सोलापुरात शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष ज्ञानासाठी विद्यार्थ्यांना ‘अप्रेंटीसशिप’ची संधी! – CMYKPY Solapur Recruitme 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल विभाग सुरू करावा, या विभागामार्फत विद्यार्थ्यांना रोजगारासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन करावे. त्याबरोबरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक थोरणानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना विविध कंपनी, उद्योग तसेच संस्थांमध्ये अप्रैटीसशिप-प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करून त्यांना तशी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले. बुधवारी, सोलापूर विद्यापीठात भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ अप्रैटीसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभाग, मुंबई आणि विद्यापीठातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, अभ्यासमंडळे विभाग यांच्यामार्फत इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इट्रॅक्शन मिट पार पडले. 

नऊ हजारांचे विद्यावेतन यावेळी बोलताना एन. एन. वडोदे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारत सरकारद्वारा सर्व विद्याथ्यांना अप्रेंटीसशिपची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान अप्रैटशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला ९,०००  विद्यावेत देण्यात येणार आहे. यातील ५० टक्के भाग भारत सरकारद्वारे आस्थापनांना दिला जातो.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विचारमंचावर प्रिसिजन कंपनीच्या संचालिका डॉ. सुहासिनी शहा, प्र- कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, बोर्ड ऑफ अप्रेंटीसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे उपसंचालक एन. एन. वडोदे, स्मृती ऑरगॅनिकचे एचआर प्रमुख कमलाकर गज्जम, महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसचे रोहन कुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड