7th Pay Commission : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आला आहे. बीएमसी आयुक्तांनी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा आजारी झाले आहे. खरे तर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 51 हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात सरकारने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फक्त 31 हजार रुपये बोनस मंजूर केला असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी सुद्धा आहे.
2024 च्या दिवाळीत बीएमसी च्या कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळाला होता. यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये अतिरिक्त बोनस देण्यात आला असून यामुळे काही कर्मचाऱ्यांनी नक्कीच समाधान व्यक्त केले असून या बोनसच्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही उत्साहात साजरा होईल अशी आशा आहे.
दरम्यान, आता मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचा पगार लवकर दिला जाणार आहे.
ऑक्टोबर महिन्याचा पगार हा नोव्हेंबर मध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र दिवाळीच्या निमित्ताने ऑक्टोबरचा पगार ऑक्टोबरमध्येचं देण्यात यावा असे निर्देश शासनाकडून जारी झाले आहेत. यावर्षी दिवाळी 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना याआधीच ऑक्टोबरचे वेतन मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
आगाऊ वेतन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरच अधिकृत शासन निर्णय जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नक्कीच दिवाळीआधी ऑक्टोबरचा पगार मिळाला तर सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना पैशांची तंगी भासणार नाही यामुळे या निर्णयाचे स्वागत होत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! पुढील वर्षी आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असली तरी, सध्याच्या सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ता (DA) वाढण्याची शक्यता आहे. मार्च 2025 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये ही वाढ लागू होऊ शकते. यातील पहिली वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होईल आणि ती होळीच्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे.

होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ?
या वर्षी होळी 14 मार्च 2025 रोजी आहे. त्यामुळे होळीपूर्वी केंद्र सरकार महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. महागाई भत्ता वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच पेन्शनधारकांच्या निवृत्तिवेतनात वाढ होईल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना DA (Dearness Allowance) दिला जातो, तर पेन्शनधारकांना DR (Dearness Relief) मिळतो.
वर्षातून दोनदा DA वाढ
सातव्या वेतन आयोगानुसार वर्षातून दोनदा DA वाढतो – पहिला 1 जानेवारीपासून आणि दुसरा 1 जुलैपासून लागू होतो. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सरकारने DA 3% ने वाढवून तो मूळ वेतनाच्या 50% वरून 53% केला. पेन्शनधारकांनाही तितक्याच प्रमाणात फायदा झाला.
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढेल?
अंदाजानुसार मार्च 2025 मध्ये सरकार 3-4% महागाई भत्ता वाढवू शकते.
जर 3% वाढ झाली, तर एंट्री-लेव्हल सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढ 540 ते 720 रुपयांपर्यंत होईल.
4% वाढ झाल्यास ही वाढ 720 ते 960 रुपये दरमहा इतकी असू शकते.
सध्या ₹30,000 वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला ₹9,000 DA मिळतो. 3% वाढ झाल्यास हा भत्ता ₹9,540 होईल, तर 4% वाढ झाल्यास ₹9,720 होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी!
महागाईच्या पार्श्वभूमीवर DA वाढ हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. केंद्र सरकार होळीपूर्वी अधिकृत घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















