जामखेड पंचायत समिती ही ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मुख्य दुवा आहे. शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम आणि ग्रामविकासासह विविध क्षेत्रांतील महत्त्वाचे प्रशासन पंचायत समितीमार्फत चालते. मात्र, सध्या या समितीत 126 पदे रिक्त असल्याने प्रशासनावर मोठा ताण येत आहे. Zilha Parishad Vacancies in Jamkhed!

पंचायत समितीच्या 13 वेगवेगळ्या विभागांत ही पदे रिक्त असून, तालुक्यात एकीकडे बेरोजगारी वाढत आहे, तर दुसरीकडे रिक्त जागा न भरल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी त्वरित या जागा भरण्याचे पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.
रिक्त जागांमुळे सेवांवर परिणाम
निवडणुकांचे वर्ष असल्याने प्रशासनावर आधीच कामाचा मोठा भार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी पडत आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शिक्षण विभागात 53, आरोग्य विभागात 9 आणि ग्रामपंचायतींत 15 पदे रिक्त आहेत. तसेच कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जलसंधारण अधिकारी, उपअभियंता आणि गटशिक्षणाधिकारी यांसारखी अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने जनतेला आवश्यक सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.
रिक्त पदांची यादी:
- पंचायत समिती विभाग: कृषी अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक, ग्रामपंचायत अधिकारी (15)
- आरोग्य विभाग: औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक-सेविका
- पशुवैद्यकीय विभाग: पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन अधिकारी
- शिक्षण विभाग: गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, विस्तार अधिकारी शिक्षण, मुख्याध्यापक, शिक्षक (प्राथमिक व पदवीधर)
- बांधकाम विभाग: जलसंधारण अधिकारी, स्थापत्य सहायक, अनुरेखक
- पाणीपुरवठा विभाग: उपअभियंता, शाखा अभियंता
- एकात्मिक बाल विकास प्रकल्प: बालविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस (एकूण 32)
तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सक्षम होण्यासाठी या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















