सामान्य प्रशासन विभागात भरपूर पदे रिक्त! नवीन पदभरती प्रक्रिया आता… – GAD Maharashtra Recruitment 2025
GAD Maharashtra Recruitment 2025
आपल्याला माहीतच असेल सध्या नवीन सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया जोमात सुरु आहे. या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे परंतु, सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी ३० शिपाई कार्यरत आहेत. १९९८ पासून विभागाने शिपाईपदाची भरती केली नाही. त्यामुळे नवीन मंत्र्यांना शिपाई, चोपदार यांची कमतरता भासेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यासाठी शिपाई, चोपदार यांची नेमणूक करण्यात येते. १९९८ पर्यंत विभागाकडे शिपाई, नाईक, चोपदार पदांवर १२० जण होते. शिपाई पदावरील व्यक्तींना सेवाज्येष्ठतेनुसार नाईक, चोपदार, अशी पदोन्नती देण्यात येत होती. १९९८ मध्ये सामान्य प्रशासन विभागाने भरती बंद करण्याचा निर्णय घेत नाईकपद रद्द केले. १२० पैकी काही जण वयोमानानुसार निवृत्त झाल्यामुळे आता शिपाई पदावरील केवळ ३० कर्मचारी विभागाकडे आहेत, असे सूत्रांनी सांगितले. तसेच या विभागात भरपूर पदे रिक्त आहे (GAD Maharashtra Recruitment 2025) , तसेच हि पदे लवकरात लवकरच भरण्याची सध्याची गरज आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला २ जमादार, १ चोपदार तर उपमुख्यमंत्र्यांना १ जमादार, १ चोपदार तर, प्रत्येक मंत्र्यांना १ चोपदार १ शिपाई विभागाकडून देण्यात येतात. पदभरती न झाल्यामुळे शिपायांची संख्या कमी झाली आहे. तर, नाईक पद रह केल्यामुळे पदोन्नती मिळू न शकल्याने चोपदारही कमी झाले आहेत. परिणामी, महायुती सरकारमधील ३० मंत्र्यांपैकी ६ ते ७ मंत्र्यांकडे शिपाई आणि चोपदार नव्हते, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रशासनाचे भरतीकडे दुर्लक्ष • सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी पद्धतीने ४० शिपाई पदे भरली आहेत. परंतु, त्यांना इतर कामांचे वाटप करण्यात आले आहे. शिपाई पदाच्या भरतीची मागणी सातत्याने करण्यात येत असून, सामान्य प्रशासन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नवीन मंत्री आले तरी त्यांना शिपाई आणि चोपदार यांची उणीव भासेल, असे ते म्हणाले.