महत्वाचे! जिल्हा परिषदेमध्ये 700 नवीन आरोग्यसेविकांची भरती! – ZP Nashik Bharti 2024

ZP Nashik Bharti 2024

ZP Nashik Bharti 2024 | @zpNashik.maharashtra.gov.in

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या पदभरतीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत निकाल घोषित झालेल्या आरोग्यसेविका, आरोग्यसेवक पुरुष (४० टक्के) या उमेदवारांच्या कागदपत्रांची सोमवारी (ता. ७) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर दोन दिवसांत उमेदवारांना नियुक्तिपत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. (700 health workers to ZP)

ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार १८ ते ३० जुलैदरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक (महिला), आरोग्यसेवक (पुरुष), ४० टक्के आरोग्यसेवक (पुरुष), ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदांच्या परीक्षेचा निकाल ‘आयबीपीएस’कडून प्राप्त झाल्यावर २९ ऑगस्टला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला होता. निकाल घोषित झाल्यावर पुढील प्रक्रियेबाबत शासनस्तरावरून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नव्हते. मात्र, गत आठवड्यात मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर, जिल्हा परिषदेच्या पदभरतीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

त्यानुसार, प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांना शनिवारी व रविवारी आरोग्य विभाग खुला ठेवत, मोबाईलद्वारे कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलविण्यात आले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्या नेतृत्वाखालील १५ तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या २० टीमद्वारे उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मुख्यालयातील जुन्या सभागृहात सेवकपदासाठी आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. आरोग्यसेविका या पदाच्या ५९७ जागांसाठी ७०० हून अधिक उमेदवारांना बोलविण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती.  राहिलेली काही तपासणी ही मंगळवारी (ता. ८) केली जाणार आहे. आरोग्यसेवक (४० टक्के पुरुष) या पदाच्या ८५ जागांसाठी २०० उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली. दोन दिवसांत अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत.

 

आरोग्यसेवक, सेविका या पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी उमेदवारांना बोलविण्यात आले होते. अगदी अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांतून उमेदवार आलेले होते. अनेक उमेदवारांबरोबर त्यांचे नातेवाईकही असल्याने मुख्यालयात एकच गर्दी झाली होती. मुख्यालयाच्या आवारात ही गर्दी झाल्याने आवाराला जणू जत्रेचे स्वरूप आलेले दिसत होते.

 

 

 

: : Previous Updates : : 

जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्त्वावर १२ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. यात ३ ग्रामसेवक, ५ आरोग्य सेवक, १ औषध निर्माण अधिकारी, ३ कनिष्ठ सहायक लेखा यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असताना मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात येते. जिल्हा परिषदेतील एकूण रिक्त पदांच्या २० टक्के पदांवर अनुकंपा वारसांना नियुक्ती देण्यात येते. यानुसार पात्र ठरलेल्या १२ गट ड कर्मचाऱ्यांना गट क पदावर समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली. उर्वरित २० कर्मचाऱ्यांना रिक्त होणाऱ्या पदांनुसार पुन्हा संधी देण्यात येणार आहे. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, ग्रामपंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी मंगेश चव्हाण आधी उपस्थित होते. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 


ग्रामसेवक अधिकाऱ्याचेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्यापासून जिल्हा परिषदेत खळबळ उडून सर्वांच्याच प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेत प्रशासनाकडून सर्व विभागनिहाय प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येत आहे. त्यात जिल्हा परिषदेतील ६०९ दिव्यांगांपैकी केवळ ४११ दिव्यांगांकडेच यूडीआयडी प्रमाणपत्र असून तब्बल १९८ दिव्यांग कर्मचाऱ्यांनी अद्याप पोर्टलवर नोंदणी केलेली नाही. त्यात प्रामुख्याने सर्वाधिक दिव्यांग शिक्षकांचाच भरणा अधिक आहे.

जिल्हा परिषदेत ६०९ पैकी ४११ दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे युडीआयडी कार्ड आहेत. १९८ जणांकडे युडीआयडी कार्ड नसल्याचे समोर आले आहे. १९ एप्रिल २०२४ पर्यंत युडीआयडी कार्ड सादर करावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी दिंडोरी येथील ग्रामसेवक अधिकारी संजय पाटील यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण समोर आले. याबाबत चौकशी केली असता हे बनावट आढळले आहे. त्यामुळे सिन्नर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासन अलर्टवर आले असून, त्यांनी जिल्हा परिषदेच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम हाती घेतले. त्यात १९८ कर्मचाऱ्यांकडे युडीआयडी कार्ड नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १९ एप्रिलपर्यंत एवढी युडीआयडी कार्ड सादर करावे असे आदेश सीईओ आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.

 

Important Links For zpNashik.maharashtra.gov.in Bharti

???? PDF जाहिरात ????https://t.co/FYO3khUZDY
???? ऑनलाईन अर्ज करा ✍https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
✅ अधिकृत वेबसाईट ????https://zpnashik.maharashtra.gov.in/
???? ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा ????जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा
????जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या  ????जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

25 Comments
  1. Anuja shelke says

    Rada jhali Parat kadhi honar bharti

  2. sayali says

    please reply…kasa form download krycha and submit procedure sanga purn

  3. Yogesh says

    Form kasa download karava site var

  4. Yogesh says

    How to apply sir please explain

  5. Mayuri bhavsar says

    Form kass download karycha…zpnashik chua website vr available ny ajun…and submit karycha addresses pn ny dilya…plz suggestions dya

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड