महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना दिवळी निमित्त 5500 रुपयांचा बोनस देणार?

Ladki Bahin Diwali Bonus 2024

मित्रानो राज्यात सध्या लाड्क्या बहीण योजनेचंच बोलबाला आहे. सर्व बहिणी योजनेचे पैसे पण मिळाले आहेत. त्यामुळे राज्यभरात आता दिवाळी सणाचा उत्साह असणार आहे. दिवाळी म्हटलं की, नोकरदार वर्गामध्ये बोनस हा विषय चर्चेचा आणि खूप जिव्हाळ्याचा मुद्दा असतो. राज्यभरातील अनेक खासगी कंपन्यांमध्ये आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. विशेष म्हणजे महायुती सरकार महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनादेखील दिवाळीचा बोनस देणार असल्याची चर्चा आता सुरु आहे. महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा आहे. राज्यातील महिलांमध्ये लाडक्या बहीण योजनेची चर्चा सुरु आहे. राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिलांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना शिंदे सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जात आहे. शिंदे सरकारने शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. राज्यातील लाभार्थी महिलांना आतापर्यंत तीन हफ्ते देखील मिळाले आहेत. महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत 7500 रुपये आले आहेत. तसेच आता सरकार दिवाळी निमित्त लाभार्थी महिलांना 5500 रुपयांचा बोनस देणार असल्याची चर्चा आहे.

Ladki Bahin Diwali Bonus 2024

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 29 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. याच दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. विशेष म्हणजे हे पैसे दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त असणार आहेत. लाभार्थी महिलांना दिवळीचा हा 3000 रुपयांचा बोनस ऑक्टोबर म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आणि दिवाळीच्या आधी देणार आहे. तसेच राज्य सरकार काही निवडक महिला आणि मुलींच्या बँक खात्यात आणखी 2500 रुपये देणार आहे. याचाच अर्थ काही महिला आणि मुलींना दिवळीनिमित्त तब्बल 5500 रुपयांचा बोनस मिळणार आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रचंड महत्त्वकांक्षी योजना आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने निवडणुकीचा जुमला म्हणून सरकारने या योजनेची घोषणा केली, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेला महिला आणि मुलींचा भरघोस प्रतिसाददेखील मिळताना दिसत आहे. त्यामुळे हाच प्रतिसाद महायुतीला मतांच्या रुपाने मिळेल का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sonali pakal says

    मी ऐकले लाडक्या बहिणीचा बोलत येणार नाही.
    खरं आहे का.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड