राज्यात होणार ३५९ दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी!

Divyang certificate Verification

कथित आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रामधील बोगसगिरी उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रभरात चौकशी सत्र सुरू झाले आहे. दिव्यांगांसाठीच्या राखीव जागेवर नोकरी मिळवलेल्या ३५९ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. अहिल्यानगर व बुलढाणा या जिल्ह्यात बोगस अपंग प्रमाणपत्राचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती.

 

Divyang certificate Verification

राज्यभरातील कथित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी त्यांनी शासनाला दिली असून त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बोगस उमेदवारांमुळे दिव्यांगांवर अन्याय होत असून ते नोकरीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मागणी आ. कडू यांनी केली आहे. आ. बच्चू कडू यांनी १९ जुलै २०२४ ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवले होते. त्यातून शासकीय व निमशासकीय विभागांत ३५९ बोगस उमेदवार आढळले आहेत. याबाबतची यादी त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे दिली. त्यानुसार आयुक्तांनी यादीतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. बोगस प्रमाणपत्रामुळे आ. बच्चू कडू हे आक्रमक झाले असून या सर्वांना घरी घालवण्याची त्यांनी मागणी केली आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हानिहाय अशी आढळली बोगस प्रमाणपत्र सातारा १२ •  कोल्हापूर ११ पुणे २३ सिंधुदुर्ग ७ मुंबई६ सांगली १२ रत्नागिरी ४ रायगड १० अहिल्यानगर ३० • छत्रपती संभाजीनगर ९ नाशिक ११ बीड ९ • बुलढाणा ३० धुळे ८ नागपूर६ वाशिम १९ अकोला १९ लातूर ५ चंद्रपूर ६ हिंगोली ५ यवतमाळ ७ गडचिरोली १५ नांदेड १० जळगाव ५ सोलापूर २० ठाणे ९ भंडारा ९ पालघर ६ नंदुरबार ८ अमरावती १४ धाराशिव • परभणी ४ • जालना ३  वर्धा ३.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड