राज्यात लवकरच “पाळणाघर सेविका” पदांची भरती, नवीन पदभरती लवकरच होणार
Palnaghar Sevika Bharti
प्राप्त माहिती नुसार राज्यात लवकरच पाळणाघर सेविकांची भरती होणार असल्याचे समजते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘मिशन शक्ती’ योजनेतील सामर्थ्य कार्यक्रमातील राज्यात पाळणाघर (अंगणवाडी कम क्रेश) योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ३४५ पाळणाघरे सुरू करण्यात येणार असून, त्यात पाळणाघर सेविका, पाळणाघर मदतनीस असे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरांवर समित्यांची रचना करण्यात आली आहे. त्यात महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालय स्तरावरील समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तर अंगणवाडी सेविका यांच्या अध्यक्षतेखाली पाळणाघर स्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना राबवण्यात येत होती. मात्र केंद्र सरकारने या योजनेचे राष्ट्रीय पाळणाघर योजनेमध्ये रूपांतर करून एकात्मिक बालविकास सेवा योजनेत त्याचा समावेश केला. त्यानुसार २०२२ मध्ये पाळणाघरे सुरू करण्याबाबतचे आदेश देऊन २०२३ मध्ये सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यासाठी केंद्र आणि राज्य हिश्श्याचे प्रमाण अनुक्रमे ६० आणि ४० टक्के आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. पाळणाघर योजनेत प्रति पाळणाघर वार्षिक खर्च ३ लाख ३६ हजार ६०० रुपये आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
त्यात पाळणाघरातील अंगणवाडी सेविका यांना १५०० रुपये भत्ता, अंगणवाडी मदतनीस यांना ७५० रुपये भत्ता, पाळणाघर सेविका यांना ५५०० रुपये, पाळणाघर मदतनीस यांना ३००० रुपये मानधन दिले जाणार आहे. पाळणाघर उभारणीसाठी एकवेळ ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. पाळणाघर सेविका, मदतनीस यांच्या नियुक्तीबाबतच्या, योजना कार्यान्वित करण्यासाठीच्या सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.