जिल्हा परिषद मध्ये अनुकंपा तत्त्वावर ४० उमेदवारांची नियुक्ती! – ZP Bharti 2025
Zilla Parishad Bharti 2024, ZP Bharti 2025
Jilha Parishad Bharti New Update
जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्त्वावर ज्येष्ठता यादीत प्रतीक्षेत असलेल्या ३४ उमेदवारांना गट ‘ड’ संवर्गात, तर सध्या अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या गट ‘ड’ मधील पात्र सहा कर्मचाऱ्यांना गट ‘क’ मधील पदावर अशा ४० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या समुपदेशनावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. शासनाच्या धोरणानुसार, जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असताना मृत पावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिली जाते.
मृत्यूपश्चात एक वर्षाच्या आत संबंधित कार्यालयामार्फत प्रस्ताव सादर करून वारसाचा समावेश ज्येष्ठता यादीत केला जातो. उपलब्ध रिक्त पदांपैकी १० टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर भरली जातात. शैक्षणिक पात्रतेनुसार गट क मधील पद रिक्त नसेल, तर संबंधित उमेदवाराला गट ड मधील पदावर नियुक्ती आणि त्यानंतर पद उपलब्ध झाल्यास गट क पदावर पदोन्नतीही केली जाते. गट ड संवर्गातील एकूण ४८ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. यातील पात्र ३४ उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने नियुक्ती दिली. उर्वरित उमेदवारांना पुढील रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे गट ड मधील पात्र ६ कर्मचाऱ्यांना गट क मध्ये पदोन्नती दिली असून, चार कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहायक (लेखा), एका कर्मचाऱ्यास वरिष्ठ सहायक (लेखा), तर एका कर्मचाऱ्यास पर्यवेक्षिका म्हणून नियुक्ती दिली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्यामध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आहे व गेल्या कित्येक दिवसापासून कंत्राटी तत्वावर बरेच कर्मचारी सेवा बजावत आहेत. अगदी हीच परिस्थिती आपल्याला आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून देखील दिसून येते जर आपण राज्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यात जवळपास 30 हजार हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत व आता या 30 हजार कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नक्कीच आता या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी असलेल्या 30 हजार कर्मचाऱ्यांचे होणार नियमित समायोजन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी असलेल्या 30000 कर्मचाऱ्यांचे नियमित समायोजन केले जाणार असून या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवण्यात आलेले आहे व यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त पदांची माहिती मागविण्यात आलेली आहे.
संपूर्ण राज्याचा विचार केला तर आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुमारे एकूण 30 हजार कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करत असून यामध्ये अधिपरिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी तसेच स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, औषध निर्माण अधिकारी व लेखा अधिकारी तसेच कार्यक्रमाधिकारी व इतर पदांचा यामध्ये समावेश आहे.
13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता निर्णय
शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते व त्याबाबत 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समावेशनाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.परंतु अजून पर्यंत यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नव्हती व कर्मचाऱ्यांना समावेशनाची प्रतीक्षा लागून होती. परंतु आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद येथे अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कामांचा मात्र खोळंबा होत असल्याचे चित्र दिसत आहे. ZP Palghar Application 2025 सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका पालघरच्या ग्रामीण जनतेला बसत असल्याचे जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांच्या स्थितीवरून दिसून येते. जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ४००० पेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम जनविकासाच्या कामांवर होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकासही खुंटात असल्याचे आरोप केले जात आहेत. जिल्ह्यात महायुतीचे एक खासदार व पाच आमदार सत्ताधारी पक्षात आहेत. त्यांनी सरकार दरबारी या प्रश्नावर विशेष लक्ष देऊन रिक्त पदाचा प्रश्न सोडवला पाहिजे, अशी ही मागणी जिल्हा वासियांकडून करण्यात येत आहे. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत आठ पंचायत समित्या येत असून मोखाडा, विक्रमगड या दोन पंचायत समित्यांना गटविकास अधिकारीच नाहीत. तर तलासरी, विक्रमगड या पंचायत समित्यांना सहाय्यक गटविकास अधिकार्यांची कमतरता आहे. ग्रामीण जनतेला दुर्गम भागात रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेले गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी हे पद गेल्या दहा वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात पालघर जिल्ह्यातील बहुतांश मुले व मुली जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शिक्षण घेत असतात. या शिक्षण विभागाला सुद्धा रिक्त पदांची घरघर लागलेली आहे. पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू व वाडा अशा सहा तालुक्यांना गटशिक्षण अधिकारीच नाही. यासह प्राथमिक व माध्यमिक विभागाची प्रत्येकी दोन उपशिक्षण अधिकारी पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात कुपोषण व अंगणवाडी याकडे विशेष लक्ष देणार्या महिला बालकल्याण विभागामध्येही रिक्त पदांचा परिणाम जिल्ह्याच्या कुपोषणावर होत आहे. या विभागासाठी अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवणारे अनुसूचित जमाती क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारीच अजूनही शासनाने दिलेले नाहीत. ११ पैकी तब्बल ६ पदे येथे रिक्त आहेत तर बिगर आदिवासी क्षेत्रांमध्ये ही एक पद या अंतर्गत रिक्त आहे.
Zilla Parishad Bharti 2024: सरकारी भरती प्रक्रियेत माजी सैनिकांसाठी समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. तथापि, माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास, त्या पदांचा अनुशेष न ठेवता, सदर रिक्त पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना देण्यात येतील. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- अनुशेष न ठेवण्याची सूचना:
माजी सैनिक आरक्षणासाठी नियुक्त होणाऱ्या पदांसाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यास, त्या पदांसाठी अनुशेष न ठेवता तत्काळ भरती प्रक्रिया सुरू करावी. - सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार भरती:
संबंधित रिक्त पदे माजी सैनिक उमेदवारांशिवाय इतर पात्र उमेदवारांमध्ये गुणवत्तेनुसार भरावीत. यासाठी संबंधित सामाजिक प्रवर्गाचे आरक्षण निकष विचारात घेतले जातील. - सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश:
दिनांक 25 जानेवारी 2024 रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकातील नियम आणि निर्देश यानुसारच भरती प्रक्रिया राबवावी. - सर्व जिल्हा परिषदेच्या सूचना:
सर्व जिल्हा परिषदांनी या प्रक्रियेचे काटेकोर पालन करून पदभरती कार्यवाही सुनिश्चित करावी, जेणेकरून कोणतेही पद रिक्त राहणार नाही.
उद्दिष्ट:
या प्रक्रियेमुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना समान संधी मिळेल आणि कोणतीही रिक्तता न राहता वेळेत पदभरती होईल.
यासंदर्भात अधिक माहिती किंवा पुढील प्रक्रिया निश्चित करण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
Zilla Parishad Bharti Update 2024
जिल्हा परिषदेच्या मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक (महिला), आरोग्य सेवक (पुरूष) ४० टक्के, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) पदासाठी १८ जुलैपासून परीक्षांना प्रारंभ झाला आहे. त्या सर्व उमेदवारांची ३० जुलैपर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. झेडपीच्या सरळ सेवा भरतीसाठी आयबीपीएसकडून ही परीक्षा घेतली जात आहे. ज्या महिला उमदेवारांच्या पहिल्या व मधल्या, शेवटच्या नावात कोणताही फरक किंवा विसंगती असेल त्या उमेदवारास केंद्रावर मूळ राजपत्रित अधिसूचना, मूळ विवाह प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या महिला उमेदवारांच्या नावात विवाहानंतर बदल झाला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
परीक्षा केंद्रावर प्रवेशाकरिता अलिकडच्या काळातील पॅनकार्ड, पारपत्र, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक फोटोसहित, नोंदणीकृत कॉलेज व विद्यापीठाचे ओळखपत्र हे केंद्रावरील संयोजकांना सादर करणे आवश्यक आहे. विवाहित महिला उमेदवारांचे प्रवेशपत्रावर लग्नापूर्वीचे नाव असेल व पॅनकार्डवर लग्नानंतरचे नाव असेल तर पॅनकार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. महिला उमेदवारासाठी विवाह प्रमाणपत्र, राजपत्रित अधिसूचना अनिवार्य असल्याचे सीईओ श्रीअंकित यांनी पत्रकात म्हटले आहे.
जिल्हा परिषद भरती प्रक्रिया २०२३ मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गातील परिक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
गेले अनेक महिने रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला लोकसभा निवडणुकीतच मुहूर्त मिळाला होता. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा १० जूननंतर घेण्यात येणार होती. तसे वेळापत्रक जाहीरही झाले हाेते. मात्र, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली.
वर्ग ३ व ४ च्या भरती प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी यातील काही संवर्गातील भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. त्यांनतर न्यायालयाने हा विषय निकाली काढून ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती. जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या १८ पदांच्या ७१५ जागांसाठी ७०,६०८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
यात ग्रामसेवक पदासाठी ४१ हजार अर्ज दाखल झाले होते. ३ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली होती. या भरतीत आरोग्य सेवकच्या दोन पदांसाठी ६४ अर्ज, आरोग्य परिचारिकेसाठी २२७ जागांसाठी ९३२ अर्ज, आरोग्य सेवक २२ जागांसाठी ४,८१५ अर्ज, आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी ५२ जागांसाठी १,०५० अर्ज, औषध निर्माण अधिकारीच्या ३७ जागांसाठी ४,१९९ अर्ज, विस्तार अधिकारी सांख्यिकी ३ जागांसाठी ५६४, विस्तार अधिकारी कृषी ४ जागांसाठी ८११, वरिष्ठ सहायक लिपिक एका जागेसाठी २९९ अर्ज, पशुधन पर्यवेक्षक ४२ जागांसाठी १,२८६ अर्ज, कनिष्ठ आरेखक २ जागांसाठी ६१ अर्ज, वरिष्ठ सहायक लिपिक ६८ जागांसाठी ११,०४१ अर्ज, पर्यवेक्षिका ९ जागांसाठी १,५४८ अर्ज, कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा ३१ जागांसाठी १,५५७ अर्ज, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक २२ जागांसाठी ७४४ अर्ज, लघुलेखक उच्च श्रेणी १ जागेसाठी ११७ अर्ज दाखल झाले होते
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होणार असून, १ जुलैला मतमोजणी होणार आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
ZP PESA Bharti Update 2024
Zilla Parishad Bharti 2024: बिगर पेसा क्षेत्रातील २१ जिल्हापरिषदेच्या आरोग्यसेवक (पुरुष) ४० टक्के, आरोग्यसेवक (पुरुष) ५० टक्के ( हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य सेवा ( महिला) व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. तथापि रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हापरिषदेच्या क्षेत्रामध्ये कोंकण विभाग पदवीधर विधानपरिषद निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधदुर्ग या जिल्हापरिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल. उर्वरित १८ बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हापरिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची याची नोंद घ्यावी. अखेर या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. पण जिल्हा परिषदेच्या पेसा जिल्ह्यातील परीक्षा अद्यापही रखडल्या आहेत. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवडणुकीच्या काळात जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या ११ ते १३ जून या तीन दिवसांत आरोग्य सेवक (पुरुष) या संवर्गातील भरती होणार आहे. ही परीक्षा सातारा, कन्हऱ्हाड या ठिकाणच्या केंद्रांवर होणार आहे. उर्वरित ग्रामसेवक, हंगामी फवारणी कर्मचारी यासह इतर संवर्गातील पदांसाठीच्या परीक्षांच्या तारखा येत्या काही दिवसांत येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे.
उर्वरित संवर्गाचे महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जाहीर
इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची परीक्षा घेऊ शकतात तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत? असा सवाल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी केला आहे. ६ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसोबतच पेसा जिल्ह्यातील परीक्षा घ्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची भरती वादग्रस्त ठरत असून, नव्याने घोषित झालेली भरतीही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. नागपूर वैद्यकीय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे गट ड पदाची जाहिरात, सोलापूर, लातूर, पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांच्या जाहिराती आल्या असून, या विभागांच्या परीक्षाही झालेल्या नाहीत. स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी आणि अन्यायाला विरोध म्हणून शांततामय मार्गाने उपोषण करू, असा इशारा लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी दिला.
चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर केली नाही
■ ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पण, चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
■ लाखो विद्यार्थी परीक्षेची प्रतीक्षा करत आहेत. उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल, अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे
Changes In ZP Bharti Education Criteria
संवर्गाचे नाव | सुधारणा |
विस्तार अधिकारी (कृषि | विस्तार अधिकारी (कृषि) या संवर्गामध्ये ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केली असेल असे उमेदवार अर्ज करू शकतील असे जाहिरातीत नमूद केले आहे. तथापि आता त्यामध्ये खालील पदवी धारण केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतील. १) बी.एससी (ऑनर्स) उद्यानविद्या २) बी.एससी (ऑनर्स) वनविद्या ३) बी.एससी (ऑनर्स) समाजिक विज्ञान ४) बी. एफ. एससी (मत्स विज्ञान) ५) बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) ६) बी.टेक (अन्न तंत्रज्ञान) ७) बी.टेक (जैव तंत्रज्ञान) ८) बी.एससी (एबीएम) / बी.बी.एम.(कृषि) / बी.बी.ए. (कृषि) / बी.एससी (ऑनर्स) कृषि व्यवसाय व्यवस्थापन |
तारतंत्री | तारतंत्री या संवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतील असे जाहिरतीत नमूद केलेले आहे. परंतू ऑनलाईन अर्ज सादर करताना I. T. I. झालेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यास अडचण निर्माण झालेली होती. तथापि आता त्यामध्ये सुधारणा करणेत आलेली असून महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र धारण केलेल्या उमेदवारांसोबत इतर अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी Other असा पर्याय उपलब्ध करून देणेत आलेला आहे. |
विस्तार अधिकारी (शिक्षण) | विस्तार अधिकारी (शिक्षण) या संवर्गामध्ये ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराचा अनुभव हा सदर पदाची शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतरचा ग्राह्य धरला जात होता. तथापि आता सदर पदाचा ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराचा अनुभव हा सदर पदाची शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीचा असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे. |
कनिष्ठ सहाय्यक / (लेखा) कनिष्ठ सहाय्यक |
कनिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गासाठी मराठी टंकलेखन आवश्यक करण्यात आलेले आहे, असे जाहिरातीत नमूद आहे. तथापि माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन १९९१ चे जनगणना कर्मचारी, सन १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी, पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी व अनाथ मधून अर्ज करणाऱ्या ज्या उमेदवारांकडे मराठी टंकलेखन नाही, असे उमेदवार देखील अर्ज करू शकतील. |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाचा ऑनलाईन अर्ज करताना Have you passed recognized equivalent two Years Course in Construction Supervisor ? असा प्रश्न विचारणेत आला होता. परंतू सदरचा कोर्स हा एक वर्षाचा असल्यामुळे त्या पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकत नव्हते. तथापि त्यामध्ये सुधारणा करणेत आली असून आता Have you passed recognized equivalent Course in Construction Supervisor ? असा प्रश्न विचारणेत येत आहे. त्यामुळे सदर पदासाठी इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतील. |
कंत्राटी ग्रामसेवक / पशुधन पर्यवेक्षक | कंत्राटी ग्रामसेवक / पशुधन पर्यवेक्षक या संवर्गामध्ये संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात असे जाहिरातीत नमूद आहे. आता त्याचबरोबर जे उमेदवार दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतील. किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) मार्फत मान्यताप्राप्त सर्व पदवी व पदवीका (सर्व अभियांत्रिकी शाखा) प्राप्त उमेदवार किंवा इंडियन सटिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन (ICSC) यांच्या मार्फत मान्यताप्राप्त इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये असलेले संगणक व माहिती तंत्रज्ञान संबंधित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असतील. वरीलपैकी कोणत्याही एक प्रकारे संगणक व माहिती तंत्रज्ञानाबाबतचे प्रमाणपत्र धारण करीत असतील असे उमेदवार सदर पदासाठी अर्ज करू शकतात. |
District Wise ZP Bharti 2023 Links
-
????अहमदनगर जिल्हा परिषदेत ९३७ पदांची भरती जाहिरात!
-
????जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत २०४ पदांची भरती सुरु, जाहिरात प्रकाशीत
-
????जिल्हा परिषद परभणी – पदभरती 2023 सविस्तर जाहिरात
-
????धुळे जिल्हा परिषद मध्ये ३५३ पदांची पदभरती सुरु- त्वरित अर्ज करा!
-
????जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत ४५३ पदांची भरती सुरु!
-
????जिल्हा परिषद बीड मध्ये 568 पदांची भरती सुरु
-
????जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये 728 रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित
-
????८४० पदांची जिल्हा परिषद रायगड भरती २०२३ सुरु! |
-
????ZP ठाणे अंतर्गत २५५ पदांची भरती सुरु, त्वरित अर्ज करा!
-
????जाहिरात-८७५ पदांची जिल्हा परिषद यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ सुरु
-
????ZP सातारा अंतर्गत ९७२ रिक्त पदांकरीता भरती जाहिरात प्रसिद्ध!
-
????ZP अकोला अंतर्गत २८४ पदांची नवीन भरती सुरु!
-
????जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत 499 पदांकरिता भरती; ही डॉक्युमेंट्स महत्वाची
-
????सोलापूर जिल्हा परिषद मध्ये ६७४ पदांची मोट्ठी भरती सुरु!
-
????जिल्हा परिषद लातूर मध्ये 476 पदांचे भरती अर्ज सुरु!!
-
???? जिल्हा परिषद गडचिरोली ५८२ पदांची मोठी भरती सुरु!
-
???? जिल्हा परिषद जालना अंतर्गत 467 पदांची भरती सुरु!!
-
???? जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये ५१९ पदांची भरती!
-
???? जिल्हा परिषद पालघर मध्ये ९९१ पदांची भरती जाहिरात प्रकाशित!
-
????नागपूर जिल्हा परिषद मध्ये 557 पदांची भरती सुरु!
-
????वर्धा जिल्हा परिषदे अंतर्गत 371 पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा!!
-
???? भंडारा जिल्हा परिषद मध्ये ३२७ पदांची भरती सुरु!!
-
????पुणे जिल्हा परिषद मध्ये १००० पदांची भरती सुरु!
-
????ZP औरंगाबाद अंतर्गत ४३२ रिक्त पदांकरीता भरती जाहिरात प्रसिद्ध!
-
???? जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत ६५३ पदांची जाहिरात आली!
-
????जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ३३४ पदांची भरती सुरु, नवीन जाहिरात आली!
-
????जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ३३९ पदांची नवीन भरती सुरु!!
-
????जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत लवकरच ६२६ पदांची भरती!
-
????जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत २४२ पदांची नवीन भरती सुरु !
-
????जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत ४७५ रिक्त पदांची जाहीरात प्रकाशित!
-
????जिल्हा परिषद सांगली अंतर्गत ७५४ रिक्त पदांची जाहीरात प्रकाशित!
-
????रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ७१५ पदांची भरती
-
????नांदेड जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ६२८ पदांची भरती
-
????१०३८ पदांची जिल्हा परिषद नाशिक भरती जाहिरात आली!
Who Can Apply For Maha RDD ZP Bharti 2023
अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) यामध्ये कोण अर्ज करू शकतात.
जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, असे उमेदवार आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. मकसी १००७/ प्र.क्र.३६/का. ३६ दिनांक १० जुलै २००८ अन्वये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) पदांसाठी अर्ज करू शकतात.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) यामध्ये कोण अर्ज करू शकतात.
१. शासन अधिसूचना दि. २९/०८/२०१९ नुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.
२. स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ, जे उमेदवार स्वत: किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे मातापिता किंवा आजी-आजोबा हे दिनांक २६ जानेवारी १९५० पासून आजपर्यंत संबंधित जिल्ह्यांच्या अनुसूचित क्षेत्रांत सलगपणे राहत आले आहेत, असे अनुसूचित जमातीचे उमदेवार, असा आहे.
३. अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांकडे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक (मूळ) रहिवासी असल्याबाबतचा महसूली पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमदेवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांनी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसूली पुराव्याबाबत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रात (पेसा) नियुक्ती दिली जाईल.
४. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची पदे ही स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली नसून परिशिष्ठ – १ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणात एकत्रित दर्शविण्यात अलेली आहेत.
५. महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभागाकडील शासन परिपत्रक क्रमांक आविवि – २०२३/ प्र.क्र.१३२/का-१४, दि. १६/०६/२०२३ अन्वये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचा रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक राहील.
६. ज्या उमेदवारांची पेसा क्षेत्रामध्ये निवड होईल त्या उमेदवारांची बिगर पेसा क्षेत्रामध्ये बदली करता येणार नाही.
७. जाहिरातीमध्ये अनुसूचित क्षेत्रातील भरावयाची पदे ही महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८ / प्र.क्र.४२७/१६-ब, दि. १० मे, २०२३ नुसार दर्शविणेत आलेली आहेत.
ZP Recruitment Important Dates 2023
Maharashtra ZP Bharti 2023 Important Dates
Important Dates For ZP Recruitment 2023 |
|
Event | Dates |
ZP Recruitment 2023 Notification | 03 August 2023 |
Starting Date to Apply Online for ZP Recruitment 2023 | 05 August 2023 |
Last Date to Apply Online for ZP Recruitment 2023 | 25 August 2023 |
ZP Recruitment Admit Card 2023 | 07 days before the Exam |
ZP Recruitment Exam Date 2023 | Updated Soon |
ZP Recruitment Result 2023 | Updated Soon |
राज्यात तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती असणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. डेमो लिंकनंतर अंतिम लिंक पाठवण्यासाठी ग्रामीण विकास विभागाकडून सूचना येताच, जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे डेमो लिंक पाठवण्यात आली होती. त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे.
Maharashtra ZP Education Qualification 2023 – शैक्षणिक पात्रता
Post Name | Educational Qualification |
Pharmacist (औषध निर्माता) | औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार |
Health workers (Male) (आरोग्य सेवक) | विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. |
Health workers (Female) (आरोग्य सेविका) | ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील |
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
Gram Sevak (ग्रामसेवक) | किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम |
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) | यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) | विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) | स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार |
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक) | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र |
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल. |
Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार |
Jodari (जोडारी) | जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील. |
Electrician (तारतंत्री) | महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार |
Supervisor (पर्यवेक्षिका) | ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. |
Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) | संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम |
Laboratory Technician Mechanics (प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी) | ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. |
Rigman (रिगमन) | शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. |
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी) | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक |
Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)) | पदवीधर |
Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा) | पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव |
Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)) | ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. |
Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) | जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य |
Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)) | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, |
Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल |
Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार |
Zilla Parishad Maharashtra Required Age Limit – वयोमर्यादा
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या/१२, दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाळी ४५ वर्षे) देण्यात आलेली आहे.
ज्या पदासाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत देण्यात आलेली शिथिलता ही दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच लागू राहिल.
सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा
दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.
ZP Maharashtra Group C Age Limit 2023 |
|
सर्वसाधारण प्रवर्ग | 18 ते 40 वर्षे |
मागास प्रवर्ग | 18 ते 45 वर्षे |
मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून फक्त या परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे. परंतू यासाठी उमेदवारांने नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
त्यानुसार सन २०२३ मध्ये घेणेत येणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेकरीता ज्यांनी मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज भरलेले होते व त्यांचे वयाधिक्य झालेले आहे, अशा उमेदवारांना वयामध्ये सूट देणेत येऊन या परीक्षेकरीता पात्र समजणेत येईल.
सन २०२३ च्या जाहिरातीनुसार वयामध्ये सूट मिळविण्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केला असलेबाबत अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
ZP Maharashtra Online Application Fee – अर्ज शुल्क
Zilla Parishad Maharashtra Arj Shulk |
|
सर्वसाधारण प्रवर्ग | रु. 1000 |
मागास प्रवर्ग | रु. 900 |
माजी सैनिक | अर्ज शुल्क नाही |
Other Essential Qualification For ZP Maharashtra Online Apply 2023
वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामाईक अर्हता खालील प्रमाणे असेल.
सामाईक अर्हता | तपशिल |
संगणक अर्हता | कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस – २०१२/प्र.क्र.२७७/३९, दि. ०४/०२/२०१३ मध्ये नमूद | केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक | आहे. परंतू इतर पदांसाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि. १९/०३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. |
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन | महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापन नियुक्ती वेळेस हजर होतांना विवाहीत उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील. प्रतिज्ञापनामध्ये नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोन | पेक्षा अधिक असेल तर दिनांक २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या, अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेच्या नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल. या नियमातील व्याख्येनुसार लहान कुटूंब याचा अर्थ, दोन अपत्ये यांसह पत्नी व पती असा आहे. |
zp bharti 2023 application form last date
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 05/08/2023 |
Closure of registration of application | 25/08/2023 |
Closure for editing application details | 25/08/2023 |
Last date for printing your application | 09/09/2023 |
Online Fee Payment | 05/08/2023 to 25/08/2023 |
ZP Bharti 2023 Application Form Documents – कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे सादर करणे : ZP Bharti 2024
सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे.
1.कागदपत्रे / प्रमाणपत्रे
2.अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र
3.शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
4.वयाचा पुरावा
5.जन्माचा पुरावा
6.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
7.राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील)
8.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
9.पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
10.खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
11.अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
12.महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र
13.महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला
14.विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
15.मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन
16.पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र
17.MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
18.टंकलेखन प्रमाणपत्र
19.लघुलेखन प्रमाणपत्र
20.अनुभव प्रमाणपत्र
Steps to Apply for the Maharashtra ZP Recruitment 2023
- Go to the IBPS website and create an account.
- Login to your account and click on the “Apply Online” link for ZP Recruitment 2023.
- Select the post you want to apply for and fill out the application form.
- Upload your scanned documents.
- Pay the application fee.
- Submit your application.
Maharashtra ZP Bharti 2023 Post Name
Posts Related to Health Services
- Pharmacist
- Laboratory Technician
- Health workers (Male) (आरोग्य सेवक)
- Health workers (Female)
- Health Supervisor
Other Posts
Gram Sevak (Gram Sevak)
Junior Engineer (GPP)
Junior Engineer (Mechanical)
Junior Engineer (Electrical)
Junior Engineer (Civil)
Junior Engineer (Civil) (LP)
Junior Draftsman
Junior Mechanic (Mechanical Assistant)
Junior Accounts Officer
Junior Assistant (Clerk)
Junior Assistant Accounts
tuna (जोडारी)
Electrician
Supervisor
Livestock Supervisor
Laboratory Technician Mechanics
Rigman (Rigman)
Stenographer (Higher Grade)
Stenographer (Lower Grade)
Senior Assistant (Clerk)
Senior Assistant Accounts
Extension Officer (Agriculture)
Extension Officer (Panchayat)
Extension Officer (Education)
Extension Officer (Statistics)
Civil Engineering Assistant..
Zilla Parishad Bharti 2023 – The preparation for new recruitment of Yavatmal employees has reached the final stage and the Ministry level is also pursuing for the recruitment of employees. Therefore, to remove the errors in the recruitment process, Dist. W. All the department heads have become active, so in any case, the activities in the district have been accelerated in accordance with the announcement for the recruitment in the month of July. An advertisement was released in 2019 for the recruitment of employees in Yavatmal Zilla Parishad. At that time, lakhs of unemployed youths had filed applications for recruitment by withdrawing up to 1000 rupees.
Table of Contents
new update
Zilla Parishad Bharti 2024, ZP Mega Bharti 2024
Sir mal ajun he Hall ticket medale nahe me pharmacy offers che exam danar aha me Nundurbar dest sathe form bharla aha 05 Dec 2023 la exam aha exam centre Dhula aha
Zilla Parishad Bharti 2023, ZP Mega Bharti 2023