Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये महाभरती; ४१४७ पदांना मंजुरी !! ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2023

ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2023

ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2023

ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2023 – The review of the posts in the rural water supply department in the Zilla Parishads has been completed, and the outline determined after the review. It was presented before the High Level Secretary Committee headed by the Chief Secretary in its meeting dated 29.04.2022. As approved by this committee, the revised pattern of 4147 posts in rural water supply department/sub-division in Zilla Parishads has been fixed vide Government decision dated 28.12.2022 under reference. . Another Big Update at the end Of the Year For Government Job Aspiring candidates !! Upcoming Year is Full of Maharashtra Government Jobs !! Candidates Be ready for this Maha Mega Recruitment 2023. The Maharashtra government issued a new GR to fill vacant posts in the district councils of Maharashtra state under Water Supply and Sanitation Department, Maharashtra State. For 34 Zilla Parishads in the state, in addition to the regular Sanctinoed posts, additional posts have been sanctioned as per requirement. 4,147 posts will be filled on a regular scale and the remaining 1760 posts will be filled through outsourcing. Check all details about ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2023 at below :

 

जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील पदांचा आढावा पूर्ण झाला असून, आढाव्याअंती निश्चित केलेला आकृतिबंध मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीसमोर दिनांक २९.०४.२०२२ च्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता. या समितीने मंजूर केल्याप्रमाणे जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात/उपविभागातील ४१४७ पदांचा सुधारित आकृतीबंध संदर्भाधीन दिनांक २८.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला आहे.

आता वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक २१.०६.२००६ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सुधारीत आकृतीबंधातील एकूण मंजूर पदांपैकी ८० टक्के पदे स्थायी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग / उपविभागासाठी मंजूर असलेल्या एकूण ४१४७ पदांच्या सुधारित आकृतीबंधातील पुढीलप्रमाणे २७६५ पदे स्थायी पदे म्हणून मंजूर करण्यात येत आहे.

 

नवीन परिपत्रक बघा !

 


 

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांमधील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडुन दि.28.12.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांकरीता नियमित मुंजर पदांव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार अधिसंख्य पदे मंजुर करण्यात आलेली आहेत. नियमित वेतनश्रेणीवर 4,147 पदे भरण्यात येणार असून, उर्वरित 1760 पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा परिषदेसाठी संदर्भाधीन दिनांक ४.०८.२०१५ च्या शासन निर्णयान्वये नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांतील पदांचा नव्याने आढावा घेण्याच्या सूचना वित्त विभागाने संदर्भाधीन दिनांक २९.०६.२०१७ च्या शासन निर्णयान्वये दिल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील पदांचा आढावा मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीसमोर दिनांक २९.०४.२०२२ च्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता. या समितीने मंजूर केल्याप्रमाणे जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

गुलाबराव पाटील : ३५५ उपविभागांसाठी ४,१४७ पदांना मंजुरी

राज्यातील 34 जिल्हा परिषदांसाठी नियमित मंजूर पदांव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार अतिरिक्त पदे मंजूर करण्यात आली आहेत. 4,147 पदे नियमित स्तरावर भरण्यात येणार असून उर्वरित 1760 पदे आउटसोर्सिंगद्वारे भरण्यात येणार आहेत.

नियमित वेतनश्रेणीमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखाधिकारी, सहायक अर्जदार, वरिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक लेखा, मेकॅनिक, रिंगमन, कनिष्ठ सहाय्यक या पदांचा समावेश आहे.

आउटसोर्स केडरमध्ये ड्रायव्हर, वर्ग डी कर्मचारी, माहिती शिक्षण आणि संप्रेषण विशेषज्ञ तसेच डेटा एंट्री ऑपरेटरची पदे समाविष्ट आहेत. या निर्णयानुसार, शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग/उपविभागातील पदांचा सुधारित तक्ता अंतिम करण्यात येत असून, या तक्त्यातील ४,१४७ नियमित पदांपैकी – भरण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 3 संवर्गांच्या थेट सेवा कोट्यातील रिक्त जागा.

वित्त विभागाच्या संदर्भात दि.31.10.2022 च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया सुरू करावी, असे नमूद करण्यात आले आहे. तर 1760 पदांच्या भरतीसाठी बाह्य स्रोतांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत.

शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने राज्यात एकूण ३५५ तालुक्यांसाठी ३५५ उपविभाग व या उपविभागांत प्रत्येकी नऊ याप्रमाणे एकूण तीन हजार १९५ नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच वाहनचालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, माहिती शिक्षण व सुसंवादतज्ज्ञ अशी एकूण एक हजार ७६० पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात एकूण स्वतंत्र १५ उपविभाग तयार होणार असून पूर्वी या विभागात ६० पदे होती.

बाह्यस्त्रोत संवर्गामध्ये वाहनचालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, माहिती शिक्षण व सुसंवाद त्याचबरोबर डाटा एन्ट्री ऑपरेटर या

पदाचाही समावेश आहे. संबंधित निर्णयानुसार जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात उपविभागातील पदांचा सुधारित आकृतिबंध या शासन निर्णयान्वये अंतिम करण्यात येत असल्यामुळे या आकृतिबंधातील चार हजार १४७ नियमित पदांपैकी वर्ग संवर्गाची सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti Salary Details

ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2023

जिल्ह्याचा उपविभाग जळगाव जिल्ह्यात पूर्वी स्थापत्य उपअभियंता सहा, कनिष्ठ अभियंता ३६, वरिष्ठ सहाय्यक सहा, कनिष्ठ सहाय्यक १२ एकूण अशा ६० पदांना मंजुरी होती. मात्र शासन निर्णयामुळे या पदांमध्ये ७५ ने वाढ होऊन एकूण १३५ नियमित पदांना मान्यता मिळाली आहे. नव्याने बाह्य यंत्रणेद्वारे वाहनचालक १५, डाटा एन्ट्री ऑपरेटर १५ व चतुर्थश्रेणी ३० अशा एकूण ६० कर्मचारी या पदांना मंजुरी मिळाल्यामुळे जिल्ह्यात एकूण पूर्वी असलेल्या ६० पदांमध्ये नव्याने १३५ ने वाढ होऊन आता १९५ पदांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलजीवन मिशन बळकट होण्यास मदत होणार असून, प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र एक उपविभाग झाल्यामुळे पाणीपुरवठा यशस्वी करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग भरती २०२३ पूर्ण GR बघा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Abhilesh adhe says

    Hi sir

  2. Abhilesh adhe says

    Hi sir Jalsampdha bharti kadhi ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड