मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर
Postponement of Open University Examination
सध्याच्या कोरोना लोकडाऊन मुले YCMOU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या सहाय्याने विविध शिक्षणक्रमांचे ई बुक्स तथा यशोवाणी या वेब रेडिओवर प्रसारित होणाऱ्या विविध शिक्षणक्रमाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून घरबसल्या अभ्यास कसा करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भातील लोकसत्ता मध्ये खालील बातमी प्रकाशित झालेली आहे.
विद्यापीठाच्या एकुण १५२ विविध शिक्षणक्रमांसाठी सहा लाख २४ हजार २६० विद्यार्थी प्रविष्ट असून, त्यात नवीन प्रविष्ट विद्यार्थी संख्या पाच लाख ७० हजार तर ५४ हजार २६० विद्यार्थी पुन:परीक्षार्थी आहेत, अशी माहिती प्रभारी परीक्षा नियंत्रक रवींद्र ठाकरे यांनी दिली. इतर पारंपरिक विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुक्त विद्यापीठाचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.