सारथी, बार्टी आणि महाज्योती फेलोशिप वितरण लवकरच पूर्ण होण्याची शक्यता | BARTI Fellowship Update

BARTI Fellowship Update

BARTI Fellowship Update:  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’ (बार्टी) आणि ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) यांच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या विद्यार्थ्यांकडून सहामाही अहवाल मागविण्यात आले असून, फेलोशिपचे पैसे मिळण्यासाठी अजून दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुख्यमंत्री यांनी बार्टी, सारथी आणि ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) यांच्याकडील संशोधक विद्यार्थ्यांना १०० टक्के फेलोशिप मंजूर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तीन महिने उलटूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बार्टीचे ८६१, सारथीचे ९६९ आणि महाज्योतीचे ८६९ असे एकूण २,६९९ विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प थांबले आहेत.

याबाबत दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत, बार्टी आणि सारथी संस्थांनी विद्यार्थ्यांना सहामाही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अहवाल सादर झाल्यानंतर त्याची पडताळणी करून जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांच्या खात्यात फेलोशिपची रक्कम वर्ग केली जाईल, अशी माहिती सारथीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून फेलोशिपसाठी ते प्रतीक्षेत होते. आता सहामाही अहवाल सादर करण्यासाठी मेलद्वारे सूचना मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. फेलोशिपची रक्कम लवकर मिळेल, अशी अपेक्षा असून त्यामुळे संशोधन प्रकल्प वेळेत पूर्ण करता येईल.

सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांकडून सहामाही अहवाल मागविण्यात आला आहे. त्याची पडताळणी करून सर्व कागदपत्रे योग्य असल्यास सर्व विद्यार्थ्यांची फेलोशिप तत्काळ वर्ग करण्यात येईल. – अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड