सांगली जिल्हापरिषद १०९ पद रिक्त – ZP Sangli Bharti 2021

ZP Sangli Bharti 2021

ZP Sangli Bharti 2021 Details : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. हे प्रमाण मंजूर पदांच्या ३३ टक्के इतके गंभीर आहे. या पदांवर भरती किंवा नवीन अधिकाऱ्यांची बदली होण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे विकास कामांची गतीही रोडावली आहे. पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागाची मोठी अडचण झाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रव्यवहार केला आहे, मात्र शासनाकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या विषयात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे. 

जिल्हा परिषदेच्या वित्त आणि लेखा विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व विभागांमध्ये रिक्त जागांची समस्या आहे. शिक्षण विभागाने आता मॉडेल स्कूलचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. परंतु, जिल्हा शिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पदच रिक्त आहे. त्या शिवाय, एकूण सतरा पदे रिक्त आहेत. त्यात शिक्षकांच्या पदांचा समावेश नाही. ही प्रशासकीय पदे आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. हा विषय येत्या काही दिवसांत मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

पशुसंवर्धन हा जिल्ह्यातील महत्त्वाचा शेती पूरक व्यवसाय आहे. त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहेत. तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. ही पदे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्‍टरांवर प्रचंड ताण आहे. या सर्व परिस्थितीत पद भरतीसाठी ग्रामविकास विभागाकडे ताकदीने पाठपुरावा सुरू आहे. त्यात किती यश येते, याकडे लक्ष असेल.

विभागनिहाय रिक्त पदे अशी 

 • बांधकाम विभाग : ४
 • जलसंधारण : ७
 • पाणीपुरवठा : ६
 • आरोग्य : १४
 • पशुसंवर्धन : ५१
 • कृषी : २
 • शिक्षण : १७
 • समाजकल्याण : १
 • बाल विकास : ७

प्रतिक्रिया
जिल्हा परिषदेच्या कामकाजात रिक्त पदांची अडचण मोठी आहे. कामे गतीने मार्गी लागत नाहीत आणि एखादा नवा उपक्रम हाती घ्यायचा तर मनुष्यबळाची अडचण होते. त्या बाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
– प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

जिल्हा परिषद अध्यक्षांना मी मंत्रालयात बोलावले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत एक बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल. मी या विषयात लक्ष घातले आहे.
-जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली.


जिल्हा परिषद सांगली येथे शिक्षण सेवक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

ZP सांगली भरती कागदपत्र पडताळणी यादी

 • पदाचे नाव – शिक्षण सेवक
 • पद संख्या – ४ जागा
 • नोकरी ठिकाण – सांगली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद, सांगली, जिल्हा परिषद, कार्यालय, पुष्पराज चौक, सांगली-मिरज रोड, सांगली, पिन – ४१६४१६
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
शिक्षण सेवक०४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा1 Comment
 1. Hrushikesh mohan bhosale says

  अर्ज करण्याची तारीख 6 जानेवारी2020 आहे आता 2021 आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड