प्राप्त माहिती नुसार, लाडका भाऊ, म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेत लागलेल्या शिकाऊ उमेदवारांसाठी ११ महिन्यांचीच संधी आहे असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना केवळ ११ महिन्यांसाठी रोजगाराची संधी मिळेल. त्यांना सरकारी किंवा खासगी सेवेत कायम ठेवले जाणार नाही. या बद्दलची पूर्ण माहिती बघूया..

विधानसभेत काँग्रेसची मागणी
विनियोजन विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी शिकाऊ उमेदवारांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी केली. बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे, या उमेदवारांना नोकरीत कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना फक्त ११ महिन्यांसाठीच असून, उमेदवारांना शासकीय सेवेत कायम करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
योजनेंतर्गत रोजगार संधी
या योजनेचा मुख्य उद्देश पदवीधर किंवा पदवीधर होण्याच्या मार्गावर असलेल्या युवकांना कामाचा अनुभव मिळवून देणे हा आहे. याअंतर्गत सुरुवातीला फक्त खासगी क्षेत्रात प्रशिक्षण देण्याची तरतूद होती, मात्र नंतर त्यात सरकारी सेवेलाही समाविष्ट करण्यात आले.
कायम नोकरीचा गैरसमज टाळावा
उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट केले की, ही योजना फक्त ११ महिन्यांसाठीच आहे. त्यामुळे उमेदवारांनी या योजनेद्वारे शासकीय सेवेत कायम नियुक्ती होईल, असा गैरसमज करून घेऊ नये.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















