Zomato मध्ये 800 जागांसाठी नोकरीची संधी- Zomato Vacancies 2023
Zomato Vacancies 2023
Zomato Vacancies 2023 – Zomato is looking for the 800 candidates under the Zomato Industries. The post name & other important details are given below. This recruitment update is given by the CEO Dipinder Goyal on Linkedin.
सध्या अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात असल्याने नोकरदार वर्ग चिंतेत आहे. गेल्या काही दिवसात मायक्रोसॉफ्ट (Microsoft), अॅमेझॉन (Amazon), गुगल (Google), मेटा (Meta) आणि ट्विटरमध्ये (Twitter) मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात करण्यात आली आहे. नुकतंच स्पॉटिफायनेही (Spotify) कर्मचारीकपात केली जाणार असल्याची घोषणा केली असून सहा टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारीकपात केली जात असल्याने चिंता सतावत असताना झोमॅटोने (Zomato) मात्र नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी LinkedIn वर कर्मचारी भरती केली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. इंजिनिअर, प्रोडक्ट मॅनेजर, ग्रोथ मॅनेजर अशा वेगवेगळ्या पदांसाठी 800 जागा भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांची LinkedIn पोस्ट
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC अंतर्गत लिपिक आणि अन्य 8211 पदांची नवीन भरती सुरु- त्वरित अर्ज करा!
✅SSC MTS 11409 पदांची भरती सुरु - 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी
✅3628 पदांच्या तलाठी भरतीला मान्यता –नवीन आदेश प्रकाशित
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी आपल्या अकाऊंटवर पाच पदांसाठी जागा असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये चीफ ऑफ स्टाफ टू सीईओ (Chief of Staff to CEO), जनरलिस्ट (Generalist), ग्रोथ मॅनेजर (Growth Manager), प्रोडक्ट ओनर (Product Owner) आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर (Software Development Engineer) यांचा समावेश आहे. “या पाच पदांसाठी आमच्याकडे 800 जागा आहेत. या पदांसाठी जर तुमच्या ओळखीत कोणी असेल तर त्यांना टॅग करा,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.