MPSC PSI भरतीत १९६ जागा रिक्त! शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांचे प्रमाण वाढवा! | MPSC PSI Bharti 2026

MPSC भर्ती अंतर्गत PSI पदासाठी मुख्य परीक्षेनंतर शारीरिक चाचणी व मुलाखत, असे दोन अतिरिक्त आणि आव्हानात्मक टप्पे पार करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान अनेक उमेदवार विविध कारणांमुळे किंवा शारीरिक निकषांत पात्र न ठरल्याने बाद होतात. याव्यतिरिक्त, गुणवत्ता यादीतील अनेक विद्यार्थी राज्य कर निरीक्षक (एसटीआय), सहाय्यक कक्ष अधिकारी (एएसओ) अथवा इतर प्रशासकीय पदांना प्राधान्य देतात. परिणामी, प्रशासनातील पदे रिक्त राहतात आणि वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या तरुणांच्या पदरी निराशा पडते. आयोगातर्फे २०२३ मध्ये ‘पीएसआय’ पदासाठी एकूण ३७४ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, अंतिम टप्प्यात केवळ २१३ उमेदवार शिफारशीस पात्र ठरले. त्यामुळे १६१ जागा रिक्त राहिल्या होत्या. तसेच, २०२४ मध्ये २१६ जागांच्या तुलनेत केवळ १८१ उमेदवार शिफारशीस पात्र ठरल्याने ३५ जागा रिक्त राहिल्या. या दोन्ही वर्षांची एकत्रित आकडेवारी पाहिल्यास, जाहिरातीत नमूद केलेल्या एकूण ५९० जागांपैकी केवळ ३९४ उमेदवारांचीच शिफारस झाली असून, एकूण १९६ जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे ‘पीएसआय’ पदासाठी मुख्य परीक्षेनंतर शारीरिक चाचणीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढवावे, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

याविषयी विद्यार्थी म्हणाले, “अंतिम निवड प्रक्रियेनंतर एकही जागा रिक्त राहणार नाही, यासाठी आयोगाने आवश्यक ती नवीन कार्यपद्धती अवलंबावी. त्यासाठी ‘पीएसआय’ पदासाठी शारीरिक चाचणीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढवावे. रिक्त जागांचे प्रमाण कमी केल्यास जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशासनात सेवेची संधी मिळेल. त्यामुळे या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून आयोगाने तातडीने कार्यवाही करावी.”


 राज्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नतीसाठी पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा लागू करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यानुसार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेअंतर्गत लेखी आणि शारीरिक चाचणीसाठीचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) निश्चित करण्यात येणार असून, पदोन्नतीसाठी २५ टक्के जागा स्पर्धा परीक्षेद्वारे, तर २५ टक्के सेवाज्येष्ठता या पद्धतीने केली जाणार आहे. उर्वरित ५० टक्के भरती ही सरळ सेत्रेद्वारे होणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (एलडीसीई) घेतली जात होती. मात्र, २५ फेब्रुवारी २०२२च्या शासन निर्णयाद्वारे ही परीक्षा रद्द करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचे प्रमाण ५०:२५:२५ (सरळसेवा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, पदोन्नती) याऐवजी ५०ः ५० (सरळसेवा, पदोन्नती) असे करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, ३ ऑक्टोबर २०२३ रोजी अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांच्या कार्यालयाने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार या प्रस्तावाचा विचार करून परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

परीक्षेसाठी पात्र कोण ?
परीक्षा देणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही शिक्षा झालेला कर्मचारी परीक्षा देण्यास पात्र असणार नाही. फौजदारी खटला, विभागीय चौकशी, फौजदारी कार्यवाही प्रलंबित असलेला कर्मचारी परीक्षा देण्यास अपात्र असेल. उमेदवार खोट्या माहितीच्या आधारे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा देऊन पात्र झाल्यास तो अपात्र होऊन शिस्तभंगाच्या कारवाईस जबाबदार ठरेल, असे नमूद करण्यात आले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

नव्या निर्णयानुसार निकष
नव्या निर्णयानुसार, आता पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे यापुढे ५०:२५:२५ (सरळसेवा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, पदोन्नती) या प्रमाणात भरण्यात येणार आहेत. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचारी पात्र असतील.
दहावी उत्तीर्ण कर्मचाऱ्याने किमान सहा वर्षे, बारावी उत्तीर्ण कर्मचाऱ्याने किमान पाच वर्षे, पदवी प्राप्त कर्मचाऱ्याने किमान चार वर्षे अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचाऱ्याचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पोलीस महासंचालक रिक्त पदांचा बिंदूनामावलीनुसार आढावा घेऊन १ जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणीपत्र सादर करतील.
गृह विभाग १ मार्चपर्यंत मागणीपत्र एमपीएससीला पाठवेल. त्यानंतर एमपीएससीकडून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येईल. एमपीएससीने ठरवलेले लेखी आणि शारीरिक चाचणीचे स्वरूप अंतिम झाल्यानंतर बदलण्यात येणार नाही. लेखी परीक्षेतील पात्र उमेदवारच शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील. या परीक्षेसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 


 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या गट- ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत पीएसआय पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ही बातमी धक्का दायक ठरली आहे.  राज्य सरकारच्या यंत्रणेत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या २ हजाराहून अधिक पदे रिक्त असताना अशी बातमी विद्यार्थ्यांच्या समोर आलेली आहे. त्यामुळे सरकारच्या नियोजनशून्यतेवर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

MPSC अंतर्गत दरवर्षी पीएसआय , राज्य कर निरीक्षक (एसटीआय ) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ ) या पदासाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. या वर्षी आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एएसओ पदासाठी ३  जागा, एसटीआय पदासाठी २७९ जागा आहेत. एकूण २८२ जागा आहेत. या जागांसाठी ९ नोव्हेंबर २०२५  रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. परंतु मागील वर्षी एकूण ४८० जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. या तुलनेत या वर्षी रिक्त जागांची संख्या घटली आहे.

विद्यार्थ्यांच्या  मतानुसार, पोलीस दलात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना त्यांचा समावेश जाहिरातीत सरकारने केलेला नाही. यावरून सरकारची उदासीनता दिसून येते. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरही  याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे.

 

  • परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2024
  • पदाचे नाव – पोलिस उपनिरीक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 844/-
    • मागासवर्गीय- रु. 544/-
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
    • मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC PSI Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
 MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023615 पदे

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक य पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील

Salary for MPSC PSI Job 2024

पदाचे नाववेतन 
 MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 202438,600/-  to 1,22,800/-

Important Instruction For MPSC PSI Main Examination 2024 Notification

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC PSI Online Bharti 2024 Details

???? Name of DepartmentMaharashtra Public Service Commission
???? Recruitment DetailsMaharashtra Public Service Commission Recruitment 2024
???? Name of PostsMPSC PSI Main Examination 2024
???? No of Posts615 Vacancies
???? Job Location
✍???? Application Modeonline
✅ Official WebSite  mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC PSI Exam Recruitment 2024

MPSC PSI Main Examination 2024Currently working Assistant Sub-Inspector of Police, Police Constable, Police Naik or Police Sepoy under the jurisdiction of Home Department of Government of Maharashtra will be eligible for this examination.

Exam Fee For MPSC PSI Online Form 2024

FeeOpen Category – Rs. 844/-
Backward Class – Rs. 544/-

MPSC PSI Vacancy Details 2024

MPSC PSI Main Examination 2024 615

Required Documents For MPSC PSI Arj 2024

 Required Documents

 mpsc.gov.in Bharti Important Links

???? Full AdvertisementREAD PDF
????Online Application Link Apply Online
✅ Official WebsiteOfficial Website

मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नतीद्वारे पोलिस कॉन्स्टेबलमधून पोलिस उपनिरीक्षकांची (पीएसआय) पदे भरण्याच्या प्रक्रियेत मागील काही वर्षांपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अतुल चांदूरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याप्रश्नी नुकताच अंतिम निर्णय दिला असल्याने या विषयातील संभ्रम बऱ्याच अंशी दूर झाला आहे.

 

‘प्रशिक्षणासाठी पाठवलेले आरक्षण प्रवर्गातील १५४ उमेदवार आणि खुल्या प्रवर्गातील १५४ उमेदवार या दोन गटांपैकी केवळ एकाच गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पदोन्नती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सन २०१६मधील जाहिरातीप्रमाणे अधिसूचित केलेल्या ८२८ पीएसआय पदांव्यतिरिक्त एकही अतिरिक्त जागा भरली जाणार नाही. राज्य सरकारची यासंदर्भातील भूमिका न्यायालयातील हमी म्हणून नोंदवली जात आहे. जाहिरात ८२८ पदांसाठी असल्याने तेवढ्याच जागा भरल्या जाऊ शकतात. परिणामी अन्य एका खंडपीठाच्या २५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या अंतरिम आदेशाच्या आधारे ज्या १३३ अतिरिक्त उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे, त्यांना माघारी बोलावून मूळ पदांवर नेमावे. सरकारने आपली चूक सुधारण्याच्या हेतूने खुल्या प्रवर्गातील ज्या १५४ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले, त्यांच्यापेक्षा याचिकाकर्ते गुणवंत नसतील तर त्यांचा पदोन्नतीसाठी विचार होऊ शकत नाही. तसेच, या आदेशाची अंमलबजावणी २० मार्चपासूनच्या सहा आठवड्यांनंतर होईल’, असे खंडपीठाने ७८ पानी निर्णयात स्पष्ट केले.

तसेच, पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके जाणून घ्या

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC स्पर्धा परीक्षा २०२४ वेळापत्रक जाहीर; तुमची परीक्षा कधी ते बघा! | MPSC Timetable 2024

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड