदांची संख्या वाढून ३,९५२ झाली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करत मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागामध्ये ९६५ नवीन पदांची निर्मिती करून एकूण ३,९५२ पदांचा नवा आकृतीबंध ४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आला आहे. यात विद्यमान ३,०९४ मंजूर पदांपैकी १०७ पदे रद्द करण्यात आली आहेत.

नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची निर्मिती, दस्त संख्येत झालेली वाढ आणि वाढलेली कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले होते. सुधारित आकृतीबंध विभाग अधिक सक्षम, कार्यक्षम आणि बळकट करण्यास उपयुकत ठरणार आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे शासनाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या इष्टांकपूर्तीत सहाय्य होऊन राज्य महसूल वाढीस चालना मिळेल. तसेच नागरिकांना अधिक जलद व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टपूर्तीतही या निर्णयामुळे महत्त्वाची भर पडेल, असा विश्वास नोंदणी महानिरीक्षक बिनवडे यांनी व्यक्त केला.

नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण विभाग असून आकृतीबंधातील सुधारणेची मागणी २०१६ पासून प्रलंबित होती असेही त्यांनी नमूद केले.

 

उपमहानिरीक्षक पदावर ज्येष्ठतेनुसार पदोन्नती
‘सुधारीत आकृतीबंधाला सरकारने मान्यता दिली आहे. त्या आकृतीबंधानुसार, सेवा ज्येष्ठतेनुसार किती पदे उपलब्ध होत आहेत, किती जणांना पदोन्नती देता येईल तसेच पदोन्नतीनंतर किती पदे उपलब्ध होतील, त्यानुसार त्या त्या पदावर नियुक्ती करण्यात येतील. तसेच तीन नोंदणी उपमहानिरीक्षक पदावर विभागातील अधिकाऱ्यांना संधी देण्याचा विचार असून ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येईल. दुय्यम निबंधक पदासाठी कनिष्ठ, वरिष्ठ लिपिकांमधून किती जणांना पदोन्नती देता येईल का याचा विचार सुरू आहे. दुय्यम निबंधक पद हे जबाबदारी असल्याने त्या पदाला पात्र असणाऱ्यांनाच संधी देण्यात येणार आहे. येत्या महिनाअखेरीस ही पदभरती, नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास नोंदणी मुद्रांक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ,


: : मागील अपडेट्स : : 

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025: Nondani mudrank vibhag has invited applications for the posts of “Peon”. There are 284 vacant Posts available. Interested and eligible candidates can send their applications through following given Online Link of IBPS before the last date. The last date for applications is 16th of May 2025. For more details Nondani mudrank vibhag Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

The detailed advertisement regarding the Department of Stamp Duty Recruitment 2025 process is available on the website of the Inspector General of Registration and Controller of Stamps, Maharashtra, Pune at https://igrmaharashtra.gov.in and the candidates should read the entire information mentioned in the advertisement carefully and submit their applications online at https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25. It will be the responsibility of the candidate to visit the said website from time to time during the recruitment process and obtain the necessary updated information related to the recruitment process.

 

 

राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाने आज एक नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरात अंतर्गत गट ड संवर्गातील “शिपाई” पदाची तब्बल २८४ पदे भरण्यात येणार आहे. हि भरती म्हणजे १० ,१२ वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधीच आहे. हि भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज आज म्हणजेच २२ एप्रिल २०२५ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १६   मे २०२५ आहे. हि भरती igrmaharashtra.gov.in याच्या द्वारे राबविण्यात येत आहे.  या भरतीची पूर्ण विस्तृत जाहिरात आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. 

 

  • पदाचे नावशिपाई
  • पदसंख्या –  २८४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  पुणे 
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग -1000/-
    • राखीव प्रवर्ग -900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १० मे २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in

Nondani Mudrank Vibhag Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
शिपाई२८४

Educational Qualification For Nondani Mudrank Vibhag Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिपाई 10th pass

Salary For Nondani Mudrank Vibhag Arj 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिपाई15000/- to 47600/-

How To Apply For Nondani Mudrank Vibhag Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६  मे २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.rfd.maharashtra.gov.in Bharti 2025

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/5Xk8w
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/aTY8w
✅ अधिकृत वेबसाईट
https://rfd.maharashtra.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट
https://igrmaharashtra.gov.in

The recruitment notification has been declared from the Nondani mudrank vibhag for interested and eligible candidates. Online applications are invited for the Peon posts. There are 284 Vacancies available to fill. Applicants need to apply Online mode for Department of Stamp Duty Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications to given address. For more details about Department of Stamp Duty Bharti 2025 Details, Department of Stamp Duty Bharti 2025, Department of Stamp Duty Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.

Nondani Mudrank Vibhag Bharti 2026 Details

👉 Name of DepartmentDepartment of Stamp Duty
💎 Recruitment DetailsDepartment of Stamp Duty Bharti 2026
📑 Name of PostsPeon
📍Job LocationPune
✍Application ModeOnline
Official WebSite https://igrmaharashtra.gov.in

Application Fee For Department of Stamp Duty Pune Bharti 2026

Application Fee
  • Rs. 1000/- for Open Category Candidates
  • Rs. 900/- for Backward Category Candidates
  • Rs. 900/- for Orphan Candidates

Important Documents For Nondani Mudrank Vibhag Pune Arj 2026

Documents
  • Self-declaration that the applicant’s information is correct
  • Proof of educational qualification
  • Proof of age/proof of date of birth
  • Proof of belonging to economically weaker section
  • Caste certificate of the relevant category for candidates selected from reserved category
  • Non-creamy layer certificate (current financial year)
  • Proof of being an eligible disabled person
  • Proof of being an eligible ex-serviceman
  • Proof of being eligible for reservation for sportspersons
  • Proof of being eligible for orphan reservation
  • Domicile certificate of Maharashtra State
  • A certificate in the prescribed format from the competent authority for Marathi speaking candidates from 865 villages claimed by the Maharashtra Government in the Maharashtra-Karnataka border area
  • Proof of change in name of married women
  • Proof of knowledge of Marathi language
  • Affidavit of small family Certificate of being a part-time Pandvidhar diploma holder

Salary Details For Nondani Mudrank Vibhag Application 2026

Peon15000/- to 47600/-

 Department of Stamp Duty Vacancy Details

Vacancy

All Important Dates Department of Stamp Duty Pune Job 2026

⏰Last Date 

www.igrmaharashtra.gov.in Bharti 2025 Important Links

📑Advertisement  Read PDF
👉Online ApplicationApply Online
✅ Official WebsiteOfficial Website

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड