Balasaheb Thakrey Aapla Dawakhana

Aapla Dawakhana Yojana @ aapladawakhana.org


Balasaheb Thakrey Aapla Dawakhana Yojana

Here we given the details of Balasaheb Thakrey Aapla Dawakhana Yojana started this year by Maharashtra Sarkar. There is a huge rush of patients in government hospitals. Even for diseases like fever and cold, patients have to go to the hospital away from home for treatment and medical tests. As a solution to this, the previous objective is to have an ‘Apla Dawakhana’ for every 25 to 30 thousand settlements. Citizens living in rural as well as remote areas have to visit the hospital for every minor ailment. This not only delays medical treatment but also incurs travel expenses. These inconveniences will be removed.

१४ तालुक्यांत सुरू होणार ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’

सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ तालुक्यांत १ मे ‘महाराष्ट्र दिना’पासून या दवाखान्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, औषधीसाठा, मनुष्यबळ, आदींबाबतचे नियोजन सुरू आहे. या दवाखान्यामुळे आरोग्य व्यवस्थेला एक प्रकारचा बूस्टर मिळणार आहे. या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. याव्यतिरिक्त एक्स-रे, सोनोग्राफी, आदी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवादेखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

aapla dawakhana

What is Aapla Dawakhana Yojana?

काय आहे ‘आपला दवाखाना’ योजना?

सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप, सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार वस्तीनजीक ‘आपला दवाखाना’ असावा हे या मागील उद्देश आहे. ग्रामीण तसेच दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या आजारासाठी रुग्णालयात यावं लागतं. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतोच शिवाय प्रवासाचा खर्च होतो. या गैरसोयी दूर होणार आहेत.

Features of Balasaheb Thakrey Aapla Dawakhana

  1. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये हे दवाखाने सुरू राहणार आहेत.
  2. एमबीबीएस डॉक्टरांसह परिचारिका, स्वच्छता कर्मचारी सेवेत राहणार आहेत.
  3. आपला दवाखान्यातील ओपीडी ते साधारणत: सकाळच्याच सत्रात सुरू राहील, अशी माहिती आहे.
  4. हे दवाखाने सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी जागा व परिसरही जवळपास निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
  5. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे डॉक्टर, परिचारिका, स्टाफ नर्स, अटेंडंट, आदींची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Facilities under the Aapla Dawakhana Yojana?

  1. Under this scheme, the administration is planning to start 1 hospital for the general population of 25 thousand to 30 thousand.
  2. These clinics will be open from 7 am to 2 pm and 3 pm to 10 pm.
  3. Medical officers of the Municipal Corporation informed that 147 types of various medical tests will be done free of cost in our clinic.
  4. First aid clinics will be set up in Portakabins at some places.
  5. The municipality also says that free medical advice and treatment will be provided by medical experts in the polyclinic.
  6. Tests like CT scan, MRI, X-ray, etc. will be done at the municipal diagnostic center.
  7. A medical officer, a nurse, a pharmacist and a helper are being appointed on contract basis in this hospital.
  8. The municipality has issued an advertisement for the recruitment of these posts.
  9. Health facilities such as Ear Nose Throat Specialist (ENT), Ophthalmologist, Gynaecologist, Medical Examiner, Physiotherapist, Dermatologist, Dentist, Pediatrician will be provided through the polyclinic.
  10. Government is planning to start ‘Aapla Dawakhana’ mainly near ST station in rural areas.
  11. Clinics will be started in portacabins in the available municipal clinics in the second session (afternoon) and at other places in open spaces.

Official Website

आरोग्य विभागाच्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ महिनाभरात सव्वादोन लाख रुग्णांवर उपचार!

आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्यात आणखी ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या ३२२ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मध्ये अवघ्या महिनाभरात सव्वा दोन लाख रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सामान्य आजारांसाठीची रुग्णांची गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आले असून आगामी काळात राज्यातील शहरी व निमशहरी भागांसाठी आणखी दवाखाने सुरु करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशात स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्रिस्तरीय आरोग्यसेवा सुरु करण्यात आली होती. यात ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय अशी व्यवस्था करण्यात आली होती. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारांसाठी तात्काळ आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा मिळणे ही मोठी गरज निर्माण झाल्याने आरोग्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही संकल्पना मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यात दोनशे दवाखान्यांना मान्यता दिली होती. करोनाकाळामुळे यातील फारच थोडे दवाखाने तेव्हा प्रत्यक्षात सुरू होऊ शकले. मात्र मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेला युद्धपातळीवर गती देण्याचा निर्णय घेतला.

यातूनच मुंबई महापालिकेने तब्बल १६२ ‘आपला दवाखाना’ सुरु केले असून आजपर्यंत साडेसात लाखाहून अधिक रुग्णांची या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आली आहेत. मुंबईत एकूण दोनशे दवाखाने उभारण्यात येेणार असून आरोग्य विभागानेही राज्यात तालुकानिहाय आपला दवाखाना सुरु करण्यासाठी कंबर कसली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पहिल्या टप्प्यात राज्यात ५०० ‘आपला दवाखाना’ उभारण्याचा सादर केलेल्या आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्यता दिली. यानंतर आरोग्य विभागाने राज्यात परिमंडळ निहाय दवाखान्याची जागा शोधण्यापासून डॉक्टरांच्या नियुक्तीपर्यंतची सर्व तयारी केली व १ मे पासून ३२२ दवाखाने सुरु करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या हस्ते या दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून २७ जूनपर्यंत २,२५,०३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले तर ३१,६९२ रुग्णांच्या विविध चाचण्या करण्यात आल्याचे आरोग्य संचालक डॉ. लाळे यांनी सांगितले.

यात ठाणे परिमंडळात २९ आपला दवाखाना असून पुणे परिमंडळ ३०, नाशिक परिमंडळ ५२, कोल्हापूर २७, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ २८,लातूर परिमंडळ ४५,अकोला परिमंडळ ५४ आणि नागपूर परिमंडळात ५७ असे ३२२ आपला दवाखाना सुरु करण्यात आले आहेत. रात्री दहापर्यंत या दवाखान्यांमध्ये रुग्ण तपासणी होते तसेच मोफत औषधोपचार केले जातात. तसेच गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, लसीकरण, महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन तसेच आवश्यकतेनुसार विशेषज्ञांच्या संदर्भ सेवा सल्ला उपलब्ध करून देण्यात येते.

राज्यात तालुकानिहाय किमान एक दवाखाना सुरु करण्याचा मानस सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. तथापि सामान्य उपचारासाठी शहरी व निमशहरी भागातील लोकसंख्येचा विचार करून नव्याने ७०० दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली असून याचा फायदा मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्णांना होणार आहे. याशिवाय या दवाखान्यांत मधुमेह व उच्च रक्तदाब चाचणी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रामाणात याबाबत जनजागृती करता येऊन या दोन्ही आजारांना नियंत्रणात ठवण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.



9 Comments
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Aapla Dawakhana Yojana @ aapladawakhana.org

  2. Test22
  3. Vaishnavi Joshi says

    या दवाखान्या मध्ये जो स्टाफ काम करणार आहे तो नवीन भरती करणार आहात का असेल तर त्यांचे पगार कसे न किती आहेत

  4. Test22
  5. Sachin Asam pawara says

    बोरती प्रोक्रिया केहवा सुरु हनार

  6. Test22
  7. Avinash says

    Sir he je hospital hotahe tar Karmchari bharti Kashi honar ahe

  8. Test22
  9. Pratiksha Kaware says

    Any MBBS job vacancy available?

  10. Test22
  11. Arti shinde says

    Time ledis staff nurse Sathi Thoda let ahe 10 mnje muli na jyla …ratri Cha veli avghd ahe

  12. Test22
  13. Dr. Vilas kumbhar says

    BAMS Doctor जा़ब आहे ते का??

  14. Test22
  15. Rakesh p Gupta says

    Pharmacist Hindi medium school job hai

  16. Test22
  17. Rakesh p Gupta says

    Job hai

Leave A Reply

Your email address will not be published.