पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल विभाग सुरू करावा, या विभागामार्फत विद्यार्थ्यांना रोजगारासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन करावे. त्याबरोबरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक थोरणानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना विविध कंपनी, उद्योग तसेच संस्थांमध्ये अप्रैटीसशिप-प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करून त्यांना तशी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले. बुधवारी, सोलापूर विद्यापीठात भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ अप्रैटीसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभाग, मुंबई आणि विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, अभ्यासमंडळे विभाग यांच्यामार्फत इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इट्रॅक्शन मिट पार पडले.

नऊ हजारांचे विद्यावेतन यावेळी बोलताना एन. एन. वडोदे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारत सरकारद्वारा सर्व विद्याथ्यांना अप्रेंटीसशिपची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान अप्रैटशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला ९,००० विद्यावेत देण्यात येणार आहे. यातील ५० टक्के भाग भारत सरकारद्वारे आस्थापनांना दिला जातो.
विचारमंचावर प्रिसिजन कंपनीच्या संचालिका डॉ. सुहासिनी शहा, प्र- कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, बोर्ड ऑफ अप्रेंटीसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन. एन. वडोदे, स्मृती ऑरगॅनिकचे एचआर प्रमुख कमलाकर गज्जम, महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसचे रोहन कुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















