जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया सुरू
ZP Recruitment process started now
परिषदेकडील ७१४ रिक्त पदांसाठी सरळसेवेने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकूण पदांपैकी दहा टक्के म्हणजेच ७४ पदे ग्रामपंचायत कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादीमधून शैक्षणिक अर्हता आणि सेवा ज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. ही प्रक्रिया पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, आचारसंहितेमुळे निवडीचे आदेश देण्यात आले नव्हते. या प्रश्नी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत संघटनांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. तेव्हा १० टक्के सेवक भरतीचे आदेश काढले जातील असे आश्वासन तत्कालीन अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषद सेवक म्हणून भरावयाच्या १० टक्के जागाच्या भरतीसाठी हालचालींना वेग आला होता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेली भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या भरती प्रक्रियेसंदर्भात नुकतीच अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या यादीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी करून कागदपत्रांच्या छायांकित प्रती प्राप्त करून घेण्यात आल्या आहेत. कागदपत्रांच्या छाननीनंतर आढळलेल्या त्रुटींच्या आधारे आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती ग्रामपंचायतीकडून घेऊन त्याद्वारे दुरुस्ती करण्यासाठी सुधारित अंतिम यादीचे काम सुरू आहे. हे काम येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण करून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात येणार आहे.
- जिल्हा परिषद लातूर भरती २०२० – शेवटची तारीख: 10-Feb-2020
-
जिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०२० – शेवटची तारीख: 18-Feb-2020
-
नाशिक महानगरपालिका भरती २०२० – शेवटची तारीख: 10-Feb-2020
2020 chi police bharti kadhi honar aahe
नवीन की आहे तीच
पोलीस भरती कधी निघणार
I am the electrition
I am the election