NCERT सरकारी नोकरीची, महिन्याला 1.44 लाखांपर्यंत पगार
NCERT Bharti 2020
NCERT Bharti 2020 – मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे NCERT म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (एनसीईआरटी) शेकडो पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी उमेदवारांना कोणतीही परिक्षा द्यावी लागणार नसून, थेट मुलाखतीच्या आधारावर निवड केली जाणार आहे. एनसीईआरटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2020 आहे. या संदर्भातील पूर्ण अपडेट्स आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच.
पदे –
एनसीईआरटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक – 142 पदे, सहकारी प्राध्यापक – 83, प्राध्यापक – 38, सहाय्यक ग्रंथपाल – 02 आणि ग्रंथपाल – 01 या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक पात्रता आणि वय –
वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व वयाची अट वेगळी आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी उमेदवाराचे शिक्षण पदव्युत्तर आणि पीएचडी असणे आवश्यक आहे. तर ग्रंथपाल पदासाठी उमेदवाराने लायब्रेरी सायन्स/इंफॉर्मेशन सायन्स/डॉक्यूमेंटेशन सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
नियुक्ती आणि पगार –
निवड झालेल्या उमेदवारांची अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसुर, शिलॉन्ग आणि नवी दिल्लीतील एनसीईआरटीच्या कार्यालयात नियुक्ती केली जाईल. मात्र नियुक्तीनंतर ट्रांसफर करता येईल. या उमेदवारांना वेगवेगळ्या पदांनुसार महिन्याला 57,700 रुपये ते 1,44,200 रुपये पगार मिळेल.
अर्ज शुल्क –
या पदांसाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आहे. तर एससी/एसटी, पीडब्ल्यूडी वर्गासह महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. इच्छुक व पात्र उमेदवार अधिक माहिती व अर्जासाठी ncert.nic.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. पूर्ण माहिती आणि जाहिराती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Sir majhe Def,BA aahe government job aheka sir