लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, नवा अपडेट जाहीर, योजनेला मिळाली मुदतवाढ!
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (दि. १५)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.(Ladki Bahin date extended)अधिकाधिक महिलांनी योजनेत सहभागी होत लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मुख्यमंंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अर्ज दाखल करण्याची तारीख ३१ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही अनेक महिलांनी काही कारणांमुळे अर्ज दाखल केले नव्हते. पण अशा महिलांना आता अर्ज दाखल करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदत होती. परंतु, महिलांचा वाढता प्रतिसाद बघता शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला होता. योजनेपासून वंचित असलेल्या महिलांनी आपली कागदपत्रे अपलोड करून नाव नोंदवावे, असे आवाहन भुसे यांनी केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ज्या महिलांचे आधारकार्ड किंवा अन्य कागदपत्रे नव्हती, अशा महिलांनी योजनेचा अर्ज दाखल केला नव्हता. परंतु आता या महिलांनी आधारकार्ड बँकेशी लिंक केले आहे. अन्य कागदपत्रे जमवली आहेत. त्यामुळे अशा महिलांना नवीन अर्ज दाखल करता येणार आहेत. योजनेतील ऑगस्ट महिन्यात दोन हप्ते मिळाले आहेत. तर २९ सप्टेंबरपासून तिसरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे.
पण ज्या लाडक्या बहिणींचे बँकेत खाते नव्हते, ज्या लाडक्या बहिणींचे आधारकार्ड नव्हते किंवा अन्य कागदपत्रे नव्हती, अशा महिलांनी या योजनेचा अर्ज दाखल केला नव्हता. परंतु, आता या लाडक्या बहिणींनी आधारकार्ड बँकेशी लिंक केले आहे. अन्य कागदपत्रे जमवली आहेत, अशा लाडक्या बहिणींना नवीन अर्ज दाखल करता येणार आहेत. मुदत वाढवल्याने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी या योजनेत सहभाग घेतला असून, ज्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित आहेत अशा लाडक्या बहिणींनी आपले कागदपत्र अपलोड करून नाव नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे पालकमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.