पुणे आरटीओत वर्षभरापासून पदे रिक्त – राज्यातील परिवहन विभागातील रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी | Pune RTO Bharti 2024
Pune RTO Bharti 2024
Pune RTO Bharti 2024: 100 posts of Assistant Regional Transport Officer in Transport Department are vacant. Due to this, there is a delay in the work of the vehicle drivers and owners. The system in RTO is also shutting down in Adhi. Therefore, Baba Shinde has demanded that the transport department should immediately promote and recruit vacant posts. The post of sub-regional transport officer has been vacant for a year in Pune RTO, which is the highest revenue earner in the state. Also, the Regional Transport Officer post has been held by the Sub-Regional Transport Officer for four months. Know More details about Pune RTO Bharti 2024 at below:
राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे आरटीओमध्ये एका वर्षापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. तसेच, प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे चार महिन्यांपासून आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एकाच अधिकाऱ्यावर पुणे आरटीओच्या सर्व कामांचा भार आहे. तसेच, इतर काही पदे रिक्त असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे. रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहन-मालक- चालक प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरटीओमध्ये वाहन मालक आणि चालकांच्या कामांना विलंब होत आहे. गर्दी अधिक आणि मनुष्यबळ अपुरे अशी स्थिती सध्या परिवहन विभागात आहे. त्यामुळे राज्यातील परिवहन विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत. रखडलेल्या पदोन्नती आणि बदल्या तत्काळ कराव्यात, अशीही मागणी बाबा शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, परिवहन विभागात सध्या अप्पर व सहआयुक्तांची सात पदे रिक्त आहेत. तर, २३ प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचा तात्पुरता पदभार सध्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. पदोन्नती रखडल्यामुळे आरटीओचा कारभार अतिरिक्त कारभार उप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे आहे.
तसेच, परिवहन विभागातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची १०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वाहन चालक व मालकांची कामे होण्यास विलंब लागत आहे. त्यात आरटीओतील यंत्रणाही अधी-मध्ये बंद पडत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने तात्काळ पदोन्नती करावी आणि रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी बाबा शिंदे यांनी केली आहे.
Comments are closed.